पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीमध्ये भारत मंडपम येथे वर्ल्ड फूड इंडिया 2025 मध्ये उपस्थितांना संबोधित करणार

September 24th, 06:33 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:15 वाजता नवी दिल्ली मधील भारत मंडपम येथे वर्ल्ड फूड इंडिया 2025 मध्ये सहभागी होतील. यावेळी ते उपस्थितांना संबोधित करतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर नारीशक्तीबरोबर संवाद’ या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद

August 12th, 12:32 pm

आज ज्यावेळी देश आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे, त्यावेळी अशा कार्यक्रमाचे आयोजन अतिशय महत्वाचे ठरते. आगामी वर्षांमध्ये आत्मनिर्भर भारताला, आपली आत्मनिर्भर नारीशक्ती एक नवीन प्रेरणा देणारी आहे. तुम्हा सगळ्यांबरोबर संवाद साधून आज मलाही प्रेरणा मिळाली. आजच्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी, राजस्थानचे आदरणीय मुख्यमंत्री जी, राज्य सरकारांचे मंत्री, खासदार, आमदार, जिल्हा परिषदांचे अध्यक्ष आणि सदस्य, देशातल्या जवळपास तीन लाख स्थानांवरून जोडल्या गेलेल्या स्वमदत समूहाच्या कोट्यवधी भगिनी आणि कन्या, इतर सर्व मान्यवर!

पंतप्रधानांनी "आत्मनिर्भर नारीशक्तीशी संवाद " कार्यक्रमात महिला बचत गटांशी साधला संवाद

August 12th, 12:30 pm

पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदी यांनी आज आत्मनिर्भर नारीशक्तीशी संवाद या कार्यक्रमात भाग घेतला. त्यांनी दीनदयाल अंत्योदय योजना - राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियाना अंतर्गत महिला बचत गटांचे सदस्य, समुदाय, प्रतिनिधी यांच्याबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला.