क्यूएस आशिया विद्यापीठ क्रमवारीत भारतीय विद्यापीठांच्या संख्येत झालेल्या विक्रमी वाढीचे पंतप्रधानांनी केले स्वागत
November 04th, 09:37 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील दशकात क्यूएस आशिया विद्यापीठ क्रमवारीत भारतीय विद्यापीठांच्या संख्येत झालेल्या विक्रमी वाढीचे स्वागत केले आहे. संशोधन आणि नवोन्मेष यावर भर देत आपल्या युवकांसाठी दर्जेदार शिक्षण सुनिश्चित करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचे मोदी यांनी सांगितले. आम्ही देशभरात अधिक शैक्षणिक संस्था सक्षम करून या क्षेत्रात संस्थात्मक क्षमता देखील निर्माण करत आहोत, असे मोदी म्हणाले.