झाम्बियाच्या राष्ट्राध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष हाकाइंडे हिचिलेमा यांचे अभिनंदन केले

August 20th, 09:50 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झाम्बियाच्या राष्ट्राध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल राष्ट्राध्यक्ष हाकाइंडे हिचिलेमा यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

President’s address on the eve of 80th Independence Day reflects the nation’s strength and inspires renewed determination for a Viksit Bharat: PM

August 14th, 08:44 pm

Prime Minister Shri Narendra Modi today lauded the address delivered by President of India, Smt. Droupadi Murmu, on the eve of 80th Independence Day noting that it was motivating and thoughtful.

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनाप्रसंगी पंतप्रधानांच्या संबोधनाचा मूळ मजकूर

August 12th, 09:45 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या “ट्रायम्फ ऑफ द इंडियन रिपब्लिक: माय लाइफ, माय स्ट्रगल्स” (Triumph of the Indian Republic: My Life, My Struggles) या आत्मचरित्राचे प्रकाशन केले. उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले, “आज आपल्याला रामनाथ कोविंद जी यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन करण्याची संधी मिळाली आहे आणि मी या कार्यक्रमाचा एक भाग बनलो याचा मला आनंद आहे.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन

August 12th, 09:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या “ट्रायम्फ ऑफ द इंडियन रिपब्लिक: माय लाइफ, माय स्ट्रगल्स” (Triumph of the Indian Republic: My Life, My Struggles) या आत्मचरित्राचे प्रकाशन केले. उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले, “आज आपल्याला रामनाथ कोविंद जी यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन करण्याची संधी मिळाली आहे आणि मी या कार्यक्रमाचा एक भाग बनलो याचा मला आनंद आहे.”

पंतप्रधानांच्या हस्ते 12 ऑगस्ट रोजी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन

August 11th, 01:22 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 12ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या 'ट्रायम्फ ऑफ द इंडियन रिपब्लिक: माय लाईफ, माय स्ट्रगल्स' या आत्मचरित्राचे प्रकाशन करणार आहेत. यावेळी पंतप्रधान उपस्थितांना संबोधितही करतील.

अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांनी साधला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद

August 08th, 10:58 pm

अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे. डी. व्हान्स यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.

अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या 250 व्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधानांच्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना शुभेच्छा

July 04th, 09:40 pm

अमेरिकेच्या स्वातंत्र्याला 250 वर्षे पूर्ण झाल्याच्या ऐतिहासिक घटनेनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड जे. ट्रम्प आणि अमेरिकेच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. मोदी यांनी आपल्या संदेशात भारत-अमेरिका यांच्यातील कायम टिकून असलेल्या भागीदारीची ताकद अधोरेखित केली आहे. या दोन लोकशाही देशांमधील संबंध धोरणात्मक भागीदारीच्याही पलीकडचे असून, ते दोन्ही देशांची समान लोकशाही मूल्ये, कायद्याचे राज्य आणि आपापल्या जनतेच्या अफाट क्षमतेवरील विश्वास या पायावर आधारलेले असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

पंतप्रधानांचा सेशेल्सचा राजकीय दौरा (27 ते 29 जून, 2026)

June 25th, 06:05 pm

सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी यांच्या निमंत्रणावरून, भारताच्या 'महासागर' संकल्पनेला पुढे नेण्यासाठी पंतप्रधान मोदी 27-29 जून 2026 दरम्यान सेशेल्सचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, ते सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याला 'प्रमुख पाहुणे' म्हणून उपस्थित राहणार असून राष्ट्राध्यक्ष हर्मिनी यांच्याशी चर्चा करतील. तसेच, ते सेशेल्सच्या नॅशनल असेंब्लीला (संसदेला) संबोधित करतील आणि तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या जन्मदिनी, त्यांच्यासोबत ओदिशातील पहाडपूर गावाला दिली भेट

June 20th, 08:58 pm

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या वाढदिवशी त्यांच्यासोबत ओदिशातील पहाडपूर गावाला भेट देणे हा आपण आपला बहुमान मानत असल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. पहाडपूर हे राष्ट्रपतींचे स्वतःचे गाव असून त्यांनी केलेले कार्य खरोखरच अत्यंत प्रेरणादायी असल्याचेही पंतप्रधानांनी म्हटले आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थनाही केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह पहाडपूर गावातील गोसानी पीठ येथे केली प्रार्थना

June 20th, 08:54 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, त्यांनी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पहाडपूर गावातील गोसानी पीठ येथे प्रार्थना केली.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह पंतप्रधानांनी पहाडपूर गावातील संथाली जहेरा व हो जहेरा इथे वाहिली आदरांजली

June 20th, 08:51 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासमवेत पहाडपूर गावातील संथाली जहेरा व हो जहेरा इथे आदरांजली वाहिली.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कुटुंबीयांच्या पहाडपूर येथील समाधीस्थळावर पंतप्रधानांकडून पुष्पांजली अर्पण

June 20th, 08:47 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहाडपूर येथील शाळेच्या परिसरात असलेल्या दिवंगत श्याम चरण मुर्मू, लखन मुर्मू आणि सिपुन मुर्मू यांच्या समाधीस्थळावर पुष्पांजली अर्पण केली.

पंतप्रधानांनी पहाडपूर गावातील शाळेला दिली भेट; शैक्षणिक पायाभूत सुविधांमध्ये सुधारणेसाठी केलेल्या प्रयत्नांवर टाकला प्रकाश

June 20th, 08:44 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, पहाडपूर गावातील शाळेला भेट देताना आपल्याला आनंद झाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली स्लोव्हाक प्रजासत्ताकाच्या राष्ट्राध्यक्षांची भेट

June 15th, 11:33 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ब्रातिस्लावा येथील राष्ट्रपती भवनात स्लोव्हाक प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांची भेट घेतली.

पंतप्रधानांनी इटलीच्या राष्ट्रपतींची घेतली भेट

May 20th, 07:19 pm

भारत-इटली संबंध अधिक दृढ करण्यासाठी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि नेतृत्वाबद्दल पंतप्रधानांनी राष्ट्रपती मॅटारेला यांचे आभार मानले. दोन्ही नेत्यांनी भारत-इटली सामरिक सहयोगाच्या वाढत्या प्रगतीची नोंद घेतली आणि व्यापार- गुंतवणूक, विज्ञान- तंत्रज्ञान, संशोधन - नवोपक्रम, संरक्षण -सुरक्षा, अवकाश, ऊर्जा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती आणि लोकांमधील संबंध या क्षेत्रांत सुरू असलेल्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले.त्यांनी उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवरही विचारांची देवाणघेवाण केली.

राज्यसभेवर नामनियुक्त झाल्याबद्दल हरिवंश यांना पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

April 10th, 02:20 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हरिवंश यांना राष्ट्रपतींद्वारे राज्यसभेवर नामनियुक्त झाल्यानंतर त्यांच्या आगामी संसदीय कार्यकाळासाठी मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

व्हिएतनामच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तो लाम यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

April 07th, 12:32 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिएतनामच्या अध्यक्षपदी निवड झालेले तो लाम यांचे हार्दिक अभिनंदन केले.

पश्चिम बंगालमध्ये झालेल्या राष्ट्रपतींच्या अवमानाचा आणि संथाल संस्कृतीच्या निरादराचा पंतप्रधानांकडून निषेध

March 07th, 08:14 pm

पंतप्रधान म्हणाले की, या घटना लज्जास्पद आणि आधी कधीच न घडलेल्या आहेत. लोकशाहीवर आणि आदिवासी समुदायाच्या सक्षमीकरणावर विश्वास असणाऱ्या प्रत्येकाला या घटनेचे अत्यंत दुःख झाले आहे.

केरळ राज्याचे नाव बदलून केरळम् असे करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

February 24th, 03:20 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केरळ राज्याचे नाव बदलून केरळम् असे करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.

स्पेनचे राष्‍ट्राध्यक्ष पेड्रो सांचेझ भारत दौ-यावर

February 18th, 05:08 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून, स्पेनचे राष्‍ट्राध्यक्ष पेड्रो सांचेझ 18 आणि 19 फेब्रुवारी असे दोन दिवस ‘इंडिया एआय इम्पॅक्ट’ शिखर परिषद- 2026 मध्ये सहभागी होण्यासाठी भारताच्या अधिकृत दौऱ्यावर आले आहेत. याआधी 27 ते 29 ऑक्टोबर, 2024 या दरम्यान झालेल्या त्यांच्या द्विपक्षीय भेटीनंतर, त्यांचा हा दुसरा अधिकृत भारत दौरा आहे. त्यांच्याबरोबर डिजिटल परिवर्तन आणि नागरी सेवा मंत्री ऑस्कर लोपेझ अगुएडा आणि स्पेनचे कृषी, मत्स्यव्यवसाय तसेच अन्न मंत्री लुईस प्लानस पुचाडेस् हेही भारत भेटीवर आले आहेत.