पंतप्रधानांनी सर्वांच्या कल्याणासाठी, ज्ञानासाठी आणि समृद्धीसाठी आशीर्वाद देणारे संस्कृत सुभाषित सामाईक केले
September 10th, 10:02 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांचे कल्याण, शुभ, संरक्षण, शांती, ज्ञान आणि समृद्धी यासाठी आशीर्वाद देणारे एक संस्कृत सुभाषित शेअर केले. या सुभाषितात भगवान इंद्र, भगवान सूर्य, भगवान गरुड आणि भगवान बृहस्पती यांच्या आशीर्वादाची प्रार्थना करण्यात आली आहे.पंतप्रधानांनी आषाढी एकादशीच्या शुभप्रसंगी सर्वांना दिल्या शुभेच्छा
July 25th, 11:35 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आषाढी एकादशीच्या शुभ प्रसंगी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. हा पवित्र दिवस भक्ती आणि करुणेचा शाश्वत संदेश देणारा आहे, असे त्यांनी नमूद केले.इथिओपियाच्या निवडणुकीत पंतप्रधान अबिय अहमद अली आणि प्रॉस्पेरिटी पार्टीच्या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
June 23rd, 08:09 pm
इथिओपियाच्या संसदीय निवडणुकीत निर्णायक विजय मिळवल्याबद्दल पंतप्रधान अबिय अहमद अली आणि प्रॉस्पेरिटी पार्टीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांसाठी शाश्वत समृद्धी, सुख आणि वैभवाची प्रार्थना करणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले
May 25th, 09:18 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या समाजमाध्यमावर आज एक संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे.निसर्गाची असीम कृपा, सूर्यदेवाची ऊर्जा आणि पावसाचा पवित्र आशीर्वाद आपले जीवन सुख आणि सौभाग्याने समृद्ध करतात.असा या सुभाषिताचा अर्थ आहे.पृथ्वी सदैव चैतन्यमय, हिरवीगार आणि समृद्ध राहो,अशी,मनोकामनाही मोदी यांनी मनापासून व्यक्त केली आहे.सामूहिक समृद्धी आणि सार्वत्रिक कल्याणासाठी आशिर्वाद मागणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधानांकडून सामायिक
May 22nd, 12:08 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सामुहीक प्रगती, समृद्धी आणि कल्याणासाठी आशीर्वाद मागणारे एक संस्कृत सुभाषित सामायिक केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाबा विश्वनाथ मंदिरात दर्शन घेतले आणि पूजा केली, देशातील लोकांचे उत्तम आरोग्य आणि समृद्धीकरता केली प्रार्थना
April 29th, 11:45 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी येथील बाबा विश्वनाथ मंदिरात दर्शन घेतले आणि पूजा केली, तसेच देशातील लोकांचे उत्तम आरोग्य, आनंदी जीवन आणि समृद्धीकरता त्यांनी प्रार्थना केली.पंतप्रधानांनी सर्वांना दिल्या नवरात्रीच्या शुभेच्छा
March 19th, 09:48 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. या प्रसंगी त्यांनी समृद्धी, आरोग्य व 'विकसित भारत'चा संकल्प पूर्ण व्हावा, अशी प्रार्थना केली.पंतप्रधानांनी देशाला होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत; त्यानिमित्ताने त्यांनी एक संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे
March 04th, 09:32 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी होळीनिमित्त देशातील जनतेला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. रंग आणि आनंदाचा हा सण प्रत्येकाच्या जीवनात हर्ष, समृद्धी आणि यश घेऊन येवो, अशी आकांक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.पंतप्रधानांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी साधला संवाद
December 11th, 08:50 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीव्दारे संवाद साधला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जॉर्डन, इथिओपिया आणि ओमान दौरा
December 11th, 08:43 pm
जॉर्डनचे महामहिम राजे अब्दुल्ला द्वितीय बिन अल हुसेन यांच्या निमंत्रणावरून, पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 15 ते 16, डिसेंबर 2025 दरम्यान जॉर्डनच्या हॅशेमाइट प्रजासत्ताकला भेट देणार आहेत. या दौऱ्यात राजे अब्दुल्ला द्वितीय बिन अल हुसेन यांच्याबरोबर होणाऱ्या बैठकीदरम्यान पंतप्रधान, भारत आणि जॉर्डन यांच्यातील संबंधांचा सर्व पैलूंनी आढावा घेणार आहेत; तसेच प्रादेशिक महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपल्या दृष्टीकोनाची देवाणघेवाण करतील. भारत आणि जॉर्डन यांच्यातील राजनैतिक संबंधांना 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित या बैठकीच्या अनुषंगाने भारत-जॉर्डन यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक वृद्धिंगत करण्यात येतील. याबरोबरच परस्पर विकास आणि समृद्धीच्या दृष्टीने नवनवीन क्षेत्रातील संधींचा आढावा घेणे आणि प्रादेशिक शांतता, समृद्धी, सुरक्षितता आणि स्थैर्य यासाठीची वचनबद्धतेचा पुनरुच्चार करण्यावर यावेळी भर दिला जाईल.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी धनत्रयोदशीनिमित्त नागरिकांना दिल्या शुभेच्छा
October 18th, 08:52 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धनत्रयोदशीच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.मणिपूरमधल्या चुराचांदपूर येथे विविध विकासकामांची पायाभरणी करताना पंतप्रधानांनी केलेले संबोधन
September 13th, 12:45 pm
व्यासपीठावर उपस्थित राज्यपाल श्रीमान अजय भल्ला जी, राज्य प्रशासनाचा अधिकारी वर्ग आणि या कार्यक्रमाला उपस्थित मणिपूरच्या माझ्या बंधू-भगिनींनो,आपणा सर्वांना नमस्कार.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मणिपूरमधील चुराचांदपूर इथे 7,300 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी
September 13th, 12:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मणिपूरमधील चुराचांदपूर इथे 7,300 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी केली. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधितही केले. मणिपूरची भूमी धैर्य आणि दृढनिश्चयाची भूमी असून, मणिपूरच्या डोंगरदऱ्या म्हणजे निसर्गाने दिलेली अनमोल देणगी असल्याचे ते म्हणाले. या डोंगरदऱ्या इथल्या जनतेच्या अविरत मेहनतीचे प्रतीक आहेत, असेही ते म्हणाले. मणिपूरच्या लोकांच्या भावनेला त्यांनी सलाम केला, तसेच या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानत, त्यांच्या प्रेमाबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळच्या हंगामी सरकारच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांना दिल्या शुभेच्छा
September 13th, 08:57 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नेपाळच्या हंगामी सरकारच्या पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्याबद्दल सुशीला कार्की यांना शुभेच्छा दिल्या. नेपाळमधील जनतेच्या शांती, प्रगती आणि समृद्धीसाठी भारत दृढपणे वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला.जपानच्या प्रशासनिक राज्यपालांशी संवादादरम्यान पंतप्रधानांनी केलेले मनोगत
August 30th, 08:00 am
या सभागृहात मला सैतामाची वेगवान धडपड जाणवते, मियागीचे जिद्दीपण जाणवते, फुकुओकाची चैतन्य आणि नाराच्या वारशाची सुगंधी झुळूक अनुभवायला मिळते. आपल्यामध्ये कुमामोतोची आत्मीयता आहे, नागानोची ताजेपणा आहे, शिझुओकाची रमणीयता आहे, आणि नागासाकीचे स्पंदन आहेत. आपण सर्व फुजी पर्वताच्या सामर्थ्याचे आणि साकुराच्या आत्म्याचे प्रतीक आहात. एकत्रितपणे आपण जपानला शाश्नत बनवत आहात.फॅक्ट शीट: भारत-जपान आर्थिक सुरक्षा सहकार्य
August 29th, 08:12 pm
भारत-जपान विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी, आपल्या सामायिक मूल्ये आणि परस्पर सन्मानावर आधारित असून दोन्ही देशांची सुरक्षा आणि समृद्धी पुढे नेण्यासाठी महत्वाची आहे. आर्थिक सुरक्षेच्या क्षेत्रातील सहकार्य हा आमचा धोरणात्मक दृष्टीकोन आणि आर्थिक अनिवार्यतेमधील वाढत्या अभिसरणातून निर्माण झालेल्या द्विपक्षीय सहकार्याचा एक प्रमुख आधारस्तंभ आहे.15व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेतील संयुक्त निवेदन: आपल्या भावी पिढीच्या सुरक्षिततेसाठी आणि समृद्धीसाठी भागीदारी
August 29th, 07:06 pm
जपानचे पंतप्रधान महामहीम इशिबा शिगेरू यांच्या निमंत्रणावरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेसाठी 29-30 ऑगस्ट 2025 रोजी जपानला अधिकृत कार्य भेट दिली. 29 ऑगस्ट 2025 रोजी संध्याकाळी पंतप्रधान मोदींचे स्वागत पंतप्रधान इशिबा यांनी पंतप्रधान कार्यालयात (कांटेई) केले, जिथे त्यांना औपचारिक गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. दोन्ही पंतप्रधानांनी शिष्टमंडळ-स्तरीय चर्चा केली. यावेळी त्यांनी भारत आणि जपानमधील दीर्घकाळापासून कायम राहिलेल्या मैत्रीची आठवण केली, जी ऐतिहासिक संबंध, सामायिक मूल्ये आणि हितसंबंध, समान धोरणात्मक दृष्टिकोन आणि परस्परांबद्दलचा आदर यामध्ये रुजलेली आहे. दोन्ही पंतप्रधानांनी गेल्या दशकात भारत-जपान भागीदारीने केलेल्या महत्त्वपूर्ण प्रगतीचे कौतुक केले आणि आगामी दशकात परस्पर सुरक्षितता आणि समृद्धी साधण्यासाठी धोरणात्मक आणि दूरगामी भागीदारी मजबूत करण्याच्या मार्गांवर रचनात्मक चर्चा केली.पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली राहणीमान आणि व्यवसाय सुलभतेला गती देण्यासाठी आधुनिक काळानुसार सुधारणांसंबंधी उच्चस्तरीय बैठक
August 18th, 08:40 pm
राहणीमान उंचावणे, तसेच व्यवसाय सुलभतेत सुधारणा करण्यासाठी त्याचबरोबर समावेशकतेला चालना देण्यासाठी जलद आणि व्यापक सुधारणा घडवून आणण्याच्या उद्देशाने पुढील पिढीतील अर्थात आधुनिक सुधारणांच्या पथदर्शक कार्यक्रमाविषयी चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज एक उच्चस्तरीय बैठक झाली.79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त दिलेल्या शुभेच्छांबद्दल पंतप्रधानांनी मानले जगभरातील नेत्यांचे आभार
August 15th, 07:26 pm
भारताच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्याबद्दल जगभरातील नेत्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार मानले आहेत.पंतप्रधानांकडून राष्ट्रीय हातमाग दिनाच्या शुभेच्छा
August 07th, 03:31 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रीय हातमाग दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या कारागिरांकडे असलेल्या कौशल्याचे दर्शन घडवणाऱ्या आपल्या समृद्ध विणकाम परंपरेचा सोहळा आजच्या दिवशी आपण साजरा करतो, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. भारताची हातमाग विविधता तसेच रोजगार आणि समृद्धी यासाठी प्रोत्साहन देण्यामध्ये याची भूमिका याचा आपल्याला अभिमान आहे असे त्यांनी म्हटले आहे.