आसाममध्ये गोलाघाट येथील पॉलीप्रॉपिलीन प्रकल्पाच्या पायाभरणी प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

September 14th, 03:30 pm

आसामचे लोकप्रिय मुख्यमंत्री हिमंत विश्व शर्मा जी, केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल जी, हरदीपसिंह पुरी जी, आसाम सरकारमधील मंत्री, खासदार, आमदार आणि मोठ्या संख्येने उपस्थित माझ्या बंधू-भगिनींनो!

आसाममध्ये गोलाघाट येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बायोइथेनॉल प्लांटचे उद्घाटन, पॉलिप्रोपिलिन युनिटची केली पायाभरणी

September 14th, 03:00 pm

स्वच्छ ऊर्जा वापराला प्रोत्साहन देण्याच्या आणि जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करण्याच्या उद्देशाने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आसाममधील गोलाघाट येथील नुमालीगढ रिफायनरी लिमिटेड (NRL) मध्ये आसाम बायोइथेनॉल प्लांटचे उद्घाटन केले आणि पॉलीप्रॉपिलीन प्लांटची पायाभरणी केली. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी शारदीय दुर्गा पूजेच्या निमित्ताने सर्व नागरिकांना आणि आसामच्या जनतेला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यांनी महान आध्यात्मिक व्यक्तिमत्व श्रीमंत शंकरदेव यांच्या जयंतीचे महत्त्व विशद केले आणि आदरणीय गुरुजनांना श्रद्धांजली वाहिली.