“सबका साथ, सबका विकास – जनतेच्या आकांक्षांची पूर्तता” या विषयावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष संबोधन
March 09th, 10:30 am
अर्थसंकल्पानंतर आयोजित करण्यात आलेल्या या वेबिनार मालिकेतील आजचा हा चौथा आणि अत्यंत महत्त्वाचा वेबिनार आहे. Fulfilling aspirations of people म्हणजेच जनतेच्या आकांक्षांची पूर्तता हा केवळ चर्चेचा विषय नाही; तो या अर्थसंकल्पाचा मुख्य उद्देश आहे आणि या सरकारचा संकल्पही आहे. या जनआकांक्षांची पूर्तता करण्यासाठी शिक्षण, कौशल्य विकास, आरोग्य, पर्यटन, क्रीडा आणि संस्कृती अशी मूलभूत क्षेत्रे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे या वेबिनारमध्ये आपण या महत्त्वपूर्ण पैलूंवर चर्चा करत आहोत. अर्थसंकल्पातील घोषणांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी या क्षेत्रांशी संबंधित सर्व तज्ञ, धोरणनिर्माते, संशोधक, उद्योजक आणि माझे तरुण सहकारी – आपले विचार आणि सूचना अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या चौथ्या अर्थसंकल्पोत्तर वेबिनारच्या सत्रात मी आपले मनःपूर्वक स्वागत आणि अभिनंदन करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पानंतरच्या “सब का साथ सब का विकास – जनतेच्या आकांक्षांची पूर्तता” विषयक वेबिनारला केले संबोधित
March 09th, 10:15 am
अर्थसंकल्पानंतर सुरू करण्यात आलेल्या वेबिनार मालिकेतील चौथ्या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जनतेला संबोधित केले. ‘सब का साथ सब का विकास – जनतेच्या आकांक्षांची पूर्तता’ असा या भागाचा विषय होता. शिक्षण, कौशल्य, आरोग्य, पर्यटन, क्रीडा आणि संस्कृती ही क्षेत्रे जनतेच्या आकांक्षांच्या पूर्ततेसाठीची मुख्य साधने असल्याचे मोदी यांनी अधोरेखित केले. अर्थसंकल्पातील घोषणांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तज्ज्ञ आणि धोरणकर्त्यांचे त्यांनी स्वागत केले. “जनतेच्या आकांक्षा पूर्ण करणे हा केवळ एक विषय नाही; तर तो या अर्थसंकल्पाचा मुख्य उद्देश आणि सरकारचा निश्चय आहे,” असे मोदी यांनी स्पष्ट केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 मार्च रोजी "सबका साथ सबका विकास - लोकांच्या महत्त्वाकांक्षांची परिपूर्ती" या संकल्पनेवर आधारित अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला करणार संबोधित
March 08th, 04:35 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 मार्च 2026 रोजी सकाळी 10:15 वाजता दूरदृश्य प्रणालीमार्फत सबका साथ सबका विकास - लोकांच्या महत्त्वाकांक्षांची परिपूर्ती या संकल्पनेवर आधारित अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला संबोधित करणार आहेत.कृषी आणि ग्राम परिवर्तन या संकल्पनेवरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनामधील पंतप्रधानांच्या संबोधनाचा मराठी अनुवाद.
March 06th, 01:14 pm
अर्थसंकल्पोत्तर वेबिनार मालिकेतील तिसऱ्या वेबिनारमध्ये, मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो. याआधी, तंत्रज्ञान, सुधारणा आणि आर्थिक विकास यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर दोन वेबिनार झाले आहेत. आज, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि कृषी यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांवर चर्चा होत आहे. तुम्ही सगळ्यांनी अर्थसंकल्प तयार करण्यात तुमच्या मौल्यवान सूचनांच्या माध्यमातून खूप सहकार्य केले आणि तुम्ही पाहिले असेल, अर्थसंकल्पात तुम्हा सगळ्यांच्या सूचना प्रतिबिंबित झाल्या आहेत, खूप कामी आल्या आहेत. पण आता अर्थसंकल्प सादर झाला आहे, या अर्थसंकल्पानंतर त्याच्या पूर्ण क्षमतेचा लाभ देशाला मिळावा, या दिशेनेही तुमचा अनुभव, तुमच्या सूचना आणि सुलभ रितीने अर्थसंकल्पाचा जास्तीत जास्त लोकांना लाभ मिळायला हवा. अर्थसंकल्पातील एकेक पैसा ज्या हेतूने दिला गेला आहे, तो पूर्ण कसा करता येईल? लवकरात लवकर कसा करता येईल? तुमच्या सूचना या वेबिनारसाठी खूप महत्वाच्या आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले कृषी आणि ग्रामीण परिवर्तनावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला संबोधित
March 06th, 01:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'कृषी आणि ग्रामीण परिवर्तन' या विषयावर भर असलेल्या तिसऱ्या अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला संबोधित केले. तंत्रज्ञान आणि आर्थिक विकासाशी संबंधित मागील सत्रांचा संदर्भ देत पंतप्रधानांनी नमूद केले की, अर्थसंकल्प तयार करताना भागधारकांनी मोलाचे सहकार्य केले होते. आता, अर्थसंकल्पानंतर हे तितकेच महत्त्वाचे आहे की देशाला त्याच्या पूर्ण क्षमतेचा लाभ मिळावा, आणि या दृष्टीने तुमच्या सूचना आणि हा अर्थसंकल्पोत्तर वेबिनार अत्यंत महत्त्वाचा आहे, यावर मोदी यांनी यावर भर दिला.पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 मार्च रोजी 'शेती आणि ग्रामीण परिवर्तन ' या संकल्पनेवरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला संबोधित करणार
March 05th, 06:04 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दि. 6 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वाजून 15 मिनिटांनी, शेती आणि ग्रामीण परिवर्तन या संकल्पनेवरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करणार आहेत.'आर्थिक विकास शाश्वत आणि बळकट करताना' या अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये पंतप्रधानांचे संबोधन
March 03rd, 11:30 am
गेल्या आठवड्यात, अर्थसंकल्पोत्तर वेबिनार मालिकेतील पहिल्या वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते आणि तो यशस्वी झाला असे मला कळले आहे, आणि अर्थसंकल्पामधील तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक खूप चांगल्या सूचना दिल्या, सर्वांच्या सक्रिय सहभागीचे मी स्वागत करतो आणि आज या मालिकेतल्या दुसऱ्या वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. मला सांगण्यात आले आहे की, हजारोंच्या संख्येने, अनेक विषयांवर असंख्य लोक आपल्या सूचना देणार आहेत. विषय तज्ज्ञही यामध्ये सहभाग घेणार आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर अर्थसंकल्पावर चर्चा होणे, हा नक्कीच मोठा यशस्वी प्रयोग आहे. आपण सर्वजण वेळात वेळ काढून या वेबिनरमध्ये सहभागी झाला आहात. मी आफल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपले स्वागत करतो. या वेबिनारचे विषयसूत्र देशाच्या आर्थिक विकासाला सातत्यपूर्ण बळकटी देणे असा आहे. आज, देश आपल्या बळकट अर्थव्यवस्थेमुळे साऱ्या जगाचे आशास्थान झाला आहे, आज जेव्हा जागतिक पुरवठा साखळीची पुनर्रचना होते आहे, तेव्हा अर्थव्यवस्थेची वेगाने होणारी प्रगती विकसित भारताचा मोठा आधार आहे. आमची दिशा स्पष्ट आहे, आमचा संकल्प स्पष्ट आहे, अधिक निर्मिती, अधिक उत्पादन, अधिक संपर्क आणि आता गरज आहे ती अधिक निर्यातीची आणि आज तु्म्हा सर्वांमध्ये निश्चितच विचारमंथन होणार आहे, या विचार मंथनातून येणाऱ्या सूचना यामध्ये मोठी भूमिका बजावतील.आर्थिक विकासाची शाश्वतता आणि बळकटीकरण या विषयावरील वेबीनारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन
March 03rd, 11:15 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अर्थसंकल्प वेबीनार मालिकेच्या दुसऱ्या भागात संबोधित करताना “शाश्वत आणि बळकट आर्थिक विकास” या संकल्पनेवर भर दिला. मागील आठवड्यातील प्रगतीचा आढावा घेताना पहिले वेबिनार अतिशय यशस्वी ठरल्याचे आणि त्यामध्ये अर्थसंकल्पीय तरतुदींच्या अंमलबजावणीबाबत उत्तम सूचना देण्यात आल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. सध्याचे वेबिनार हे देशाच्या आर्थिक विकासासाठी सलग बळ देण्याशी संबंधित आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला.पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 मार्च रोजी ‘शाश्वत आणि सशक्त आर्थिक विकास’ या विषयावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला करणार संबोधित
March 02nd, 07:10 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 मार्च 2026 रोजी सकाळी 11:15 वाजता ‘शाश्वत आणि सशक्त आर्थिक विकास’ या विषयावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला दूरदृश्य प्रणालीमार्फत संबोधित करणार आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘विकसित भारतासाठी तंत्रज्ञान, सुधारणा आणि वित्त’ या विषयावरच्या वेबिनारमध्ये केलेले संबोधन
February 27th, 01:01 pm
या वर्षातील पहिल्या बजेट वेबिनारमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. गेल्या काही वर्षांत 'बजेट वेबिनार' ही एक भक्कम परंपरा बनली आहे. बऱ्याचदा अर्थसंकल्पाचे मूल्यमापन वेगवेगळ्या निकषांवर केले जाते; कधी शेअर बाजाराच्या चढउतारांवर चर्चा होते, तर कधी प्राप्तिकराच्या प्रस्तावांवर लक्ष केंद्रित केले जाते. पण वस्तुस्थिती ही आहे की, राष्ट्रीय अर्थसंकल्प हा कोणताही अल्पकालीन दस्तऐवज नसून तो एक धोरणात्मक आराखडा असतो. म्हणूनच अर्थसंकल्पाच्या परिणामकारकतेचे मूल्यमापन देखील ठोस निकषांवर व्हायला हवे. अशी धोरणे जी पायाभूत सुविधांचा विस्तार करतील, जी पतपुरवठा सुलभ करतील, जी व्यापार सुलभता वाढवतील, जी प्रशासनात पारदर्शकता आणतील आणि सामान्य जनतेचे जीवन सुसह्य करून त्यांच्यासाठी नवनवीन संधी निर्माण करतील. अर्थसंकल्पातील या बाबींशी संबंधित निर्णयच अर्थव्यवस्थेला शाश्वत मजबुती देतात.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "विकसित भारतासाठी तंत्रज्ञान सुधारणा आणि वित्त" या विषयावरच्या अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला केले संबोधित
February 27th, 11:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पोत्तर वेबिनार 2026-27 मालिकेतील पहिल्या वेबिनारला आज संबोधित केले. या वेबिनारची संकल्पना 'विकसित भारतासाठी तंत्रज्ञान सुधारणा आणि वित्त' अशी होती. केंद्रीय अर्थसंकल्प हा अल्पकालीन दस्तऐवज नसून तो धोरणात्मक रोडमॅप आहे, यावर भर देऊन विकसित भारत 2047 चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले.पंतप्रधान 27 फेब्रुवारी रोजी "विकसित भारतासाठी तंत्रज्ञान, सुधारणा आणि वित्तपुरवठा" या विषयावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला संबोधित करणार
February 26th, 08:07 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:30 च्या सुमाराला विकसित भारतासाठी तंत्रज्ञान, सुधारणा आणि वित्त या विषयावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करतील. या वेबिनारमध्ये सार्वजनिक भांडवली खर्च, पायाभूत सुविधा, बँकिंग क्षेत्रातील सुधारणा, वित्तीय क्षेत्रातील रचना, भांडवली बाजारांचे सखोलीकरण आणि कर सुधारणांद्वारे जीवन सुलभता या मुद्यांवर चर्चा होईल.The vision of Investment in People stands on three pillars – Education, Skill and Healthcare: PM Modi
March 05th, 01:35 pm
PM Modi participated in the Post-Budget Webinar on Employment and addressed the gathering on the theme Investing in People, Economy, and Innovation. PM remarked that India's education system is undergoing a significant transformation after several decades. He announced that over one crore manuscripts will be digitized under Gyan Bharatam Mission. He noted that India, now a $3.8 trillion economy will soon become a $5 trillion economy. PM highlighted the ‘Jan-Bhagidari’ model for better implementation of the schemes.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोजगार निर्मितीला चालना - लोकांमध्ये गुंतवणूक, अर्थव्यवस्था आणि नवोन्मेष यावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला केले संबोधित
March 05th, 01:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून रोजगारविषयक अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला संबोधित केले. या वेबिनारमधील उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी “लोकांमध्ये गुंतवणूक, अर्थव्यवस्था आणि नवोन्मेष” या संकल्पनेचे महत्त्व अधोरेखित केले ज्यामध्ये विकसित भारताच्या आराखड्याची व्याख्या करण्यात आली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात या संकल्पनेचे प्रतिबिंब अतिशय व्यापक स्तरावर दिसत आहे आणि भारताच्या भवितव्याची ब्लूप्रिंट म्हणून ती काम करणार आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. पायाभूत सुविधा, उद्योग, अर्थव्यवस्था आणि नवोन्मेष यांना गुंतवणुकीसाठी समान प्राधान्य देण्यात आले असल्यावर त्यांनी भर दिला. क्षमता उभारणी आणि गुणवत्तेची जोपासना या देशाच्या प्रगतीचा पाया असल्याचे अधोरेखित करत मोदी यांनी सर्व हितधारकांना एक पाऊल पुढे येण्याचे आणि विकासाच्या पुढच्या टप्प्याची गरज म्हणून या क्षेत्रांमध्ये अधिकाधिक गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. देशाच्या आर्थिक यशस्वितेसाठी ही बाब अत्यावश्यक आहे आणि प्रत्येक संघटनेच्या यशाचा हा आधार आहे, यावर त्यांनी भर दिलापंतप्रधान 5 मार्च रोजी रोजगार विषयक अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये सहभागी होणार
March 04th, 05:09 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 मार्च 2025 रोजी दुपारी 1:30 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून, रोजगार विषयक अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये सहभागी होणार आहेत. नागरिकांमधील गुंतवणूक, अर्थव्यवस्था आणि नवोन्मेष अशा महत्वाच्या विषयांवर या वेबिनारमध्ये चर्चा होणार आहे. यावेळी पंतप्रधान उपस्थितांना संबोधितही करणार आहेत.पंतप्रधान 4 मार्च रोजी अर्थसंकल्पोत्तर तीन वेबिनारमध्ये होणार सहभागी
March 03rd, 09:43 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये दुपारी 12:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होतील. या वेबिनार अंतर्गत सुक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग (MSME) हे विकासाचे इंजिन;उत्पादन, निर्यात तसेच अणुऊर्जा अभियान; नियामक, गुंतवणूक आणि व्यवसाय सुलभता विषयक सुधारणा या विषयांवर चर्चा केली जाणार आहे. या वेबिनारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थितांना संबोधितही करतील.अर्थसंकल्पानंतर कृषी आणि ग्रामीण समृद्धीसंबंधित वेबिनारमध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण
March 01st, 01:00 pm
या वर्षीचा अर्थसंकल्प हा आमच्या सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला सर्वंकष अर्थसंकल्प होता. या अर्थसंकल्पातून आमच्या धोरणांमधील सातत्य तर दिसून आलेच पण त्याचबरोबर विकसित भारताच्या संकल्पनेचा नवा विस्तार देखील दिसला. अर्थसंकल्पापूर्वी तुम्हा भागधारकांनी जी मौल्यवान माहिती दिली, ज्या सूचना केल्या, त्या अर्थसंकल्प तयार करण्यात आमच्यासाठी खूप उपयुक्त ठरल्या. आता या अर्थसंकल्पातील बाबी अधिक प्रभावी पद्धतीने प्रत्यक्षात अमलात आणण्यात, या अर्थसंकल्पातील बाबींचा परिणाम खरोखरीच अधिकाधिक उत्तम आणि जलद पद्धतीने साध्य व्हावा, सगळे निर्णय आणि धोरणे प्रभावी व्हावीत या साठी तुम्हा सर्वांच्या भूमिकेची जबाबदारी अधिकच वाढली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी आणि ग्रामीण समृद्धीवरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला केले संबोधित
March 01st, 12:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे कृषी आणि ग्रामीण समृद्धीवरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला संबोधित केले. अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमधील सहभागाचे महत्त्व अधोरेखित करताना, पंतप्रधानांनी कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे आभार मानले आणि या वर्षीचा अर्थसंकल्प हा सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला पूर्ण अर्थसंकल्प आहे, जो धोरणांमध्ये सातत्य आणि विकसित भारताच्या दृष्टिकोनाचा नवा विस्तार दर्शवितो असे अधोरेखित केले. अर्थसंकल्पापूर्वी सर्व संबंधितांकडून मिळालेल्या मौल्यवान माहिती आणि सूचनांची त्यांनी दखल घेतली , ज्या खूप उपयुक्त होत्या. हा अर्थसंकल्प अधिक प्रभावी बनवण्यात हितधारकांची भूमिका अधिक महत्त्वाची बनली आहे यावर त्यांनी भर दिला. विकसित भारताच्या ध्येयाच्या दिशेने आमचा संकल्प अतिशय स्पष्ट आहे आणि एकत्रितपणे आम्ही अशा भारताची उभारणी करत आहोत जिथे शेतकरी समृद्ध आणि सक्षम असतील, असे मोदी म्हणाले. एकही शेतकरी मागे राहू नये, प्रत्येक शेतकऱ्याला पुढे नेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. कृषी क्षेत्र हे विकासाचे पहिले इंजिन मानून शेतकऱ्यांना गौरवपूर्ण स्थान दिले आहे असे ते म्हणाले. भारत एकाच वेळी दोन प्रमुख उद्दिष्टांच्या दिशेने काम करत आहे: कृषी क्षेत्राचा विकास आणि गावांची समृद्धी, असे त्यांनी नमूद केले.पंतप्रधान 1 मार्च रोजी "कृषी आणि ग्रामीण समृद्धी" या विषयावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये होणार सहभागी
February 28th, 07:32 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 मार्च रोजी दुपारी 12:30 च्या सुमारास कृषी आणि ग्रामीण समृद्धी या विषयावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होतील. यावेळी ते उपस्थितांना संबोधितही करतील.