Prime Minister meets with the President of Trinidad and Tobago

July 04th, 11:37 pm

PM Modi met Trinidad & Tobago President Kangaloo and the two leaders reflected on the enduring bonds shared by the two countries, anchored by strong people-to-people ties. PM Modi conveyed his sincere gratitude for the conferment of the ‘Order of the Republic of Trinidad and Tobago’—describing it as an honour for the 1.4 billion people of India.

पोर्ट ऑफ स्पेनमध्ये त्रिनिदादी गायक राणा मोहीप यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

July 04th, 09:42 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ पोर्ट ऑफ स्पेन येथे आयोजित केलेल्या मेजवानीच्या वेळी, त्रिनिदादी गायक राणा मोहीप यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. काही वर्षांपूर्वी महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंती सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मोहीप यांनी ‘ वैष्णव जन तो’ हे गीत गायले होते.

पोर्ट ऑफ स्पेनमध्ये भोजपुरी चौतालच्या सादरीकरणाचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

July 04th, 09:06 am

भारत आणि त्रिनिदाद, टोबॅगो यांच्यातील शाश्वत सांस्कृतिक बंधांना अधोरेखित करणाऱ्या पोर्ट ऑफ स्पेन येथे उत्साहात झालेल्या भोजपुरी चौताल कार्यक्रमाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे.

त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या सरकारी दौऱ्यासाठी पंतप्रधान पोर्ट ऑफ स्पेनमध्ये दाखल

July 04th, 02:16 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी 3-4 जुलै 2025 रोजी नियोजित त्रिनिदाद आणि टोबॅगो (T&T) प्रजासत्ताकाच्या सरकारी दौऱ्यासाठी आज पोर्ट ऑफ स्पेनमध्ये दाखल झाले. 1999 नंतर एखाद्या भारतीय पंतप्रधानांचा त्रिनिदाद आणि टोबॅगोचा हा पाहिला द्विपक्षीय दौरा आहे. दोन्ही देशांमधील घनिष्ठ संबंधांचे प्रतीक म्हणून, पोर्ट ऑफ स्पेन येथील विमानतळावर आगमन झाल्यावर, पंतप्रधानांचे त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधान, महामहीम कमला पेरसाद-बिसेसर, त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्य आणि इतर अनेक मान्यवरांनी स्वागत केले. पंतप्रधानांना औपचारिक गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला आणि विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करून त्यांचे स्वागत करण्यात आले.