महारत्न सीपीएसईंना अधिकार देण्याबाबतच्या विद्यमान मार्गदर्शक तत्त्वांनुसार पॉवरग्रिडला वाढीव अधिकार देण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी, प्रत्येक उपकंपनीला 5000 कोटी रुपयांवरून 7500 कोटी रुपयांपर्यंत इक्विटी गुंतवणूक मर्यादा वाढवण्यास मंजुरी
February 24th, 04:25 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने आज सार्वजनिक उपक्रम विभागाच्या (डीपीई) 4 फेब्रुवारी 2010 च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, महारत्न सीपीएसईंना लागू असलेल्या अधिकारवाटपात पॉवरग्रिडला वाढीव अधिकार देण्यास मंजुरी दिली. या निर्णयामुळे पॉवरग्रिडसाठी परवानगी असलेली इक्विटी गुंतवणूक मर्यादा प्रति उपकंपनी 5,000 कोटी रुपयांच्या सध्याच्या मर्यादेवरून 7,500 कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे, तर कंपनीच्या निव्वळ मूल्याच्या 15% ची विद्यमान कमाल मर्यादा कायम ठेवण्यात आली आहे.