पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ असलेल्या प्रमबानान मंदिर संकुलाला दिली भेट
July 08th, 01:46 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज योग्यकर्ता इथल्या ऐतिहासिक प्रमबानान मंदिर संकुलाला भेट दिली. हे ठिकाण युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे. यावेळी विशेष आदरातिथ्य दाखवत इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांनी देखील या मंदिर भेटीदरम्यान पंतप्रधानांची सोबत केली. या दोन्ही नेत्यांनी मंदिर संकुलालातील भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या संवर्धन आणि जीर्णोद्धार प्रकल्पाच्या कामाचा प्रारंभ म्हणून एका कोनशिलेचे अनावरण केले.India and Indonesia are connected not only by our history but also by a shared future: PM Modi at community programme in Jakarta
July 07th, 11:47 pm
Addressing the Indian community in Jakarta, PM Modi thanked the diaspora for their warm welcome and praised their contribution to Indonesia's progress and their role as a living bridge between the two nations. He spoke about India's rapid transformation and called upon the community to contribute towards the shared aspirations of Viksit Bharat 2047 and Indonesia Emas 2045.पंतप्रधानांनी जकार्ता येथे भारतीय समुदायाला केले संबोधित
July 07th, 05:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जकार्ता येथे भारतीय समुदायाने आयोजित केलेल्या स्वागत समारंभात सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन होताच, भारतीय समुदायाच्या मोठ्या समूहाने आणि भारतीयांच्या इंडोनेशियन मित्रांनी त्यांचे अत्यंत उत्साहात आणि जिव्हाळ्याने स्वागत केले. विशेष आदर व्यक्त करण्याचे प्रतीक म्हणून, इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो हे देखील या कार्यक्रमात पंतप्रधानांसोबत सहभागी झाले.India-Indonesia Joint Statement on the State Visit by Prime Minister of India to Indonesia
July 07th, 05:15 pm
At the invitation of Indonesian President Prabowo Subianto, PM Modi is on a State Visit to Indonesia from 6-8 July 2026. PM Modi's visit reflects the shared commitment of the two leaders to achieve a substantial upward trajectory in the India-Indonesia Comprehensive Strategic Partnership. The two leaders held discussions at Istana Merdeka in Jakarta, covering the full spectrum of bilateral relations.Our shared democratic values and common aspirations will take India-Indonesia relations to new heights: PM Modi at Indonesia Parliament
July 07th, 03:15 pm
Addressing the Parliament of Indonesia in Jakarta, PM Modi spoke about the deep civilisational and democratic ties between India and Indonesia. He also highlighted their maritime partnership, proposed the Ganga-Mahakam Vision and called for closer cooperation across development, security and the Global South, while reaffirming a free, open, inclusive and rules-based Indo-Pacific.पंतप्रधानांनी इंडोनेशियाच्या संसदेला केले संबोधित
July 07th, 03:00 pm
पंतप्रधानांनी आपल्या संबोधनाची सुरुवात इंडोनेशियाचे अध्यक्ष महामहीम प्रबोवो सुबियांतो यांच्या सन्माननीय उपस्थितीबद्दल त्यांचे, आणि संसदेच्या अध्यक्षा महामहीम पुआन महारानी यांनी दिलेल्या अगत्यपूर्ण आमंत्रणाबद्दल व भारत-इंडोनेशिया भागीदारीतील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल आभार मानून केली. भारताच्या 1.4 अब्ज जनतेच्या वतीने खासदारांना शुभेच्छा देताना ते म्हणाले की, 'लोकशाहीची जननी' या नात्याने भारत इंडोनेशियासोबतचे लोकशाही संबंध अधिक दृढ करण्यासाठी उत्सुक आहे. दोन्ही देशांमधील सखोल सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि सागरी संबंध अधोरेखित करत, दोन सहस्रकांहून अधिक काळ हिंदी महासागराने विचार, व्यापार, संस्कृती आणि श्रद्धेच्या देवाणघेवाणीद्वारे भारत आणि इंडोनेशियाला जोडले असल्याची आठवण पंतप्रधानांनी करून दिली. 'वसुधैव कुटुंबकम्' आणि 'भिन्नेक तुंगल इका' (विविधतेत एकता) या दोन्ही देशांच्या समान आदर्शांचा उल्लेख करत त्यांनी स्पष्ट केले की, ही मूल्ये आजही दोन्ही देशांमधील भागीदारीला दिशा देत आहेत. ते पुढे म्हणाले की, समान ऐतिहासिक प्रवास, समान आव्हाने आणि दोन्ही देशांतील जनतेच्या समान आकांक्षा यामुळे भारत आणि इंडोनेशिया नैसर्गिक आणि विश्वासू भागीदार म्हणून एकत्र आले आहेतपंतप्रधानांची इंडोनेशियाच्या अध्यक्षांसोबत अधिकृत चर्चा
July 07th, 02:51 pm
इंडोनेशियाच्या आपल्या अधिकृत शासकीय दौऱ्याचा एक भाग म्हणून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज इंडोनेशिया प्रजासत्ताकाचे अध्यक्ष महामहीम प्रबोवो सुबियांतो यांनी इस्तना मर्डेका (राष्ट्रपती भवन) येथे उत्साहात स्वागत केले आणि त्यांना समारंभपूर्वक मानवंदना देण्यात आली. जानेवारी 2025 मध्ये भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे मुख्य अतिथी म्हणून अध्यक्ष प्रबोवो यांनी केलेल्या भारत दौऱ्यानंतर दोन्ही नेत्यांमधील ही पहिलीच भेट होती.इंडोनेशियाच्या अध्यक्षांसोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान पंतप्रधानांचे प्रसारमाध्यमांसमोर निवेदन
July 07th, 11:21 am
आज सकाळी मला अत्यंत स्नेहभावनेने आणि आदराने इंडोनेशियाचा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला आहे. हा सन्मान कोट्यवधी भारतीयांचा आहे, इंडोनेशियातील जनतेच्या भावनांचा आहे, तसेच भारत आणि इंडोनेशियाच्या ऐतिहासिक आणि घनिष्ठ संबंधांचा आहे. मी अध्यक्ष प्रबोवोजी, इंडोनेशिया सरकार आणि येथील जनतेचे मनापासून आभार मानतो.पंतप्रधान मोदींचे जकार्ता येथे आगमन
July 06th, 05:03 pm
पंतप्रधान मोदी इंडोनेशियातील जकार्ता येथे पोहोचले. विमानतळावर राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांनी त्यांचे अत्यंत उत्साहात आणि आदरपूर्वक स्वागत केले.इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या तीन देशांच्या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांचे निवेदन
July 06th, 09:00 am
मी 6-11 जुलै 2026 दरम्यान म्यानमार, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या तीन देशांच्या दौऱ्यावर जात आहे. इंडोनेशिया प्रजासत्ताकाचे अध्यक्ष महामहीम प्रबोवो सुबियांतो यांच्या निमंत्रणावरून, मी 6-8 जुलै दरम्यान इंडोनेशियाला भेट देणार आहे. 2018 मधील माझ्या पहिल्या इंडोनेशिया भेटीदरम्यान भारत आणि इंडोनेशियाने द्विपक्षीय संबंधांना 'सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी' पर्यंत उंचावले होते. आपल्या द्विपक्षीय संबंधांना हे नवीन रूप मिळाल्यानंतरची ही माझी पहिलीच द्विपक्षीय भेट असेल, तसेच ही भेट अध्यक्ष प्रबोवो यांच्या भारत भेटीनंतर होत आहे, जे 26 जानेवारी 2025 रोजी आपल्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे मुख्य अतिथी होते. भारत आणि इंडोनेशिया यांच्यात अतिशय बळकट सांस्कृतिक आणि दोन्ही देशातील जनतेचे परस्परांसोबत संबंध आहेत आणि माझी ही भेट आमच्या बहुआयामी भागीदारीच्या सर्व पैलूंना अधिक बळकट करेल. या भेटीदरम्यान, मी इंडोनेशियातील भारतीय समुदायाशी संवाद साधेन आणि अध्यक्ष प्रबोवो यांच्यासोबत योग्यकर्ता येथील 'प्रम्बानन मंदिर' संकुलाला भेट देईन, जे आमच्यातील घनिष्ठ सांस्कृतिक संबंधांचे आणखी एक उल्लेखनीय उदाहरण आहे.पंतप्रधानांचा इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौरा
July 03rd, 08:42 pm
इंडोनेशिया प्रजासत्ताकाचे अध्यक्ष माननीय प्रबोवो सुबियांतो यांच्या निमंत्रणावरून, पंतप्रधान नरेंद्र मोदी 6-8 जुलै, 2026 दरम्यान इंडोनेशियाला भेट देणार आहेत. पंतप्रधानांचा हा इंडोनेशियाचा चौथा दौरा असेल, तर मे 2018 मध्ये भारत-इंडोनेशिया संबंध 'सर्वंकष धोरणात्मक भागीदारी' च्या पातळीवर पोहोचल्यानंतरची ही त्यांची पहिलीच द्विपक्षीय भेट असेल. या दौऱ्यात पंतप्रधान,अध्यक्ष प्रबोवो यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करतील आणि या भागीदारीतील प्रगतीचा आढावा घेतील. जकार्ता येथे पंतप्रधान, भारतीय समुदायाच्या एका मोठ्या मेळाव्याला संबोधित करतील. भारत आणि इंडोनेशियामध्ये ऐतिहासिक आणि जिव्हाळ्याचे परस्पर संबंध आहेत. हेच विशेष ऋणानुबंध जपत, पंतप्रधान इंडोनेशियातील युनेस्कोचे एक प्रमुख जागतिक वारसा स्थळ असलेल्या योग्याकर्ता येथील प्रंबनन मंदिर परिसराला भेट देतील.इंडोनेशिया, जकार्ता येथील श्री सनातन धर्म आलायम यांच्या महा कुंभाभिशेगम दरम्यान पंतप्रधानांचे संबोधन
February 02nd, 02:45 pm
काहीच दिवसांपुर्वी 140 कोटी भारतीयांचे प्रेम सोबत घेऊन राष्ट्रपती प्रबोवो भारतातून परतले आहेत. त्यांच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना प्रत्येक भारतीयाने दिलेल्या शुभेच्छा जाणवत असतील याची मला खात्री आहे.इंडोनेशियात जकार्ता येथे श्री सनातन धर्म अलायमच्या महा कुंभाभिषेगमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित
February 02nd, 02:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इंडोनेशियातील जकार्ता येथे श्री सनातन धर्म अलायमच्या महा कुंभभिषेगमला व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले. त्यांनी महामहिम, अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो, मुरुगन टेंपल ट्रस्टचे अध्यक्ष पा हाशिम, व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. कोबलन, तमिळनाडू आणि इंडोनेशियाचे मान्यवर, पुजारी आणि आचार्य, भारतीय वंशाचे सदस्य, या शुभ प्रसंगाचा भाग असलेले इंडोनेशिया आणि इतर देशातील नागरिक तसेच ज्या प्रतिभावान कलाकारांमुळे हे दैवी आणि भव्य मंदिर प्रत्यक्षात आले त्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.या आठवड्यात भारताची जगाने घेतलेली नोंद
January 29th, 12:34 pm
या आठवड्यात, भारताने अनेक आघाड्यांवर लक्षणीय प्रगती केली आहे, परदेशी गुंतवणुकीला चालना देण्यापासून ते आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन आणि आपली तांत्रिक आणि संरक्षण क्षमता वाढवण्यापर्यंत. भारताने जागतिक क्षेत्रात आपले वाढते स्थान ठामपणे प्रदर्शित केले. या आठवड्यात भारताने गाठलेले जागतिक टप्पे जाणून घ्या.भारताचा 76वा प्रजासत्ताक दिन साजरा
January 26th, 12:30 pm
कर्तव्य पथावर पार पडलेल्या 76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात भारताची एकता, सामर्थ्य आणि वारशाचे दर्शन घडवण्यात आले. पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय समर स्मारकावर आदरांजली अर्पण केली. या कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांची प्रमुख उपस्थिती होती. शिस्तबद्ध पद्धतीने जाणाऱ्या सशस्त्र दलांच्या पथकांनी शिस्त आणि शौर्याची चुणूक दाखवली, तर विविधरंगी सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सादरीकरणातून भारताच्या समृद्ध विविधतेवर प्रकाश टाकण्यात आला. भारतीय हवाई दलाच्या चित्तथरारक हवाई कसरतींनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले. या सोहळ्यासाठी जमलेल्या लोकांनाही पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या.करारांची सूची : इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षांचा भारत दौरा (23-26 जानेवारी 2025)
January 25th, 08:54 pm
भारताचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि इंडोनेशियाचे आरोग्य मंत्रालय यांच्यातील आरोग्य सहकार्यावरील सामंजस्य करार.राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांचे स्वागत करून भारत गौरवान्वित झाला आहे: पंतप्रधान
January 25th, 05:48 pm
इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांचे स्वागत करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की भारत-इंडोनेशिया सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या विविध पैलूंवर चर्चा झाली. इंडोनेशिया आमच्या ऍक्ट ईस्ट धोरणाच्या केंद्रस्थानी आहे आणि भारत इंडोनेशियाच्या ब्रिक्स सदस्यत्वाचे स्वागत करतो असे त्यांनी अधोरेखित केले.इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षांसोबत संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधानांचे निवेदन
January 25th, 01:00 pm
भारताच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनासाठी इंडोनेशिया आपला मुख्य अतिथी देश होता आणि आपल्यासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे की, आपण आपला 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना, इंडोनेशिया पुन्हा एकदा या महत्त्वाच्या प्रसंगाचा एक भाग बनत आहे. या प्रसंगी मी राष्ट्राध्यक्ष प्रबोवो यांचे भारतात हार्दिक स्वागत करतो.पंतप्रधान आणि इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष यांची झाली भेट
November 19th, 06:09 am
ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे जी-20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडोनेशियाचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष एचई प्रबोवो सुबियांटो यांची आज भेट घेतली. दोन्ही नेत्यांची ही पहिलीच भेट होती.इंडोनेशियाच्या नवनिर्वाचित अध्यक्षांनी पंतप्रधानांशी दूरध्वनीवरून साधला संवाद, उभय नेत्यांनी धोरणात्मक भागीदारीवर केली चर्चा
June 20th, 01:07 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आज इंडोनेशियाचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांनी दूरध्वनीवरून संवाद साधला.