लखनौ इथे राष्ट्र प्रेरणा स्थळ उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन
December 25th, 06:16 pm
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, इथले लोकप्रिय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे वरिष्ठ सहयोगी आणि लखनौचे खासदार, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह जी, उत्तर प्रदेश भाजपा अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी श्रीमान पंकज चौधरी जी, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, ब्रजेश पाठक जी, उपस्थित अन्य मंत्रीगण, लोकप्रतिनिधी,महिला आणि पुरुषहो,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लखनौ इथल्या राष्ट्र प्रेरणा स्थळाचे उद्घाटन
December 25th, 05:23 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उत्तर प्रदेशातील लखनौ इथल्या राष्ट्र प्रेरणा स्थळाचे उद्घाटन झाले. माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवन आणि आदर्शांचा गौरव करण्यासाठी याची उभारणी केली आहे. यावेळी पंतप्रधानांनी माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या 101 व्या जयंती दिनानिमीत्त आयोजित कार्यक्रमाला संबोधितही केले.आज लखनौ ची ही भूमी एका नव्या प्रेरणेची साक्षीदार बनली आहे असे ते यावेळी म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी देशासह जागतिक समुदायाला नाताळच्या शुभेच्छा दिल्या. भारतातही लाखो ख्रिश्चन कुटुंबे आज हा सण साजरा करत असल्याचे त्यांनी नमूद केले. नाताळचा हा सण प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद घेऊन येवो अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली.प्रणब मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
December 11th, 10:34 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रणब मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. आपल्या अनेक दशकांच्या सार्वजनिक जीवनात अढळ निष्ठेने भारताची सेवा करणारे प्रणब मुखर्जी हे एक दूरदृष्टीचे राजकारणी आणि अपवादात्मक बुद्धिमत्तेचे विद्वान व्यक्तिमत्व होते, अशा शब्दांत पंतप्रधानांनी त्यांचा गौरव केला आहे.An RSS shakha is a ground of inspiration, where the journey from 'me' to 'we' begins: PM Modi
October 01st, 10:45 am
In his address at the centenary celebrations of the Rashtriya Swayamsevak Sangh (RSS), PM Modi extended his best wishes to the countless swayamsevaks dedicated to the resolve of national service. He announced that, to commemorate the occasion, the GoI has released a special postage stamp and a coin. Highlighting the RSS’ five transformative resolutions, the PM remarked that in times of calamity, swayamsevaks are among the first responders.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी सोहळ्याला संबोधित केले
October 01st, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले आणि कार्यक्रमाला संबोधित केले. पंतप्रधान मोदी यांनी सर्व नागरिकांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या, आणि आज महानवमी आणि देवी सिद्धिदात्रीचा दिवस असल्याचे नमूद केले. ते म्हणाले की, उद्या विजयादशमीचा भव्य उत्सव आहे. हा दिवस, अन्यायावर न्यायाचा, असत्यावर सत्याचा आणि अधःकारावर प्रकाशाचा विजय, हे भारतीय संस्कृतीचे कालातीत सत्य अधोरेखित करतो.For me, the nation itself is divine and mankind is a reflection of the divine: PM Modi in Lex Fridman Podcast
March 16th, 11:47 pm
PM Modi interacted with Lex Fridman in a podcast about various topics ranging from fasting to his humble beginnings to AI and more. He stressed on the unifying power of sports and said that they connect people on a deeper level and energize the world. He remarked that the management of Indian elections should be studied worldwide.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका पॉडकास्टमध्ये लेक्स फ्रिडमन यांच्याशी साधला संवाद
March 16th, 05:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका पॉडकास्टच्या माध्यमातून आज अमेरिकी संगणक शास्त्रज्ञ लेक्स फ्रिडमन यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधला. या मनमोकळ्या संभाषणादरम्यान जेव्हा पंतप्रधानांना विचारण्यात आले की ते उपवास का करतात आणि कशा पद्धतीने करतात तेव्हा मोदी यांनी पंतप्रधानांप्रती आदराचे प्रतीक म्हणून स्वतः उपवास धरण्याच्या लेक्स फ्रिडमन यांच्या कृतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “भारतात धार्मिक परंपरा दैनंदिन जीवनासोबत खोलवर रुजलेल्या आहेत ,” असे पंतप्रधान म्हणाले. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या अर्थानुसार, हिंदुत्व हे केवळ धार्मिक रीतीभातीविषयीचे तत्व नसून जीवनाला मार्गदर्शन करणारे तत्वज्ञान आहे असे त्यांनी सांगितले. उपवास हे शिस्त अंगी बाणवण्यासाठीचे तसेच आंतरिक आणि बाह्य आत्म्याचा समतोल साधण्यासाठीचे साधन आहे यावर मोदी यांनी अधिक भर दिला. उपवास केल्यामुळे आपल्या जाणीवा अधिक संवेदनशील तसेच जागरूक होऊन अधिक प्रखर बनतात असे त्यांनी नमूद केले. उपवासाच्या काळात कोणाकोणाला सूक्ष्म सुगंध आणि तपशील अधिक स्पष्टपणे जाणवतात असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. उपवासामुळे विचार प्रक्रियेला वेग येऊन नवीन दृष्टीकोन सापडत जातात आणि चौकटीबाहेरच्या विचारांना प्रोत्साहन मिळते असे देखील पंतप्रधानांनी अधोरेखित केले. उपवास म्हणजे केवळ अन्न वर्ज्य करणे नव्हे तर त्यामध्ये मनाची तसेच शरीराची तयारी आणि विषारी तत्वांचे निःसारण करण्याची शास्त्रीय प्रक्रिया समाविष्ट आहे असे त्यांनी स्पष्ट केले. कितीतरी दिवस आधीच ते आयुर्वेदिक आणि योग प्रक्रियांचे अनुसरण करून ते उपवासासाठी त्यांच्या शरीराला सज्ज करतात यावर अधिक भर देऊन पंतप्रधान मोदी यांनी या काळात पाणी पीत राहण्याचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की एकदा उपवास सुरु झाला की त्यानंतर ते त्याला भक्ती आणि स्वयंशिस्तीची कृती मानतात आणि त्या काळात सखोल आत्मचिंतन आणि लक्ष एकाग्र करण्यावर भर देतात. पंतप्रधान म्हणाले की त्यांच्या उपवासाचे मूळ वैयक्तिक अनुभवामध्ये असून त्यांच्या शालेय जीवनादरम्यान महात्मा गांधी यांच्या प्रेरणेतून सुरु झालेल्या चळवळीदरम्यान उपवास धरण्याची सुरुवात त्यांनी केली. त्यांच्या पहिल्याच उपवासादरम्यान त्यांना उर्जा आणि जागरुकता यामध्ये मोठी वाढ होत असल्याची अनुभूती आली आणि त्यातून उपवासाच्या परिवर्तनशील सामर्थ्याबद्दल त्यांची खात्री झाली असा अनुभव पंतप्रधानांनी सर्वांना सांगितला. उपवासामुळे त्यांच्या क्रिया मंद होत नाहीत तर उलट बहुतेकदा त्यांची उत्पादकता वाढते असे त्यांनी आवर्जून नमूद केले. ते म्हणाले की उपवासादरम्यान त्यांच्या विचारांचा ओघ अधिक मुक्तपणे आणि सर्जकतेसह वाहतो आणि त्यांच्यासाठी तो स्वतःला व्यक्त करण्याचा एक अतुलनीय अनुभव होऊन जातो.प्रणव मुखर्जींसोबतचे माझे सहवासाचे क्षण मी नेहमीच जपून ठेवेन : पंतप्रधान नरेंद्र मोदी
December 11th, 09:15 pm
प्रणव मुखर्जी यांच्या सहवासाचे क्षण आपण नेहमीच जपून ठेवणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले. प्रणव मुखर्जी यांच्याशी झालेल्या संवादाच्या अनेक आठवणींना उजाळा दिल्याबद्दल शर्मिष्ठा मुखर्जी यांचे आभार मानून पंतप्रधानांनी मुखर्जी यांच्या अद्वितीय अंतर्दृष्टीची आणि बुद्धीमत्तेची प्रशंसा केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे केले स्मरण.
December 11th, 10:29 am
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांचे स्मरण केले.माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
December 11th, 10:41 am
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.बांग्लादेशाच्या राष्ट्रीय दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
March 26th, 04:26 pm
PM Modi took part in the National Day celebrations of Bangladesh in Dhaka. He awarded Gandhi Peace Prize 2020 posthumously to Bangabandhu Sheikh Mujibur Rahman. PM Modi emphasized that both nations must progress together for prosperity of the region and and asserted that they must remain united to counter threats like terrorism.बांग्लादेशच्या राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमास पंतप्रधानांची उपस्थित
March 26th, 04:24 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या दोन दिवसीय बांग्लादेश दौऱ्यादरम्यान, बांग्लादेशच्या स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते . बांग्लादेशचे राष्ट्रपती महामहीम महंमद अब्दुल हामीद, पंतप्रधान महामहीम शेख हसीना, शेख मुजिब्बुर रहमान यांच्या कनिष्ठ कन्या शेख रेहाना, मुजीब बोर्शो उत्सवासाठीचे राष्ट्रीय अंमलबजावणी समितीचे मुख्य समन्वयक डॉ. कमाल अब्दुल नासीर चौधरी आणि अन्य मान्यवरांसह यावेळी मोडी यांच्या समवेत उपस्थित होते. तेजगांव येथे नॅशनल परेड स्क्वेअर येथे हा कार्यक्रम झाला. बांग्लादेशचे राष्ट्रपिता बंगबंधू शेख मुजिबुर रहमान यांच्या जन्मशताब्दीवर्ष सोहळ्याची सुरुवात यावेळी करण्यात आले.माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
August 31st, 06:53 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.भारतरत्न पुरस्काराच्या मानकऱ्यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
January 25th, 09:24 pm
यंदा भारतरत्न पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या मानकऱ्यांचे अभिनंदन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे.रालोआ सरकारने देशातील कार्यसंस्कृती बदलली: लोकसभेत पंतप्रधान मोदी
February 07th, 01:41 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभेत बोलताना सांगितले की, रालोआ सरकारने देशांतील कार्यसंस्कृती बदलली आहे. आता योजना पूर्ण विचारांती घेण्यात येतात आणि वेळेवर पूर्ण करण्यात येतात असेही त्यांनी सांगितले.लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्ताव चर्चेत पंतप्रधानांचे उत्तर
February 07th, 01:40 pm
आज लोकसभेत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की रालोआ सरकारने देशातील कार्यसंस्कृती बदलली आहे. आता योजना पूर्ण विचारांती घेण्यात येतात आणि वेळेवर पूर्ण करण्यात येतात असेही त्यांनी सांगितले.माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पंतप्रधानांचे एक पत्र शेअर केले, हे पत्र त्यांच्या मनाला स्पर्शून गेल्याचे म्हटले
August 03rd, 12:46 pm
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी, त्यांच्या कार्यालयातील शेवटच्या दिवशी पंतप्रधानांनी त्यांना पाठवलेली एक पत्र शेअर केले. ट्विटरवर त्यांनी म्हटले की हे पत्र त्यांच्या मनाला स्पर्शून गेले. आपल्या पत्रांत पंतप्रधान मोदी यांनी मुखर्जी एक सहृदय, प्रेमळ आणि मायाळू व्यक्ती आहेत असे म्हटले आहे.सिलेक्टेड स्पीचेस ऑफ प्रेसिडेंट( चौथा खंड) या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
July 24th, 11:20 pm
While releasing the fourth volume of Selected Speeches of President Pranab Mukherjee, PM Modi said that the guidance he received from President Pranab Mukherjee would help him immensely. He described President Mukherjee as extremely knowledgeable and extremely simple.राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या निवडक भाषणाच्या चौथ्या खंडाचे पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशन
July 24th, 08:09 pm
या प्रसंगी पंतप्रधान म्हणाले, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडून मिळालेले मार्गदर्शन त्यांना नेहमीच उपयुक्त ठरेल.राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे अतिशय ज्ञानी आणि अतिशय साधे व्यक्ती आहेतराष्ट्रपती मुखर्जी यांची पंतप्रधान मोदींबद्दल वक्तव्ये
July 24th, 07:04 pm
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अनेकवेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या प्रशासनाची प्रशंसा केली आहे. त्यांनी, नरेंद्र मोदी एक प्रभावी संवादक आणि खूप चांगले शिकणारे असल्याच म्हटले.