Prime Minister shares glimpses of his visit to Somnath

January 10th, 11:00 pm

PM Modi shared glimpses of his visit to Somnath in Gujarat, where he received a warm welcome from the people during #SomnathSwabhimanParv. Later, the PM participated in Omkar Mantra chanting and witnessed a drone show. He also chaired a meeting of the Shree Somnath Trust, reviewing various aspects related to infrastructure upgradation in the temple complex.

15 नोव्हेंबर रोजी ‘जनजातीय गौरव दिवसा निमित्त पंतप्रधान गुजरातमधील नर्मदा जिल्ह्याला भेट देणार

November 14th, 11:41 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 नोव्हेंबर रोजी गुजरातला भेट देणार असून, दुपारी 12:45 वाजता ते नर्मदा जिल्ह्यातील देवमोगरा मंदिरात पूजा आणि दर्शन करतील. त्यानंतर सुमारे 2:45 वाजता ते नर्मदा जिल्ह्यातील डेडियापाडा येथे धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होतील. या प्रसंगी पंतप्रधान 9,700 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध पायाभूत आणि विकास प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन करतील आणि उपस्थितांना संबोधित करतील.

त्रिपुरातील उदयपूर येथील माता त्रिपुर सुंदरी मंदिराला पंतप्रधानांनी दिली भेट

September 22nd, 09:41 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिपुरातील उदयपूर येथील माता त्रिपुर सुंदरी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. “माझ्या देशवासियांचे कल्याण व समृद्धी यासाठी देवीकडे प्रार्थना केली,” असे मोदी म्हणाले.

पंतप्रधान 11 एप्रिल रोजी उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशला भेट देणार आहेत

April 09th, 09:43 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 एप्रिल रोजी उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशचा दौरा करतील. ते वाराणसीला जातील आणि सकाळी 11 वाजता 3,880 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. ते एका जाहीर सभेला देखील संबोधित करतील.

पंतप्रधान 6 मार्च रोजी उत्तराखंडला देणार भेट

March 05th, 11:18 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी दिनांक 6 मार्च रोजी उत्तराखंडला भेट देणार आहेत.सकाळी 9:30 च्या सुमारास ते मुखवा या हिवाळा ऋतूतील वास्तव्यस्थानी गंगामातेची पूजा करून दर्शन घेतील.सकाळी सुमारे 10:40 वाजता, ते एका ट्रेक आणि बाईक रॅलीला हिरवा झेंडा दाखवतील आणि हरसिलमधील एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होत उपस्थितांना संबोधित करतील.

पंतप्रधानांनी तेलंगणातील उज्जयिनी महाकाली देवस्थानम येथे केली प्रार्थना

March 05th, 11:44 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तेलंगणातील उज्जयिनी महाकाली देवस्थानम येथे प्रार्थना केली.

पंतप्रधानांनी गुजरातमधील द्वारकाधीश मंदिराला दिली भेट

February 25th, 01:29 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील द्वारकाधीश मंदिराला भेट दिली.

पंतप्रधानांनी बेट द्वारका इथे द्वारकाधीश मंदिरात दर्शन घेत पूजा केली

February 25th, 12:05 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बेट द्वारका इथे द्वारकाधीश मंदिरात दर्शन घेत पूजा केली.

पंतप्रधानांनी गुजरातमधील मेहसाणा येथील वलीनाथ महादेव मंदिरात पूजा केली आणि दर्शन घेतले

February 22nd, 07:48 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील मेहसाणा येथील वलीनाथ महादेव मंदिरात पूजा केली आणि महादेवाचे दर्शन घेतले.

पंतप्रधान 22 आणि 23 फेब्रुवारी रोजी गुजरात आणि उत्तर प्रदेश दौऱ्यावर

February 21st, 11:41 am

पंतप्रधान, 22 फेब्रुवारी रोजी, सकाळी 10:45 वाजता, अहमदाबाद येथे, गुजरात सहकारी दूध विपणन महासंघाच्या (जीसीएमएमएफ) सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात सहभागी होतील. ते दुपारी 12:45 वाजता महेसाणा येथे पोहोचतील आणि वलीनाथ महादेव मंदिरात पूजा करतील तसेच दर्शन घेतील. त्यानंतर, दुपारी 1 वाजता, महेसाणातील तारभ येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होतील. ते येथे 8,350 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण करतील. पंतप्रधान, दुपारी 4:15 च्या सुमारास नवसारी येथे पोहोचतील. तिथे ते सुमारे 24,700कोटी रुपयांच्या बहुविध विकास प्रकल्पांचे राष्ट्रार्पण, पायाभरणी आणि कामांचा प्रारंभ करतील. संध्याकाळी सुमारे 6:15 वाजता, काक्रापार अणुऊर्जा केंद्राला ते भेट देतील.

अयोध्येत नव्याने बांधलेल्या श्री रामजन्मभूमी मंदिरातील श्री रामलल्लाच्या 22 जानेवारी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात पंतप्रधान होणार सहभागी

January 21st, 09:04 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12 च्या सुमाराला अयोध्येतील नवनिर्मित श्री रामजन्मभूमी मंदिरात श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होतील. श्री रामजन्मभूमी ट्रस्ट कडून याआधी ऑक्टोबर 2023 मध्ये, पंतप्रधानांना प्राण प्रतिष्ठा समारंभासाठी निमंत्रण मिळाले होते.

पंतप्रधानांनी धनुष्कोडी इथे कोदंडरामस्वामी मंदिरात दर्शन घेऊन पूजा केली

January 21st, 03:41 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज धनुष्कोडी इथे कोदंडरामस्वामी मंदिरात दर्शन घेऊन पूजा केली.

तामिळनाडूतील अरुलमिगू रामनाथस्वामी मंदिरात पंतप्रधानांनी केली प्रार्थना

January 20th, 07:48 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडूतील अरुलमिगू रामनाथस्वामी मंदिरात प्रार्थना केली.

तामिळनाडूतील श्री रंगनाथस्वामी मंदिरात पंतप्रधानांनी केली प्रार्थना

January 20th, 07:38 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडूतील श्री रंगनाथस्वामी मंदिरात प्रार्थना केली.

पंतप्रधान येत्या 20-21 जानेवारीला, तामिळनाडू इथल्या विविध मंदिरांत जाऊन घेणार देवदर्शन

January 18th, 06:59 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी, येत्या 20 -21 जानेवारी 2024 रोजी, तामिळनाडूतील काही महत्वाच्या मंदिरात दर्शन देणार आहेत.

केरळमधील त्रिप्रयार येथील श्री रामास्वामी मंदिरात पंतप्रधानांनी दर्शन घेऊन केली पूजा

January 17th, 05:44 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळमधील त्रिप्रयार येथील श्री रामास्वामी मंदिरात दर्शन घेऊन पूजा केली. यावेळी पंतप्रधानांनी एका सांस्कृतिक कार्यक्रमाला हजेरी लावली तसेच कलाकार आणि बटूकांचा सत्कारही केला.

केरळमधील गुरुवायूर येथील गुरुवायूर मंदिरात पंतप्रधानांनी दर्शन घेऊन केली पूजा

January 17th, 01:59 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळमधील गुरुवायूर येथील गुरुवायूर मंदिरात दर्शन घेतले आणि पूजा केली.

नाशिक येथील श्री काळाराम मंदिरात पंतप्रधानांनी दर्शन घेऊन केली पूजा

January 12th, 03:18 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नाशिक येथील श्री काळाराम मंदिरात दर्शन घेऊन पूजा केली. श्रीराम कुंड येथेही त्यांनी दर्शन घेऊन पूजा केली. पंतप्रधानांनी, स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

छत्तीसगडमधील डोंगरगड येथे पंतप्रधानांनी माता बमलेश्वरीची केली पूजा

November 05th, 02:40 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडमधील डोंगरगड येथे माता बमलेश्वरीची पूजा केली आणि राज्यातील नागरिकांच्या सुख-समृद्धीसाठी देवीचे आशीर्वाद मागितले.

पंतप्रधान 30 - 31 ऑक्टोबर रोजी गुजरातला भेट देणार

October 29th, 02:20 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 - 31 ऑक्टोबर रोजी गुजरातला भेट देणार आहेत. 30 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 वाजता ते अंबाजी मंदिरात पूजा करुन दर्शन घेतील. त्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास ते मेहसाणा येथील खेरालू येथे विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी करतील. 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता ते केवडियाला भेट देतील. इथे ते एकतेचा पुतळा (स्टॅच्यू ऑफ युनिटी) या वास्तुला पुष्पांजली अर्पण करतील, त्यानंतर राष्ट्रीय एकता दिवस कार्यक्रम साजरा होईल. त्यानंतर ते केवडियातच, अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. त्यानंतर, सकाळी सुमारे 11:15 वाजता, ते आरंभ 5.0 च्या समारोप प्रसंगी 98 व्या कॉमन फाउंडेशन कोर्स या अभ्यासक्रमाच्या अधिकारी प्रशिक्षणार्थींना संबोधित करतील.