पंतप्रधान 28 जून रोजी नवी दिल्ली येथे आचार्य विद्यानंद जी महाराजांच्या शताब्दी समारंभाचे करणार उद्घाटन
June 27th, 05:06 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 जून रोजी सकाळी 11 वाजता नवी दिल्लीतील विज्ञान भवनात आचार्य विद्यानंद जी महाराजांच्या शताब्दी समारंभाचे उद्घाटन करतील. याप्रसंगी ते उपस्थितांना संबोधितही करतील.महावीर जयंतीनिमित्त भगवान महावीर यांना पंतप्रधानांनी केले वंदन
April 10th, 08:44 am
आज महावीर जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगवान महावीर यांना वंदन केले आहे. भगवान महावीर नेहमीच अहिंसा, सत्य आणि करुणेवर भर देत असत आणि त्यांचे आदर्श जगभरातील असंख्य लोकांना बळ देतात, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. गेल्या वर्षी सरकारने प्राकृत भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्रदान केला असून या निर्णयाचे खूप कौतुक झाले असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
October 03rd, 09:38 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत मंत्रिमंडळाने मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली. देशातील अभिजात भाषा या भारताच्या पुरातन आणि प्राचीन सांस्कृतिक वारशाच्या संरक्षकाची भूमिका पार पाडत आल्या आहेत. यासोबतच या भाषा म्हणजे प्रत्येक समुदायाने गाठलेल्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वाटचालीतील मैलाच्या टप्प्यांचे सार आणि मूर्त रूप आहेत.