PM to visit West Bengal on 20-21 June
June 19th, 11:54 am
PM Modi is set to visit West Bengal on 20-21 June, where he will participate in Paschimbanga Divas celebrations, launch development projects across multiple sectors and release the 23rd PM-KISAN instalment worth ₹18,880 crore benefiting over 9.44 crore farmers. During the visit, he will also lead the International Day of Yoga celebrations in Kolkata and commission three indigenously designed and built naval ships, reinforcing India’s maritime capabilities and Aatmanirbharta.प्रधानमंत्री ग्राम सडक योजना-3 (पीएमजीएसवाय-3) मार्च 2025 नंतर मार्च 2028 पर्यंत सुरू ठेवण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी
April 18th, 03:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज प्रधानमंत्री ग्राम सडक योजना-3 (पीएमजीएसवाय-3) मार्च 2025 नंतर मार्च 2028 पर्यंत सुरू ठेवण्यास मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत वस्त्यांना ग्रामीण कृषी बाजारपेठा, उच्च माध्यमिक शाळा तसेच रुग्णालयांशी जोडणाऱ्या मुख्य मार्गांचे आणि ग्रामीण भागांना जोडणाऱ्या प्रमुख मार्गांचे एकत्रीकरण समाविष्ट आहे. या योजनेचा सुधारित खर्च सुमारे 83,977 कोटी रुपये असेल.Today's projects will boost energy access, connectivity and create jobs for the youth of Tamil Nadu: PM Modi in Tiruchirappalli
March 11th, 05:45 pm
PM Modi launched several developmental projects worth around ₹5,650 crore in Tiruchirappalli, aimed at bolstering the infrastructure and economy of Tamil Nadu. These initiatives span clean energy, petroleum-related manufacturing and enhanced multi-modal connectivity through highways, railways and rural roads. He dedicated the Indian Oil Corporation’s Lube Blending Plant in Chennai, strengthening the ‘Make in India’ initiative.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथे सुमारे 5,650 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण, पायाभरणी आणि सुरुवात
March 11th, 05:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ऐतिहासिक त्रिची शहराला भेट दिली. यावेळी त्यांनी तामिळनाडूच्या पायाभूत सुविधा आणि अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी परिवर्तनकारी विकास प्रकल्पांच्या मालिकेचा शुभारंभ केला. एकूण पाच हजार सहाशे कोटी रुपये गुंतवणुकीच्या या उपक्रमांमध्ये स्वच्छ ऊर्जा, पेट्रोलियमशी संबंधित उत्पादन आणि महामार्ग, रेल्वे आणि ग्रामीण भागातील रस्त्यांद्वारे विस्तारीत मल्टी-मोडल कनेक्टिव्हिटी, याचा समावेश आहे.पंतप्रधान 11 मार्च रोजी केरळ आणि तामिळनाडूला भेट देणार
March 09th, 09:54 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 मार्च 2026 रोजी केरळ आणि तामिळनाडूला भेट देणार आहेत. दुपारी 1:30 वाजता पंतप्रधान केरळमधील एर्नाकुलम येथे सुमारे 10,800 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन, राष्ट्रार्पण, पायाभरणी आणि हिरवा झेंडा दाखवतील. कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान उपस्थितांना संबोधितही करतील. त्यानंतर सायंकाळी 5:45वाजता पंतप्रधान तमिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथे सुमारे 5,650 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी करतील. पंतप्रधान या प्रसंगी उपस्थितांना संबोधितही करतील.कृषी आणि ग्राम परिवर्तन या संकल्पनेवरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनामधील पंतप्रधानांच्या संबोधनाचा मराठी अनुवाद.
March 06th, 01:14 pm
अर्थसंकल्पोत्तर वेबिनार मालिकेतील तिसऱ्या वेबिनारमध्ये, मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो. याआधी, तंत्रज्ञान, सुधारणा आणि आर्थिक विकास यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर दोन वेबिनार झाले आहेत. आज, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि कृषी यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांवर चर्चा होत आहे. तुम्ही सगळ्यांनी अर्थसंकल्प तयार करण्यात तुमच्या मौल्यवान सूचनांच्या माध्यमातून खूप सहकार्य केले आणि तुम्ही पाहिले असेल, अर्थसंकल्पात तुम्हा सगळ्यांच्या सूचना प्रतिबिंबित झाल्या आहेत, खूप कामी आल्या आहेत. पण आता अर्थसंकल्प सादर झाला आहे, या अर्थसंकल्पानंतर त्याच्या पूर्ण क्षमतेचा लाभ देशाला मिळावा, या दिशेनेही तुमचा अनुभव, तुमच्या सूचना आणि सुलभ रितीने अर्थसंकल्पाचा जास्तीत जास्त लोकांना लाभ मिळायला हवा. अर्थसंकल्पातील एकेक पैसा ज्या हेतूने दिला गेला आहे, तो पूर्ण कसा करता येईल? लवकरात लवकर कसा करता येईल? तुमच्या सूचना या वेबिनारसाठी खूप महत्वाच्या आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले कृषी आणि ग्रामीण परिवर्तनावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला संबोधित
March 06th, 01:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'कृषी आणि ग्रामीण परिवर्तन' या विषयावर भर असलेल्या तिसऱ्या अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला संबोधित केले. तंत्रज्ञान आणि आर्थिक विकासाशी संबंधित मागील सत्रांचा संदर्भ देत पंतप्रधानांनी नमूद केले की, अर्थसंकल्प तयार करताना भागधारकांनी मोलाचे सहकार्य केले होते. आता, अर्थसंकल्पानंतर हे तितकेच महत्त्वाचे आहे की देशाला त्याच्या पूर्ण क्षमतेचा लाभ मिळावा, आणि या दृष्टीने तुमच्या सूचना आणि हा अर्थसंकल्पोत्तर वेबिनार अत्यंत महत्त्वाचा आहे, यावर मोदी यांनी यावर भर दिला.पंतप्रधान 1 मार्च रोजी तामिळनाडू आणि पुदुचेरीला भेट देणार
February 27th, 04:40 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 मार्च 2026 रोजी तामिळनाडू आणि पुदुच्चेरीला भेट देणार आहेत. राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान 28 फेब्रुवारी रोजी रात्री 9 च्या सुमाराला चेन्नईला पोहोचतील.लखनौ इथे राष्ट्र प्रेरणा स्थळ उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन
December 25th, 06:16 pm
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, इथले लोकप्रिय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे वरिष्ठ सहयोगी आणि लखनौचे खासदार, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह जी, उत्तर प्रदेश भाजपा अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी श्रीमान पंकज चौधरी जी, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, ब्रजेश पाठक जी, उपस्थित अन्य मंत्रीगण, लोकप्रतिनिधी,महिला आणि पुरुषहो,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लखनौ इथल्या राष्ट्र प्रेरणा स्थळाचे उद्घाटन
December 25th, 05:23 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उत्तर प्रदेशातील लखनौ इथल्या राष्ट्र प्रेरणा स्थळाचे उद्घाटन झाले. माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवन आणि आदर्शांचा गौरव करण्यासाठी याची उभारणी केली आहे. यावेळी पंतप्रधानांनी माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या 101 व्या जयंती दिनानिमीत्त आयोजित कार्यक्रमाला संबोधितही केले.आज लखनौ ची ही भूमी एका नव्या प्रेरणेची साक्षीदार बनली आहे असे ते यावेळी म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी देशासह जागतिक समुदायाला नाताळच्या शुभेच्छा दिल्या. भारतातही लाखो ख्रिश्चन कुटुंबे आज हा सण साजरा करत असल्याचे त्यांनी नमूद केले. नाताळचा हा सण प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद घेऊन येवो अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली.बिहारमध्ये सिवान येथे विविध विकास प्रकल्पांच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन
June 20th, 01:00 pm
मी सर्वांना नमन करतो. बाबा महेंद्रनाथ, बाबा हंसनाथ, सोहागरा धाम, माँ थावे भवानी, माँ अंबिका भवानी, प्रथम राष्ट्रपती देशरत्न डॉ. राजेंद्र प्रसाद आणि लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या पावन भूमीवरील सर्वांना मी अभिवादन करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमधील सिवान येथे 5200 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विकास कामांचे उद्घाटन आणि पायाभरणी
June 20th, 12:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधील सिवान येथे 5200 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले आणि पायाभरणी केली. उपस्थितांना शुभेच्छा देताना पंतप्रधानांनी बाबा महेंद्रनाथ आणि बाबा हंसनाथ यांना आदराने वंदन केले आणि सोहगरा धामच्या पवित्र उपस्थितीचा उल्लेख केला. त्यांनी माँ थावे भवानी आणि माँ अंबिका भवानी यांनाही वंदन केले. पंतप्रधानांनी देशाचे पहिले राष्ट्रपती, देशरत्न डॉ. राजेंद्र प्रसाद आणि लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांना अभिवादन केले.From the land of Sindoor Khela, India showcased its strength through Operation Sindoor: PM Modi in Alipurduar, West Bengal
May 29th, 02:00 pm
PM Modi addressed a public meeting in Alipurduar, West Bengal. He ignited the spirit of the people urging them to take charge of shaping a prosperous future for Bengal & India. He lambasted the TMC for shielding corrupt leaders and appealed to the people to reject TMC. The PM invoked the Bengal’s spirit by saying “From the land of Sindoor Khela, India showcased its strength through Operation Sindoor.”PM Modi rallies in Alipurduar, West Bengal with a resounding Call to Action
May 29th, 01:40 pm
PM Modi addressed a public meeting in Alipurduar, West Bengal. He ignited the spirit of the people urging them to take charge of shaping a prosperous future for Bengal & India. He lambasted the TMC for shielding corrupt leaders and appealed to the people to reject TMC. The PM invoked the Bengal’s spirit by saying “From the land of Sindoor Khela, India showcased its strength through Operation Sindoor.”तमिळनाडूमध्ये रामेश्वरम इथे विविध विकासकामांच्या उद्घाटन आणि भूमीपूजन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
April 06th, 02:00 pm
तमिळनाडूचे राज्यपाल एन. रवि, केंद्रिय मंत्रिमंडळातील माझे सहकारी अश्विनी वैष्णव, डॉ. एल. मुरुगन, तमिळनाडू सरकारचे मंत्री, खासदार, अन्य मान्यवर आणि बंधु भगिनींनो!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तामिळनाडूतील रामेश्वरम येथे 8,300 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन
April 06th, 01:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडूतील रामेश्वरम येथे 8,300 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांची पायाभरणी केली, तसेच ते राष्ट्राला समर्पित केले. त्याआधी त्यांनी नवीन पंबन या रेल्वे पूलाचे उद्घाटन केले. हा भारतातील पहिला उभा उघडता येणारा सागरी पूल (vertical lift sea bridge) आहे. यावेळी पंतप्रधानांनी रस्ता पुलावरून एक रेल्वे गाडी आणि एका जहाजालाही हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. यावेळी त्यांनी या सागरी पुलाच्या कार्यान्वयाचीही पाहणी केली. त्यांनी रामेश्वरम इथल्या रामनाथस्वामी मंदिरात दर्शन घेऊन पूजाही केली.अर्थसंकल्पानंतर कृषी आणि ग्रामीण समृद्धीसंबंधित वेबिनारमध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण
March 01st, 01:00 pm
या वर्षीचा अर्थसंकल्प हा आमच्या सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला सर्वंकष अर्थसंकल्प होता. या अर्थसंकल्पातून आमच्या धोरणांमधील सातत्य तर दिसून आलेच पण त्याचबरोबर विकसित भारताच्या संकल्पनेचा नवा विस्तार देखील दिसला. अर्थसंकल्पापूर्वी तुम्हा भागधारकांनी जी मौल्यवान माहिती दिली, ज्या सूचना केल्या, त्या अर्थसंकल्प तयार करण्यात आमच्यासाठी खूप उपयुक्त ठरल्या. आता या अर्थसंकल्पातील बाबी अधिक प्रभावी पद्धतीने प्रत्यक्षात अमलात आणण्यात, या अर्थसंकल्पातील बाबींचा परिणाम खरोखरीच अधिकाधिक उत्तम आणि जलद पद्धतीने साध्य व्हावा, सगळे निर्णय आणि धोरणे प्रभावी व्हावीत या साठी तुम्हा सर्वांच्या भूमिकेची जबाबदारी अधिकच वाढली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी आणि ग्रामीण समृद्धीवरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला केले संबोधित
March 01st, 12:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे कृषी आणि ग्रामीण समृद्धीवरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला संबोधित केले. अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमधील सहभागाचे महत्त्व अधोरेखित करताना, पंतप्रधानांनी कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे आभार मानले आणि या वर्षीचा अर्थसंकल्प हा सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला पूर्ण अर्थसंकल्प आहे, जो धोरणांमध्ये सातत्य आणि विकसित भारताच्या दृष्टिकोनाचा नवा विस्तार दर्शवितो असे अधोरेखित केले. अर्थसंकल्पापूर्वी सर्व संबंधितांकडून मिळालेल्या मौल्यवान माहिती आणि सूचनांची त्यांनी दखल घेतली , ज्या खूप उपयुक्त होत्या. हा अर्थसंकल्प अधिक प्रभावी बनवण्यात हितधारकांची भूमिका अधिक महत्त्वाची बनली आहे यावर त्यांनी भर दिला. विकसित भारताच्या ध्येयाच्या दिशेने आमचा संकल्प अतिशय स्पष्ट आहे आणि एकत्रितपणे आम्ही अशा भारताची उभारणी करत आहोत जिथे शेतकरी समृद्ध आणि सक्षम असतील, असे मोदी म्हणाले. एकही शेतकरी मागे राहू नये, प्रत्येक शेतकऱ्याला पुढे नेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. कृषी क्षेत्र हे विकासाचे पहिले इंजिन मानून शेतकऱ्यांना गौरवपूर्ण स्थान दिले आहे असे ते म्हणाले. भारत एकाच वेळी दोन प्रमुख उद्दिष्टांच्या दिशेने काम करत आहे: कृषी क्षेत्राचा विकास आणि गावांची समृद्धी, असे त्यांनी नमूद केले.राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावावरील चर्चेला पंतप्रधानांनी लोकसभेमध्ये दिलेले उत्तर
February 04th, 07:00 pm
आदरणीय राष्ट्रपति जी यांच्या संबोधनाबाबत आभार व्यक्त करण्यासाठी मी उपस्थित आहे. काल आणि आज,काल तर रात्री उशिरापर्यंत सर्व माननीय खासदारांनी आपले विचार मांडून हा आभार प्रस्ताव समृद्ध केला. अनेक माननीय अनुभवी खासदारांनीही आपले विचार व्यक्त केले आणि हे स्वाभाविक आहे, लोकशाहीची परंपराही आहे, जिथे आवश्यक होते तिथे प्रशंसा झाली, जिथे व्यथा जाणवली तिथे काही नकारात्मक गोष्टीही मांडल्या गेल्या आणि हे अतिशय स्वाभाविक आहे ! अध्यक्ष जी माझे मोठे भाग्य आहे की देशातल्या जनतेने मला या स्थानावर बसून राष्ट्रपती जी यांच्या संबोधनाबाबत आभार व्यक्त करण्याची 14 वेळा संधी दिली आणि म्हणूनच आज जनता जनार्दनाचेही अतिशय आदराने मी आभार मानतो आणि सदनातल्या चर्चेत जे-जे सदस्य सहभागी झाले,चर्चा समृद्ध केली, त्या सर्वांचे मी आभार मानतो.राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभार प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोकसभेत निवेदन
February 04th, 06:55 pm
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभार प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत निवेदन केले. काल आणि आज झालेल्या चर्चेत सहभागी झालेल्या संसद सदस्यांच्या योगदानाची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. लोकशाहीच्या परंपरेत जिथे आवश्यकता आहे तिथे कौतुकाची थाप आणि गरज असेल तिथे काही कानपिचक्या देणारी वक्तव्ये चर्चेत येणे साहजिक असल्याचे पंतप्रधान भाषणात म्हणाले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभारप्रदर्शनाची संधी जनतेने चौदाव्यांदा देणे हा मी माझा सन्मान समजतो असे सांगून त्यांनी नागरिकांचेही आभार मानले आणि चर्चेत सहभागी झालेल्यांनी त्यांच्या विचारांनी आभारप्रस्तावाला नवी उंची गाठून दिली अशी टिप्पणी त्यांनी केली.