पंतप्रधान 13 ते 15 सप्टेंबर दरम्यान मिझोराम, मणिपूर, आसाम, पश्चिम बंगाल आणि बिहारला भेट देणार
September 12th, 02:12 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 ते 15 सप्टेंबर दरम्यान मिझोराम, मणिपूर, आसाम, पश्चिम बंगाल आणि बिहारला भेट देणार आहेत. 13 सप्टेंबर रोजी पंतप्रधान मिझोरामला भेट देतील आणि सकाळी 10 वाजता आयजॉल येथे पंतप्रधान 9000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. ते एका सार्वजनिक सभेलाही संबोधित करतील.पंतप्रधान 4 जानेवारीला मणिपूर आणि त्रिपुराचा दौरा करणार
January 02nd, 03:34 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 जानेवारी 2022 रोजी मणिपूर आणि त्रिपुरा राज्यांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. सकाळी 11 वाजता, पंतप्रधान इंफाळमध्ये 4800 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या 22 विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. त्यानंतर, दुपारी २ वाजता, आगरतळा येथे, महाराजा बीर बिक्रम विमानतळावरील नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे उद्घाटन आणि दोन प्रमुख विकास उपक्रमांचा शुभारंभ पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.