नवीनतम जीएसटी सुधारणांचा भारताच्या उत्पादन क्षेत्रावर होणारा परिवर्तनकारी परिणाम पंतप्रधानांनी केला अधोरेखित
September 04th, 08:49 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीनतम जीएसटी सुधारणांचा भारताच्या उत्पादन क्षेत्रावर होणारा परिवर्तनकारी परिणाम आज अधोरेखित केला. #NextGenGST उपक्रमाद्वारे सुलभीकृत कर श्रेणी, सुव्यवस्थित डिजिटल नियमावली आणि खर्चात बचत करणाऱ्या पद्धतीची सुरुवात होत असून त्यायोगे देशांतर्गत उत्पादन आणि स्पर्धात्मकता यांना लक्षणीयरित्या चालना मिळणार आहे.