नवी दिल्ली येथे वीर बाल दिवस कार्यक्रमामधील पंतप्रधानांचे संबोधन

December 26th, 01:30 pm

केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी अन्नपूर्णा देवी, सावित्री ठाकूर, रवनीत सिंह, हर्ष मल्होत्रा, दिल्ली सरकारचे मंत्री महोदय, इतर मान्यवर, देशाच्या कानाकोपऱ्यातून येथे उपस्थित असलेले सर्व अतिथी आणि माझ्या प्रिय बालकांनो !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वीर बाल दिनानिमित्त नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले

December 26th, 01:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत भारत मंडपम येथे 'वीर बाल दिना’निमित्त आयोजित राष्ट्रीय कार्यक्रमाला संबोधित केले. कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधानांनी देशभरातून आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले आणि उपस्थित मुलांना संबोधित केले. ते म्हणाले की, आज देश वीर बाल दिवस साजरा करत आहे. यावेळी सादर झालेल्या वंदे मातरम या गीताच्या सुंदर सादरीकरणातून कलाकारांची निष्ठा आणि प्रयत्न ठळकपणे दिसून येत असल्याचे त्यांनी नमूद केले.

26 डिसेंबर रोजी 'वीर बाल दिवस' निमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी होणार

December 25th, 05:37 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 डिसेंबर 2025 रोजी दुपारी सुमारे 12:15 वाजता नवी दिल्लीतील भारत मंडपम इथे 'वीर बाल दिवस' निमित्त आयोजित राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. याप्रसंगी पंतप्रधान उपस्थितांना संबोधितही करतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 डिसेंबर रोजी नवी दिल्लीत वीर बाल दिवस कार्यक्रमात होणार सहभागी

December 25th, 01:58 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे 26 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 12 वाजता वीर बाल दिवस या देशव्यापी उत्सवात सहभागी होणार आहेत. भारताचा भविष्याचा पाया असणाऱ्या लहान मुलांना सन्मानित करण्यासाठी या उत्सवाचे आयोजन केले जाते. पंतप्रधान यावेळी उपस्थितांना संबोधित करणार आहेत.

पंतप्रधानांनी राष्ट्रीय बाल पुरस्कार प्राप्त मुलांशी साधला संवाद

January 23rd, 06:01 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 7 लोककल्याण मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार (पीएमआरबीपी) पुरस्कार प्राप्त मुलांशी संवाद साधला.

पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांची पंतप्रधानांनी केली प्रशंसा

January 24th, 09:49 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षीच्या पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार (पीएमआरबीपी) विजेत्या बालकांची प्रशंसा केली आहे. नवोन्मेष, समाज सेवा, विद्वत्ता, क्रीडा, कला आणि संस्कृती तसेच शौर्य या सहा क्षेत्रांमध्ये अद्वितीय कामगिरी करणाऱ्या मुलांना भारत सरकारतर्फे पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरविण्यात येते. यावर्षी पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार 2023 देण्यासाठी विविध श्रेणीअंतर्गत देशभरातील 11 बालकांची निवड करण्यात आली. यामध्ये 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील 6 मुले आणि 5 मुलींचा समावेश आहे.

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांशी पंतप्रधानांनी साधला संवाद

January 24th, 07:38 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 7 लोककल्याण मार्ग इथल्या त्यांच्या निवासस्थानी, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधला.

पंतप्रधान 24 जानेवारी रोजी राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांशी साधणार संवाद

January 23rd, 03:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता त्यांच्या निवासस्थानी 7 एलकेएम येथे प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार (पीएमआरबीपी ) पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधतील.