आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 54 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकल्याबद्दल मुष्टियोद्धा प्रीती पवारचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

October 03rd, 11:23 pm

आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 54 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकल्याबद्दल मुष्टियोद्धा प्रीती पवारचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.19-वर्षीय मुलीच्या कामगिरीचा मला अभिमान वाटतो . तिचे सातत्य, निष्ठा आणि कधीही हार न मानण्याच्या वृत्तीचा हा दाखला आहे.