Prime Minister emphasises strong foundation built for a truly renewed partnership between the two nations with the visit of Prime Minister of Canada

March 03rd, 10:16 pm

Praising the visit of Canadian PM Mark Carney to India, PM Modi said that the visit has built a strong foundation for a truly renewed partnership between the two nations. He added that he looks forward to working together to build a bright future and shared prosperity for the people of both countries.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या प्रारंभी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

January 29th, 10:15 am

काल राष्ट्रपतींचे अभिभाषण हे 140 कोटी देशवासीयांच्या आत्मविश्वासाचे प्रतिबिंब होते, 140 कोटी देशवासीयांच्या परिश्रमांचा लेखाजोखा होते आणि 140 कोटी देशवासीयांपैकी विशेषतः तरुणांच्या आकांक्षा अधोरेखित करणारे अत्यंत अचूक अभिभाषण होते. तसेच सर्व खासदारांसाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या अनेक बाबी राष्ट्रपतींनी काल सभागृहासमोर मांडल्या. अधिवेशनाच्या प्रारंभीच आणि 2026 च्या सुरुवातीलाच राष्ट्रपतींनी खासदारांकडून ज्या अपेक्षा व्यक्त केल्या, त्यांनी राष्ट्रप्रमुख म्हणून आपल्या भावना अतिशय सोप्या शब्दांत मांडल्या आहेत, मला पूर्ण विश्वास आहे की सर्व माननीय खासदारांनी त्या अतिशय गांभीर्याने घेतल्या असतील. हे अधिवेशन खरोखरच अत्यंत महत्त्वाचे आहे. हे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. 21व्या शतकाचा एक चतुर्थांश काळ पूर्ण झाला आहे आणि दुसऱ्या चतुर्थांशाची सुरुवात होत आहे. 2047 पर्यंत ‘विकसित भारत’ हे लक्ष्य साध्य करण्यासाठीचे महत्त्वाचे 25 वर्षांचे पर्व आता सुरू होत आहे. या शतकाच्या दुसऱ्या चतुर्थांशातील हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. तसेच अर्थमंत्री निर्मला जी या देशाच्या अशा पहिल्या महिला अर्थमंत्री आहेत, ज्या सलग नवव्यांदा संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. हा क्षण भारताच्या संसदीय इतिहासात गौरवाचा क्षण म्हणून नोंदला जात आहे.

2026 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन

January 29th, 10:00 am

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज संसद परिसरात 2026 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीपूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पंतप्रधानांनी नमूद केले की, राष्ट्रपतींचे अभिभाषण हे 140 कोटी नागरिकांच्या आत्मविश्वासाची अभिव्यक्ती, त्यांच्या परिश्रमाचे सिंहावलोकन आणि तरुणांच्या आकांक्षांचे अचूक प्रतिबिंब आहे. राष्ट्रपतींनी अधिवेशनाच्या आणि 2026 या वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच सर्व संसद सदस्यांसमोर अनेक मार्गदर्शक मुद्दे मांडले आहेत, असे त्यांनी अधोरेखित केले. राष्ट्रप्रमुख म्हणून राष्ट्रपतींनी साध्या शब्दांत व्यक्त केलेल्या अपेक्षा सर्व खासदारांनी निश्चितपणे गांभीर्याने घेतल्या असतील, ज्यामुळे हे अधिवेशन अत्यंत महत्त्वाचे ठरेल, असे मोदी यांनी सांगितले. त्यांनी यावर भर दिला की, हे अर्थसंकल्पीय अधिवेशन 21 व्या शतकातील पहिल्या तिमाहीची समाप्ती आणि दुसऱ्या तिमाहीची सुरुवात दर्शवत आहे, यावर त्यांनी भर दिला. 2047 पर्यंत विकसित भारताचे ध्येय गाठण्यासाठी पुढील 25 वर्षे अत्यंत महत्त्वाची आहेत आणि हा अर्थसंकल्प या शतकातील दुसऱ्या तिमाहीतील पहिला अर्थसंकल्प आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. पंतप्रधानांनी आवर्जून नमूद केले की, देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री निर्मला सीतारामन या संसदेत सलग 9 व्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहेत, जो भारताच्या संसदीय इतिहासातील एक अभिमानास्पद क्षण आहे.

माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली

December 23rd, 09:39 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान भारतरत्न चौधरी चरण सिंह जी यांना आज त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिली. “समाजातील उपेक्षित वर्गाच्या कल्याणाबरोबरच कृषी क्षेत्राची प्रगती आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले. राष्ट्रनिर्मितीमधील त्यांचे योगदान हा कृतज्ञ देश कधीही विसरू शकत नाही,” मोदी म्हणाले.

पंतप्रधानांना इस्रायलच्या पंतप्रधानांनी केला दूरध्वनी

December 10th, 07:56 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आज इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि जोडी हेडन यांच्या विवाहाप्रित्यर्थ दिल्या शुभेच्छा

November 29th, 09:05 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपले जिवलग मित्र ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि जोडी हेडन यांना त्यांच्या विवाहाप्रित्यर्थ मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.

जोहान्सबर्ग येथील जी-20 शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधानांनी घेतली जपानच्या पंतप्रधानांची भेट

November 23rd, 09:46 pm

दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे झालेल्या जी-20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जपानचे पंतप्रधान साने ताकाची यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली. 29 ऑक्टोबर 2025 रोजी पंतप्रधान ताकाची यांच्यासोबत झालेल्या दूरध्वनी संभाषणानंतर झालेली पंतप्रधानांची ही पहिलीच भेट होती.

जी 20 शिखर परिषद 2025 च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधानांची घेतली भेट

November 23rd, 09:44 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे झालेल्या जी 20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर इटालियन प्रजासत्ताकच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेतली. याआधी जून मध्ये कॅनडा मध्ये काननास्किस येथे झालेल्या जी 7 शिखर परिषदेच्या निमित्ताने दोन्ही नेत्यांनी संवाद साधला होता.

जोहनिबर्ग येथे जी-20 शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधानांनी घेतली कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट

November 23rd, 09:41 pm

दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग इथे सुरु असलेल्या जी-20 नेत्यांच्या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी भारत आणि कॅनडामधील भागीदारीच्या प्रगतीचा आढावा घेतला.

Prime Minister pays tributes to former Prime Minister Smt. Indira Gandhi on her birth anniversary

November 19th, 07:53 am

The Prime Minister, Shri Narendra Modi has paid tributes to former Prime Minister Smt. Indira Gandhi on her birth anniversary.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानच्या पंतप्रधान सानई ताकाईची यांच्याशी सौहार्दपूर्ण संवाद साधला

October 29th, 01:14 pm

पंतप्रधान सानई ताकाईची यांनी पदभार ग्रहण केल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

जपानच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल साने ताकाइची यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

October 21st, 11:24 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल साने ताकाइची यांचे हार्दिक अभिनंदन केले. X या समाजमाध्यमावरच्या संदेशात, पंतप्रधान मोदींनी भारत-जपान विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी अधिक मजबूत करण्याची वचनबद्धता व्यक्त केली.

नवी दिल्लीत एनडीटीव्ही वर्ल्ड समिट 2025 मध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण

October 17th, 11:09 pm

श्रीलंकेच्या पंतप्रधान महामहीम हरिणी अमरसूर्या महोदया, ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान, माझे मित्र टोनी ऍबट महोदय, यूकेचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक महोदय, मान्यवर अतिथी, स्त्री-पुरुषहो नमस्कार!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे एनडीटीव्ही जागतिक शिखर परिषद 2025 ला केले संबोधित

October 17th, 08:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे एनडीटीव्ही जागतिक शिखर परिषद 2025 ला संबोधित केले. उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. सर्व नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना मोदी म्हणाले की एनडीटीव्ही जागतिक शिखर परिषद उत्सवाच्या वातावरणात आयोजित केली जात आहे. त्यांनी सत्राची संकल्पना अजेय भारत ची प्रशंसा केली आणि ते खरोखरच समर्पक असल्याचे नमूद केले, कारण आज भारत थांबण्याच्या मनःस्थितीत नाही. पंतप्रधान म्हणाले की भारत थांबणार नाही किंवा वेग कमीही करणार नाही, 140 कोटी भारतीय पूर्ण गतीने एकत्रितपणे पुढील वाटचाल करत आहेत.

केनियाचे माजी पंतप्रधान रैला ओडिंगा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले

October 15th, 02:41 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केनियाचे माजी पंतप्रधान रैला ओडिंगा यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. माझे प्रिय मित्र आणि केनियाचे माजी पंतप्रधान रैला ओडिंगा यांच्या निधनाने व्यथित झालो आहे. ते एक उत्तुंग राजकीय व्यक्तिमत्त्व आणि भारताचे अत्यंत जवळचे मित्र होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाच्या माझ्या कार्यकाळापासून त्यांना जवळून जाणून घेण्याचे भाग्य मला लाभले आणि त्यानंतर कित्येक वर्ष आमचा स्नेह पुढे सुरु राहिला, असे पंतप्रधान म्हणाले.रैला ओडिंगा यांना भारतीय संस्कृती, मूल्य आणि प्राचीन विद्वत्तेबद्दल विशेष आस्था होती आणि भारत-केनिया बंध दृढ करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमध्ये त्याचे प्रतिबिंब नेहमीच उमटत असे, असेही पंतप्रधान म्हणाले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या गाझा शांतता योजनेअंतर्गत झालेल्या प्रगतीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्राएलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचे केले अभिनंदन

October 09th, 10:17 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी आज दूरध्वनीवरुन संपर्क साधला आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या गाझा शांतता योजनेअंतर्गत झालेल्या प्रगतीबद्दल नेतन्याहू यांचे अभिनंदन केले.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना पंतप्रधानांची आदरांजली

September 26th, 08:51 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना आज त्यांच्या जन्मदिनानिमित्त आदरांजली अर्पण केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळच्या हंगामी सरकारच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांना दिल्या शुभेच्छा

September 13th, 08:57 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नेपाळच्या हंगामी सरकारच्या पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्याबद्दल सुशीला कार्की यांना शुभेच्छा दिल्या. नेपाळमधील जनतेच्या शांती, प्रगती आणि समृद्धीसाठी भारत दृढपणे वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला.

पंतप्रधानांनी नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गाहर स्टोरे यांचे पुन्हा निवडून आल्याबद्दल केले अभिनंदन

September 10th, 06:22 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गाहर स्टोरे यांचे त्यांच्या पुनर्निवडीबद्दल हार्दिक अभिनंदन केले. पंतप्रधान मोदी यांनी नॉर्वेसोबत विविध क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य वाढवण्याच्या भारताच्या वचनबद्धतेवर भर दिला.

PM Modi arrives in London, United Kingdom

July 24th, 12:15 pm

Prime Minister Narendra Modi arrived in United Kingdom a short while ago. In United Kingdom, PM Modi will hold discussions with UK PM Starmer on India-UK bilateral relations and will also review the progress of the Comprehensive Strategic Partnership.