वाराणसीहून चार वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवताना पंतप्रधानांनी केलेले भाषण
November 08th, 08:39 am
उत्तर प्रदेशचे उर्जावान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी आणि विकसित भारताचा मजबूत पाया रचण्यासाठी आज तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात होत असलेल्या उत्कृष्ट कामाचे नेतृत्व करणारे अश्विनी वैष्णव जी, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या कार्यक्रमात आपल्यासोबत एर्नाकुलम इथून सहभागी झालेले केरळचे राज्यपाल श्री राजेंद्र आर्लेकर जी, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी सुरेश गोपी जी, जॉर्ज कुरियन जी, केरळमधील या कार्यक्रमात उपस्थित असलेले इतर सर्व मंत्री आणि लोकप्रतिनिधी, फिरोजपूर इथून जोडले गेलेले केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी आणि पंजाबचे नेते रवनीत सिंग बिट्टू जी, तेथे उपस्थित असलेले सर्व लोकप्रतिनिधी, लखनौ इथून जोडले गेलेले उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक जी, इतर मान्यवर आणि काशीतील माझे कुटुंबीय.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीहून चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना दाखवला हिरवा झेंडा
November 08th, 08:15 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. देशाच्या आधुनिक रेल्वे पायाभूत सुविधांचा विस्तार करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले आणि बाबा विश्वनाथांचे पवित्र शहर असलेल्या वाराणसीतील सर्व कुटुंबांना आदरपूर्वक शुभेच्छा दिल्या. देव दिवाळीच्या काळात झालेल्या अद्वितीय उत्सवाचे त्यांनी कौतुक केले आणि आजचा दिवसदेखील एक शुभ प्रसंग असल्याचे सांगितले. विकासाच्या या उत्सवासाठी त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.Mahagathbandhan is a bundle of lies: PM Modi in Arrah, Bihar
November 02nd, 02:00 pm
Massive crowd attended PM Modi’s public rally in Arrah, Bihar, today. Addressing the gathering, the PM said that when he sees the enthusiasm of the people, the resolve for a Viksit Bihar becomes even stronger. He emphasized that a Viksit Bihar is the foundation of a Viksit Bharat and explained that by a Viksit Bihar, he envisions strong industrial growth in the state and employment opportunities for the youth within Bihar itself.PM Modi addresses large public gatherings in Arrah and Nawada, Bihar
November 02nd, 01:45 pm
Massive crowd attended PM Modi’s rallies in Arrah and Nawada, Bihar, today. Addressing the gathering in Arrah, the PM said that when he sees the enthusiasm of the people, the resolve for a Viksit Bihar becomes even stronger. He emphasized that a Viksit Bihar is the foundation of a Viksit Bharat and explained that by a Viksit Bihar, he envisions strong industrial growth in the state and employment opportunities for the youth within Bihar itself.नवा रायपूर येथे शांती शिखर- ब्रह्माकुमारी ध्यान केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
November 01st, 11:15 am
ॐ शांती! छत्तीसगडचे राज्यपाल रमन डेका जी, राज्याचे लोकप्रिय आणि ऊर्जावान मुख्यमंत्री विष्णू देव साय जी, राजयोगिनी भगिनी जयंती जी, राजयोगी मृत्युंजय जी, सर्व ब्रह्मकुमारी भगिनी, येथे उपस्थित असलेले इतर मान्यवर, स्त्री-पुरुष हो!पंतप्रधानांच्या हस्ते छत्तीसगढमधील नवा रायपूर येथील ‘शांती शिखर’ या ध्यान केंद्राचे उद्घाटन, ब्रह्मकुमारींनाही केले संबोधित
November 01st, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज छत्तीसगढमधील नवा रायपूर येथे आध्यात्मिक शिक्षण, शांतता आणि ध्यानधारणेसाठीच्या ‘शांती शिखर’ या आधुनिक केंद्राचे उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी ब्रह्मकुमारींना संबोधितही केले. छत्तीसगढच्या स्थापनेला 25 वर्षे पूर्ण झाली असल्याने आजचा दिवस अत्यंत विशेष आहे, ही बाब त्यांनी अधोरेखित केले. आज देशभरातील अनेक राज्ये आपला राज्य स्थापना दिवस साजरा करत असल्याचे सांगून, छत्तीसगढसोबतच, झारखंड आणि उत्तराखंड या राज्यांच्या स्थापनेलाही 25 वर्षे पूर्ण झाली असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी पंतप्रधानांनी या सर्व राज्यांच्या नागरिकांना त्यांच्या राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छाही दिल्या. राज्यांचा विकास राष्ट्राच्या प्रगतीला चालना देतो, या मार्गदर्शक तत्त्वानेच प्रेरित होऊन आपण विकसित भारताच्या निर्मितीच्या ध्येयपूर्तीच्या दिशेने काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.Prime Minister presents replica of Ram Mandir and Holy Water to Trinidad & Tobago Prime Minister
July 04th, 08:57 am
At a special dinner hosted by PM Kamla Persad-Bissessar, PM Modi gifted a replica of the Ram Mandir and holy water from Saryu and Mahakumbh, symbolising the deep cultural and spiritual ties between India and Trinidad & Tobago.महाराष्ट्रात नागपूर येथील माधव नेत्रालय प्रिमियम सेंटरच्या भूमिपूजन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
March 30th, 11:53 am
गुढी पाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना अतिशय मनःपूर्वक शुभेच्छा! कार्यक्रमाला उपस्थित असलेले सरसंघचालक डॉ. मोहन भागवत जी, स्वामी गोविंद गिरी महाराज जी, स्वामी अवधेशानंद गिरी महाराज जी, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, केंद्रिय मंत्रीमंडळातले माझे सहकारी नितीन गडकरी जी, डॉ. अविनाशचंद्र अग्निहोत्री जी, अन्य मान्यवर आणि इथे उपस्थित असलेल्या सर्व वरीष्ठ सहकाऱ्यांनो, आज या राष्ट्र यज्ञाच्या पवित्र कार्यक्रमात सहभागी होण्याचे भाग्य मला लाभले आहे. आजचा चैत्र शुद्ध प्रतिपदेचा हा दिवसही खास आहे. आजपासून नवरात्र सुरू होत आहे. देशाच्या निरनिराळ्या भागात आज गुढी पाडवा, उगादी आणि नवरेह सण साजरा केला जात आहे. आज भगवान झुलेलाल आणि गुरू अंगद देव यांचा प्रकटदिन देखील आहे. आमचे प्रेरणास्थान, परमपूज्य डॉक्टरसाहेबांचीही आज जयंती आहे आणि याच वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गौरवशाली परंपरेला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. आजच्या दिवशी स्मृती मंदिराला भेट देऊन पूज्य डॉक्टर साहेब आणि गुरुजी यांना आदरांजली अर्पण करता आली, हे मी माझं भाग्य समजतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील नागपूर येथे माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरची केली पायाभरणी
March 30th, 11:52 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रातील नागपूर येथे माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरची पायाभरणी केली. उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी पवित्र नवरात्रोत्सवाचा प्रारंभ म्हणजेच चैत्र शुक्ल प्रतिपदेचे महत्त्व अधोरेखित केले. देशभरात आज गुढी पाडवा, उगादी आणि नवरेह असे सण साजरे केले जात असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. याच दिवसाला जोडून येणाऱ्या भगवान झुलेलाल आणि गुरु अंगद देव यांच्या जयंतीचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले. हा दिवस प्रेरणादायी डॉ. के. बी. हेडगेवार यांची जयंती तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) गौरवशाली प्रवासाच्या शताब्दी वर्षाची आठवण करून देणारा असल्याचेही त्यांनी सांगितले. आजच्या महत्त्वपूर्ण दिवशी डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींना आदरांजली वाहण्यासाठी स्मृती मंदिराला भेट देणे हा आपल्यासाठी सन्मान असल्याचे त्यांनी सांगितले.Mahakumbh has strengthened the spirit of ‘Ek Bharat, Shreshtha Bharat’ by uniting people from every region, language, and community: PM Modi
March 18th, 01:05 pm
PM Modi while addressing the Lok Sabha on Mahakumbh, highlighted its spiritual and cultural significance, likening its success to Bhagirath’s efforts. He emphasized unity, youth reconnecting with traditions, and India's ability to host grand events. Stressing water conservation, he urged expanding river festivals. Calling it a symbol of ‘Ek Bharat, Shreshtha Bharat,’ he hailed Mahakumbh’s legacy.महाकुंभ मेळ्याच्या यशस्वी सांगतेनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोकसभेत संबोधन
March 18th, 12:10 pm
उत्तर प्रदेशमध्ये प्रयागराज इथल्या महाकुंभ मेळ्याच्या यशस्वी सांगतेनिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत भाषण केले. महाकुंभच्या यशस्वी आयोजनामध्ये योगदान दिलेल्या देशातल्या असंख्य नागरिकांप्रती त्यांनी कृतज्ञताभाव व्यक्त केला. महाकुंभच्या यशात विविध व्यक्ती आणि संस्थांचा वाटा असल्याचे अधोरेखित करुन यामध्ये सहभागी सरकार, समाज आणि सर्व समर्पित कामगारांचे त्यांनी आभार मानले. देशभरातून आलेल्या भाविकांचे आभार मानताना त्यांनी उत्तर प्रदेशमधील भाविकांचा विशेष उल्लेख केला, त्यातही प्रयागराजमधील भाविकांनी दिलेल्या अमूल्य पाठिंब्यासाठी आणि सहभागासाठी त्यांचे विशेष आभार मानले.महाकुंभाच्या सांगतेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुजरातमधील सोमनाथ मंदिराला भेट
March 02nd, 08:32 pm
प्रयागराज इथे संपन्न झालेल्या महाकुंभ मेळाव्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील सोमनाथ मंदिराला भेट दिली.हे मंदिर कालातीत वारसा आणि आपल्या संस्कृतीचे धैर्य यांचे दर्शन घडवतेअसे त्यांनी म्हटले आहे.NXT कॉन्क्लेवमध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण
March 01st, 11:00 am
NewsX World याची शुभ सुरुवात आणि यासाठी मी तुम्हा सर्वांचे खूप-खूप अभिनंदन करतो, खूप-खूप शुभेच्छा देतो. तुमच्या नेटवर्कमधील हिंदी आणि इंग्रजीसहित सर्व प्रादेशिक वाहिन्या आज तुम्ही ग्लोबल होत आहात आणि आज अनेक fellowships आणि scholarship ची देखील सुरुवात झाली आहे. मी या कार्यक्रमांसाठी तुम्हा सर्वांना खूप-खूप शुभेच्छा देतो.NXT Conclave या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सहभाग
March 01st, 10:34 am
नवी दिल्ली मधील भारत मंडपम इथे आजपासून NXT Conclave या परिषदेला सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज या परिषदेत सहभागी झाले. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधितही केले. यावेळी त्यांनी NewsX World या माध्यम समुहाच्या शुभारंभाबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदनही केले. या माध्यम समुहात हिंदी, इंग्रजी आणि विविध प्रादेशिक भाषांमधील वाहिन्यांचा समावेश असून, या समूहाने आज जागतिक समूह होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली असल्याची बाबही त्यांनी अधोरेखित केली. या समुहाने अनेक पाठ्यवृत्ती आणि शिष्यवृत्ती कार्यक्रम सुरु केला असल्याचे सांगून या कार्यक्रमांसाठी त्यांनी शुभेच्छाही दिल्या.बिहारमधील भागलपूर येथे विकास प्रकल्पांच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांचे भाषण
February 24th, 02:35 pm
मंचावर विराजमान राज्यपाल आरिफ मोहम्मद खान जी, बिहार चे लोकप्रिय आणि बिहारच्या विकासासाठी समर्पित आमचे लाडके मुख्यमंत्री नीतीश कुमार जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी शिवराजसिंह चौहान जी, जीतन राम मांझी जी, ललन सिंह जी, गिरीराज सिंह जी, चिराग पासवान जी, राज्यमंत्री रामनाथ ठाकूर जी, बिहार सरकारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी जी, विजय सिन्हा जी, राज्याचे इतर मंत्री आणि लोकप्रतिनिधीगण, उपस्थित मान्यवर आणि बिहारच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता जारी,बिहारमधील भागलपूर येथून विकास प्रकल्पांचे केले उद्घाटन
February 24th, 02:30 pm
शेतकऱ्यांच्या कल्याणाप्रति आपल्या वचनबद्धतेला अनुसरत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधील भागलपूर येथून पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता जारी केला.याप्रसंगी त्यांनी अनेक विकास प्रकल्पांचे देखील उद्घाटन केले. मोदी यांनी सर्व मान्यवरांचे आणि कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीमार्फत सहभागी झालेल्या लोकांचे स्वागत केले. महाकुंभच्या पवित्र काळात मंदारचलच्या भूमीवर पाऊल ठेवणे हे मोठे भाग्य असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की या भूमीमध्ये आध्यात्म,वारसा आणि विकसित भारताची क्षमता देखील आहे. ही शहीद तिलका मांझी यांची भूमी आहे तसेच रेशीम नगरी म्हणून देखील प्रसिद्ध आहे असे मोदी म्हणाले. बाबा अजगैबीनाथांच्या पवित्र भूमीत महाशिवरात्रीसाठी जोरदार तयारी देखील सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. अशा पवित्र मुहूर्तावर पीएम किसानचा 19 वा हप्ता जारी करण्याचे भाग्य मला लाभले आणि थेट लाभ हस्तांतरणाद्वारे सुमारे 22,000 कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले.बागेश्वर धाम वैद्यकीय आणि विज्ञान संशोधन संस्थेच्या पायाभरणी प्रसंगी पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर
February 23rd, 06:11 pm
भैया हरौ बोलो मतंगेश्वर भगवान की जै, बागेश्वर धाम की जै, जय जटाशंकर धाम की जै, अपुन ओंरण खाँ मोरी तरफ सें दोई हाँथ, जोर के राम-राम जू।पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बागेश्वर धाम वैद्यकीय आणि विज्ञान संशोधन संस्थेची केली पायाभरणी
February 23rd, 04:25 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मध्यप्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील गढा गावात बागेश्वर धाम वैद्यकीय आणि विज्ञान संशोधन संस्थेची पायाभरणी झाली. अगदी काही दिवसातच बुंदेलखंडमध्ये दुसऱ्यांदा उपस्थित राहण्याचे भाग्य लाभल्याचे सांगत पंतप्रधान म्हणाले की, आध्यात्मिक केंद्र असलेले बागेश्वर धाम आता आरोग्य केंद्र देखील होणार आहे. त्यांनी सांगितले की, 10 एकर क्षेत्रात उभारण्यात येणाऱ्या बागेश्वर धाम वैद्यकीय आणि विज्ञान संशोधन संस्थेमध्ये पहिल्या टप्प्यात 100 खाटांचे रुग्णालय उभारले जाईल.प्रयागराज मधल्या महाकुंभाला उपस्थित राहण्याचे भाग्य लाभले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
February 05th, 12:46 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रयागराज येथे महाकुंभाला भेट दिली आणि संगमावर जाऊन पवित्र स्नान केले.पंतप्रधान प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्याला 5 फेब्रुवारी रोजी देणार भेट
February 04th, 07:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 फेब्रुवारी 2025 रोजी प्रयागराज येथे महाकुंभ मेळा-2025 ला भेट देणार आहेत. सकाळी 11 वाजताच्या सुमारास ते संगमावर पवित्र स्नान करून गंगा मातेची पूजाअर्चना करतील.