पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रिपब्लिक प्लेनरी समिट 2025 मधील भाषण
March 06th, 08:05 pm
एक प्रकारे युवकांच्या सहभागाने आपण सर्व बंधने तोडू शकतो, सीमा ओलांडून जाऊ शकतो, आणि मग असे कोणतेही लक्ष्य शिल्लक राहत नाही जे साध्य करता येणार नाही . असे कोणतेही ध्येय उरत नाही ज्यापर्यंत पोहोचता येणार नाही. रिपब्लिक टीव्हीने या शिखर परिषदेसाठी एका नवीन संकल्पनेवर काम केले आहे. या शिखर परिषदेच्या यशासाठी मी तुम्हा सर्वांना खूप-खूप शुभेच्छा देतो, तुमचे अभिनंदन करतो. बरं, यात माझाही थोडासा स्वार्थ आहे, एक तर गेल्या काही दिवसांपासून माझा प्रयत्न आहे की मला एक लाख तरुणांना राजकारणात आणायचं आहे आणि ते एक लाख असे असतील ज्यांच्या कुटुंबातील कुणीही आजवर राजकारणात आलेले नसतील, ते युवकच प्रथम येणारे असतील, त्यामुळे एक प्रकारे हा कार्यक्रम माझ्या या उद्दिष्टाला अनुरूप पार्श्वभूमी तयार करत आहे. दुसरे म्हणजे, माझा वैयक्तिक फायदा असा आहे की जे 2029 मध्ये मतदान करण्यासाठी जातील त्यांना माहित नाही की 2014 पूर्वी वर्तमानपत्रातील मथळे काय असायचे , हे त्यांना माहीत नाही . 10-10, 12-12 लाख कोटी रुपयांचे घोटाळे व्हायचे हे त्यांना माहीत नाही आणि जेव्हा ते 2029 मध्ये मतदान करायला जातील तेव्हा त्यांच्यासमोर तुलना करण्यासाठी काहीही नसेल आणि म्हणूनच मला ती कसोटी पार करायची आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की हे जे वातावरण तयार होत आहे , ही जी पार्श्वभूमी तयार होत आहे ती हे काम नक्की करेल.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिपब्लिक प्लेनरी समिट 2025 ला संबोधित केले
March 06th, 08:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीमधील भारत मंडपम येथे आयोजित रिपब्लिक प्लेनरी समिट 2025 मध्ये भाग घेतला. उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी मुलभूत पातळीवर युवकांना सहभागी करून घेण्यासाठी आणि महत्त्वाची हॅकेथॉन स्पर्धा आयोजित करण्यासाठी रिपब्लिक टीव्ही या वाहिनीने स्वीकारलेल्या नाविन्यपूर्ण दृष्टिकोनाबद्दल वाहिनीच्या संचालकांचे अभिनंदन केले. जेव्हा देशातील तरुण राष्ट्रीय चर्चांमध्ये सहभागी होतात तेव्हा त्यातून संकल्पनांमध्ये नाविन्य निर्माण होते आणि संपूर्ण वातावरण तरुणांच्या उर्जेने भरून जाते, असे मत त्यांनी नोंदवले. ही उर्जा आत्ता या कार्यक्रमात जाणवते आहे हे सांगण्यावर त्यांनी अधिक भर दिला. पंतप्रधान पुढे म्हणाले की, तरुणांचा सहभाग सर्व प्रकारचे अडथळे पार करण्यात आणि बंधनांच्या पलीकडचा विचार करण्यात सहाय्यक ठरतो आणि त्यामुळे प्रत्येक ध्येय साध्य करण्याजोगे आणि प्रत्येक इच्छित लक्ष्य गाठ्ण्याजोगे होऊन जाते. अशा पद्धतीच्या परिषदेची नवी संकल्पना राबवल्याबद्दल त्यांनी रिपब्लिक टीव्ही वाहिनीची प्रशंसा केली आणि या उपक्रमाच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी राजकारणाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या एक लाख युवकांना भारताच्या राजकारणात आणण्याच्या त्यांच्या संकल्पनेचा पुनरुच्चार केला.ईटी नाऊ जागतिक व्यापार परिषदेत पंतप्रधानांनी केलेले भाषण
February 15th, 08:30 pm
गेल्या वेळी मी ईटी समिट (जागतिक परिषद) मध्ये आलो होतो, तेव्हा निवडणुका होणार होत्या; आणि त्या वेळी मी तुम्हाला अगदी नम्रतेने सांगितले होते की, आमच्या तिसऱ्या कार्यकाळात भारत नव्या वेगाने काम करेल. आज हा वेग दिसत आहे, आणि देश त्याला समर्थनही देत आहे, याचा मला आनंद वाटतो. नवीन सरकार स्थापन झाल्यावर देशातील अनेक राज्यांमध्ये बीजेपी-एनडीएला जनतेचा सतत आशीर्वाद लाभत आहे. जून मध्ये ओदिशाच्या जनतेने विकसित भारताच्या संकल्पाला गती दिली, नंतर हरियाणाच्या जनतेने समर्थन दिले आणि आता दिल्ली मधील लोकांनी आम्हाला मोठे समर्थन दिले आहे. विकसित भारताच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी देशातील जनता आज कशी खांद्याला खांदा लावून काम करत आहे, याची ही पावती आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईटी नाऊ ग्लोबल बिझनेस समिट 2025 ला केले संबोधित
February 15th, 08:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ईटी नाऊ ग्लोबल बिझनेस समिट 2025 अर्थात उद्योग व्यवसायविषयक जागतिक शिखर परिषद 2025 ला संबोधित केले. या शिखर परिषदेच्या याआधीच्या पर्वालाही आपण संबोधित केले होते, आणि त्यावेळी आपण आपल्या तिसऱ्या कार्यकाळात भारत नव्या वेगाने काम करेल असे नम्रपणे नमूद केले होते याचे स्मरण पंतप्रधानांनी यावेळी करून दिले. त्यानुसार आता भारताने पकडलेली नवी गती सर्वांना दिसून येत असल्याचेही त्यांनी सांगितले. या सर्व प्रक्रियेला देशभरातून पाठबळ मिळत असल्याबद्दलही पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले. ओदिशा, महाराष्ट्र, हरयाणा आणि नवी दिल्लीतल्या जनतेने विकसित भारताबद्दलच्या वचनबद्धतेला प्रचंड प्रमाणात पाठबळ दर्शवल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे आभारही मानले. जनतेचे हे पाठबळ म्हणजे देशातली जनता विकसित भारताच्या संकल्प पूर्ततेसाठी खांद्याला खांदा लावून काम करत असल्याचेच द्योतक आहे असे पंतप्रधान म्हणाले.We launched the SVAMITVA Yojana to map houses and lands using drones, ensuring property ownership in villages: PM
January 18th, 06:04 pm
PM Modi distributed over 65 lakh property cards under the SVAMITVA Scheme to property owners across more than 50,000 villages in over 230 districts across 10 states and 2 Union Territories. Reflecting on the scheme's inception five years ago, he emphasised its mission to ensure rural residents receive their rightful property documents. He expressed that the government remains committed to realising Gram Swaraj at the grassroots level.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामित्व लाभार्थ्यांसोबत साधला संवाद
January 18th, 05:33 pm
मध्य प्रदेशातील सिहोर येथील स्वामित्व लाभार्थी मनोहर मेवाडा यांच्यासोबत संवाद साधताना पंतप्रधानांनी त्यांना स्वामित्व योजनेविषयीचा त्यांचा अनुभव विचारला. मालमत्तेच्या कागदपत्रांमुळे त्यांनी कशा प्रकारे कर्ज मिळवले आणि त्यामुळे त्यांच्या जीवनात कशा प्रकारे बदल झाला आहे, असे पंतप्रधानांनी मनोहर यांना विचारले. त्यावर आपल्या डेरी फार्मसाठी 10 लाख रुपयांचे कर्ज घेतल्याची आणि त्यामुळे आपला व्यवसाय सुरू करता आल्याची माहिती मनोहर यांनी दिली. आपली मुले आणि पत्नी देखील या डेरी फार्ममध्ये काम करत आहेत आणि यामुळे अतिरिक्त उत्पन्न मिळत आहे असे मनोहर यांनी सांगितले.मालमत्तेची कागदपत्रे असल्यामुळे बँकेकडून कर्ज मिळवणे सोपे झाले असे मनोहर यांनी अधोरेखित केले. केंद्र सरकारी योजनांमुळे लोकांच्या जीवनातील अडचणी कमी झाल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. स्वामित्व योजनेमुळे लाखो कुटुंबांच्या उत्पन्नात वाढ झाली असल्याचे पाहून आपल्याला आनंद झाला असल्याचे पंतप्रधान म्हणाले. प्रत्येक नागरिकाने त्याची मान अभिमानाने उंचवावी आणि त्याच्या जीवनात सुलभता अनुभवावी हे सुनिश्चित करण्याला सरकारचे प्राधान्य असल्यावर त्यांनी भर दिला. याच दृष्टीकोनाचा स्वामित्व योजना ही विस्तार असल्याचे त्यांनी सांगितले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये स्वामित्व योजने अंतर्गत 65 लाखांपेक्षा जास्त प्रॉपर्टी कार्ड्सचे केले वितरण
January 18th, 12:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 10 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये 230 जिल्ह्यांमधील 50,000 पेक्षा जास्त गावांमध्ये मालमत्ता धारकांना दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून स्मामित्व योजने अंतर्गत 65 लाखांपेक्षा जास्त प्रॉपर्टी कार्ड्सचे वितरण केले. भारतामधील गावे आणि ग्रामीण भागांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे, असे त्यांनी या कार्यक्रमाला संबोधित करताना सांगितले आणि सर्व लाभार्थी आणि नागरिकांना या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना त्यांची प्रॉपर्टी कार्ड्स मिळतील हे सुनिश्चित करण्यासाठी पाच वर्षांपूर्वी स्वामित्व योजना सुरू करण्यात आली, असे पंतप्रधान म्हणाले. विविध राज्यांमध्ये मालमत्ता मालकी प्रमाणपत्रांना घरोनी, अधिकार अभिलेख, प्रॉपर्टी कार्ड, मालमत्ता पत्रक आणि आवासीय भूमी पत्ता यांसारख्या विविध नावांनी ओळखले जाते असे त्यांनी नमूद केले.स्वामित्व योजनेंतर्गत मालमत्ताधारकांना 65 लाखांहून अधिक प्रॉपर्टी कार्ड पंतप्रधान 18 जानेवारी रोजी करणार वितरित
January 16th, 08:44 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 जानेवारी रोजी दुपारी 12:30 वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे 10 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधील 230 हून अधिक जिल्ह्यांमधील 50000 हून अधिक गावांमधील मालमत्ता मालकांना स्वामित्व योजनेंतर्गत 65 लाखांहून अधिक प्रॉपर्टी कार्डचे वितरण करणार आहेत.स्वामित्व योजनेंतर्गत 50 लाखांहून अधिक मालमत्ताधारकांना पंतप्रधान मालमत्ता पत्रे करणार वितरित
December 26th, 04:50 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 डिसेंबर रोजी दुपारी 12:30 वाजता दृकश्राव्य माध्यमाद्वारे 10 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधील 200 जिल्ह्यांमधील 46,000 हून अधिक गावांमधील मालमत्ताधारकांना स्वामित्व (SVAMITVA) योजनेअंतर्गत 50 लाखांहून अधिक मालमत्ता पत्रांचे वितरण करणार आहेत.28 व्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC) स्थापना दिवस कार्यक्रमातील पंतप्रधानांचे भाषण
October 12th, 11:09 am
तुम्हा सर्वांना नवरात्रोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा! कार्यक्रमामध्ये उपस्थित देशाचे गृहमंत्री श्री अमित शहा, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष, न्यायमूर्ती श्री अरुण कुमार मिश्रा, केंद्रीय गृह राज्यमंत्री श्री नित्यानंद राय, इतर आदरणीय सदस्य, मानवाधिकार आयोग, राज्य मानवाधिकार आयोगाचे सर्व अध्यक्ष, सर्वोच्च न्यायालयाचे उपस्थित सर्व सन्माननीय न्यायाधीश, सदस्य, संयुक्त राष्ट्रसंघाच्या विविध संस्थांचे सर्व प्रतिनिधी, नागरी समाज संस्थांसंबंधित सहकारी, इतर सर्व मान्यवर, बंधू आणि भगिनी!राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या 28 व्या वर्धापन दिन कार्यक्रमाला पंतप्रधान उपस्थित
October 12th, 11:08 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या (NHRC) 28 व्या वर्धापन दिन कार्यक्रमाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशात स्वामित्व योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधताना केलेले भाषण
October 06th, 12:31 pm
स्वामित्व योजनेमुळे जो आत्मविश्वास, जो विश्वास गावांमध्ये निर्माण झाला आहे तो लाभार्थ्यांशी संवाद साधताना त्यांच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्ट झळकत आहे आणि मी आज या ठिकाणी देखील पाहत आहे, तुमच्याक़डील बांबूच्या खुर्च्या तुम्ही मला दाखवल्या, पण माझी नजर दूरवर पसरलेल्या या जनता-जनार्दनाचा जो उत्साह आहे, आकांक्षा आहेत त्यावर खिळलेली आहे. जनतेचे इतके प्रेम, इतके आशीर्वाद मिळत आहेत, त्यांचे किती भले झाले असेल, याचा मला पुरेपूर अंदाज येऊ शकतो. ही योजना किती मोठी ताकद बनून उदयाला येत आहे, हा अनुभव आता ज्या बांधवांसोबत मला बोलण्याची संधी मिळाली, त्यांनी दिलेल्या सविस्तर माहितीमध्ये मिळाला आहे. स्वामित्व योजनेनंतर लोकांना बँकातून कर्ज मिळणे आणखी जास्त सुलभ झाले आहे.पंतप्रधानांनी मध्यप्रदेशातील स्वामित्व योजनेच्या लाभार्थ्यांशी साधला संवाद
October 06th, 12:30 pm
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशातील स्वामित्व योजनेच्या लाभार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांनी या योजनेअंतर्गत 1,71,000 लाभार्थ्यांना ई मालमत्ता पत्रांचे वाटप केले. केंद्रीय मंत्री, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री, खासदार आणि आमदार, लाभार्थी, गाव, जिल्हा आणि राज्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2021 मध्ये पंतप्रधानांचे भाषण
April 24th, 11:55 am
कार्यक्रमात माझ्याबरोबर सहभागी झालेले पंचायती राज मंत्री नरेंद्र सिंह तोमर, राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक, हरियाणा, अरुणाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, आणि उत्तराखंडचे सर्व आदरणीय मुख्यमंत्रीगण, हरियाणाचे उप मुख्यमंत्री, राज्यांचे पंचायती राज मंत्री, ग्रामीण विकास मंत्री, देशभरातील ग्राम पंचायतींशी संलग्न सर्व लोकप्रतिनिधि गण, आणि जसे आता नरेंद्र सिंह म्हणाले की सुमारे पाच कोटी लोकांनी या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी केली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने गावांचे या कार्यक्रमात सहभागी होणे हे ग्राम विकासच्या दिशेने जे पाऊल आहे त्याला बळ देते. अशा या सर्व पाच कोटी बंधू-भगिनींना माझा आदरपूर्वक नमस्कार.पंतप्रधानांनी केला स्वामित्व योजनेंतर्गत ई-मालमत्ता कार्डे वितरणाला प्रारंभ
April 24th, 11:54 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रीय पंचायतराज दिनाचे औचित्य साधून स्वामित्व (SVAMITVA) योजनेअंतर्गत मालमत्ता कार्ड वितरणास व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आरंभ केला. यावेळी 4 लाख 9 हजार मालमत्ताधारकांना त्यांच्या मालमत्तेची कार्ड्स देण्यात आली आणि देशभरातील स्वामित्व (SVAMITVA) योजनेचा आरंभ करण्यात आला. केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंग तोमर या वेळी उपस्थित होते. संबंधित राज्यांचे मुख्यमंत्री आणि पंचायत राज मंत्री यावेळी उपस्थित होते.We are committed to free Tea, Tourism and Timber from the controls of mafia: PM Modi in Siliguri
April 10th, 12:31 pm
Addressing a massive rally ahead of fifth phase of election in West Bengal’s Siliguri, Prime Minister Narendra Modi today said, “The entire North Bengal has announced that TMC government is going and BJP government is coming. Today, the entire nation is proud to see the willpower of the people of Bengal. This willpower is of the ‘Ashol Poriborton’. This willpower is the power of ‘Sonar Bangla’.”PM Modi addresses public meetings at Siliguri and Krishnanagar, West Bengal
April 10th, 12:30 pm
PM Modi addressed two mega rallies ahead of fifth phase of election in West Bengal’s Siliguri and Krishnanagar. “The entire North Bengal has announced that TMC government is going and BJP government is coming. Today, the entire nation is proud to see the willpower of the people of Bengal. This willpower is of the ‘Ashol Poriborton’. This willpower is the strength of ‘Sonar Bangla’,” he said in Siliguri rally.NDA Govt has ensured peace and stability in Assam: PM Modi in Bokakhat
March 21st, 12:11 pm
Continuing his election campaigning spree, PM Modi addressed a public meeting in Bokakhat, Assam. He said, “It is now decided that Assam will get 'double engine ki sarkar', 'doosri baar, BJP sarkar’, ‘doosri baar, NDA sarkar’. “Today I can respectfully say to all our mothers, sisters and daughters sitting here that we have worked hard to fulfill the responsibility and expectations with which you elected the BJP government,” he added.PM Modi addresses public meeting at Bokakhat, Assam
March 21st, 12:10 pm
Continuing his election campaigning spree, PM Modi addressed a public meeting in Bokakhat, Assam. He said, “It is now decided that Assam will get 'double engine ki sarkar', 'doosri baar, BJP sarkar’, ‘doosri baar, NDA sarkar’. “Today I can respectfully say to all our mothers, sisters and daughters sitting here that we have worked hard to fulfill the responsibility and expectations with which you elected the BJP government,” he added.Congress trying to malign India's image associated with tea: PM Modi in Chabua, Assam
March 20th, 03:27 pm
Resuming his election campaign in Assam, Prime Minister Narendra Modi today addressed a public meeting in Chabua. Slamming the Congress party, the PM said, “India's oldest party, who ruled over India for 50-55 years, is supporting people who're trying to remove India's image associated with tea. Can we forgive the Congress for this? Don't they deserve to get punished?”