आणीबाणीच्या काळात लोकशाहीचे रक्षण करणाऱ्यांना पंतप्रधानांची आदरांजली

June 25th, 10:53 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आणीबाणीच्या काळात लोकशाही मूल्यांचे खंबीरपणे रक्षण करणाऱ्या सर्वांना आदरांजली वाहिली आणि आणीबाणी हा भारताच्या इतिहासातील सर्वात काळ्या अध्यायांपैकी एक असल्याचा उल्लेख केला. या काळात मूक न राहता संविधानात अंतर्भूत असलेल्या आदर्शांचे रक्षण करणाऱ्या असंख्य नागरिकांचे असामान्य धैर्य आणि चिकाटीही दिसून आली, असे त्यांनी नमूद केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री मेजर जनरल भुवन चंद्र खांडूरी (सेवानिवृत्त) यांच्या निधनाबद्ल शोक व्यक्त केला

May 19th, 01:31 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री मेजर जनरल भुवन चंद्र खांडूरी (सेवानिवृत्त) यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

भारताच्या पंतप्रधानांच्या नेदरलँड्स भेटीनिमित्त भारत-नेदरलँड्स संयुक्त निवेदन

May 17th, 03:45 am

16 मे रोजी सकाळी नेदरलँड्सचे राजे विलियम अलेक्झांडर आणि राणी मॅक्सिमा यांनी द्विपक्षीय बैठकीसाठी हेग येथील ह्युस्टन बॉस रॉयल पॅलेस येथे पंतप्रधान मोदी यांचे स्वागत केले. महाराजांनी पंतप्रधान मोदींसमवेत भोजन घेतले.

भारत-नेदरलँड्स धोरणात्मक भागीदारीचा मार्गदर्शक आराखडा [2026-2030]

May 17th, 03:15 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेदरलँड्सचे पंतप्रधान रॉब जेटन यांच्यात 16 मे 2026 रोजी हेग इथे द्विपक्षीय बैठक झाली. या बैठकीदरम्यान दोन्ही नेत्यांनी लक्ष्यित, कालबद्ध रितीने आखलेले उपक्रम आणि संयुक्त कृती-आराखड्याच्या माध्यमातून भारत आणि नेदरलँड्स मधील द्विपक्षीय संबंधांना धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्यावर सहमती व्यक्त केली. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, भारत आणि नेदरलँड्स यांनी पुढील 5 वर्षांसाठी (2026-2030) भारत-नेदरलँड्स धोरणात्मक भागीदारी विषयक मार्गदर्शक आराखड्याचा अवलंब केला आहे.

पंतप्रधानांचे खासदारांना नारी शक्ती वंदन अधिनियम दुरुस्ती समर्थनार्थ मतदान करण्याचे आवाहन; ही ऐतिहासिक संधी असल्याचे प्रतिपादन

April 17th, 02:13 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारी शक्ती वंदन अधिनियम दुरुस्तीबाबत संसदेत चर्चा सुरू असल्याचे सांगितले आणि काल मध्यरात्रीनंतर एक वाजेपर्यंत ही चर्चा सुरू होती, असे त्यांनी नमूद केले.

पुद्दुचेरीमधील विविध विकास प्रकल्पांच्या उद्घाटनादरम्यान पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर

March 01st, 12:00 pm

पुदुचेरीचे मुख्यमंत्री एन. रंगासामी, माझे केंद्रीय मंत्रिमंडळातील सहकारी मनसुख मांडवीय, पुद्दुचेरीचे नायब राज्यपाल के. कैलाशनाथन, सभापती आर. सेल्वम, गृहमंत्री ए. नमस्सिवायम, इतर नेते, पुद्दुचेरीच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, वणक्कम्!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुद्दुचेरीमध्ये 2700 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी केली

March 01st, 11:45 am

यावेळी आयोजित सभेला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले, पुद्दुचेरी ही सिद्ध, संत, कवी आणि स्वातंत्र्यसैनिकांची भूमी आहे, जिथे महाकवी सुब्रमण्य भारती यांनी राष्ट्रवादाची ज्योत पेटवली आणि श्री अरविंद व माताजींनी जगाला आध्यात्मिक दृष्टी प्रदान केली.

अबू धाबीचे युवराज शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायेद अल नहयान यांचा भारत दौरा

February 19th, 05:45 pm

अबू धाबीचे युवराज शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायेद अल नहयान 18-19 फेब्रुवारी 2026 दरम्यान भारताच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत.19 फेब्रुवारी 2026 रोजी नवी दिल्ली येथे आयोजित एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी ते भारतात आले आहेत. सप्टेंबर 2024 मध्ये झालेल्या त्यांच्या मागील भेटीनंतर ही त्यांची दुसरी अधिकृत भारत भेट आहे.

The greatest pride of my life is that I am a karyakarta of the Bharatiya Janata Party: PM Modi at BJP HQ

January 20th, 11:16 am

Prime Minister Narendra Modi today addressed party leaders and karyakartas during the felicitation ceremony of the newly elected BJP President, Nitin Nabin, at the party headquarters in New Delhi. Congratulating Nitin Nabin, the Prime Minister said, “The organisational election process reflects the BJP’s commitment to internal democracy, discipline and a karyakarta-centric culture. I congratulate karyakartas across the country for strengthening this democratic exercise.”

PM Modi addresses BJP karyakartas at felicitation of New Party President

January 20th, 11:15 am

Prime Minister Narendra Modi today addressed party leaders and karyakartas during the felicitation ceremony of the newly elected BJP President, Nitin Nabin, at the party headquarters in New Delhi. Congratulating Nitin Nabin, the Prime Minister said, “The organisational election process reflects the BJP’s commitment to internal democracy, discipline and a karyakarta-centric culture. I congratulate karyakartas across the country for strengthening this democratic exercise.”

मिझोराममध्ये विकासकार्यांची पायाभरणी आणि उदघाटन समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण

September 13th, 10:30 am

मिझोरामचे राज्यपाल व्ही. के. सिंह जी, मुख्यमंत्री श्री लालदुहोमा जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री अश्विनी वैष्णव जी, मिझोराम सरकारमधले मंत्रिगण, खासदार आणि इतर लोकप्रतिनिधी, मिझोरामच्या शानदार जनतेला शुभेच्छा.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिझोरममधील आयझॉल येथे 9,000 कोटी रुपयांहून जास्त खर्चांच्या विकासकामांचे केले भूमिपूजन आणि उद्घाटन

September 13th, 10:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मिझोरममधील आयझॉल येथे 9,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चांच्या विकासकामांचे भूमिपूजन केले. हे प्रकल्प रेल्वे, रस्ते, ऊर्जा, क्रीडा यासह अनेक क्षेत्रांना गती देतील. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधानांनी निळ्या पर्वतांच्या सुंदर भूमीचे रक्षण करणाऱ्या सर्वोच्च देव पाथियनला नमन केले. मिझोरमच्या लेंगपुई विमानतळावर उपस्थित असूनही खराब हवामानामुळे ते आयझॉल येथे पोहचू शकले नाहीत, याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. तरीही या माध्यमातून लोकांचे प्रेम आणि आपुलकी अनुभवू शकत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.

आचार्य विनोबा भावे यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना वाहिली आदरांजली

September 11th, 08:51 am

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज आचार्य विनोबा भावे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे आणि भारताच्या आध्यात्मिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांनी दिलेल्या अतुलनीय योगदानाचे स्मरण केले.

पंतप्रधान 03ते 06 एप्रिल 2025 दरम्यान थायलंड आणि श्रीलंकेला भेट देणार

April 02nd, 02:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी बँकॉक येथे होणाऱ्या 6व्या BIMSTEC शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी (3-4 एप्रिल, 2025) थायलंडला भेट देतील. त्यानंतर, ते अध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायका यांच्या निमंत्रणावरून (4-6 एप्रिल, 2025) श्रीलंकेचा अधिकृत दौरा करतील.

For me, the nation itself is divine and mankind is a reflection of the divine: PM Modi in Lex Fridman Podcast

March 16th, 11:47 pm

PM Modi interacted with Lex Fridman in a podcast about various topics ranging from fasting to his humble beginnings to AI and more. He stressed on the unifying power of sports and said that they connect people on a deeper level and energize the world. He remarked that the management of Indian elections should be studied worldwide.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका पॉडकास्टमध्ये लेक्स फ्रिडमन यांच्याशी साधला संवाद

March 16th, 05:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका पॉडकास्टच्या माध्यमातून आज अमेरिकी संगणक शास्त्रज्ञ लेक्स फ्रिडमन यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधला. या मनमोकळ्या संभाषणादरम्यान जेव्हा पंतप्रधानांना विचारण्यात आले की ते उपवास का करतात आणि कशा पद्धतीने करतात तेव्हा मोदी यांनी पंतप्रधानांप्रती आदराचे प्रतीक म्हणून स्वतः उपवास धरण्याच्या लेक्स फ्रिडमन यांच्या कृतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “भारतात धार्मिक परंपरा दैनंदिन जीवनासोबत खोलवर रुजलेल्या आहेत ,” असे पंतप्रधान म्हणाले. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या अर्थानुसार, हिंदुत्व हे केवळ धार्मिक रीतीभातीविषयीचे तत्व नसून जीवनाला मार्गदर्शन करणारे तत्वज्ञान आहे असे त्यांनी सांगितले. उपवास हे शिस्त अंगी बाणवण्यासाठीचे तसेच आंतरिक आणि बाह्य आत्म्याचा समतोल साधण्यासाठीचे साधन आहे यावर मोदी यांनी अधिक भर दिला. उपवास केल्यामुळे आपल्या जाणीवा अधिक संवेदनशील तसेच जागरूक होऊन अधिक प्रखर बनतात असे त्यांनी नमूद केले. उपवासाच्या काळात कोणाकोणाला सूक्ष्म सुगंध आणि तपशील अधिक स्पष्टपणे जाणवतात असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. उपवासामुळे विचार प्रक्रियेला वेग येऊन नवीन दृष्टीकोन सापडत जातात आणि चौकटीबाहेरच्या विचारांना प्रोत्साहन मिळते असे देखील पंतप्रधानांनी अधोरेखित केले. उपवास म्हणजे केवळ अन्न वर्ज्य करणे नव्हे तर त्यामध्ये मनाची तसेच शरीराची तयारी आणि विषारी तत्वांचे निःसारण करण्याची शास्त्रीय प्रक्रिया समाविष्ट आहे असे त्यांनी स्पष्ट केले. कितीतरी दिवस आधीच ते आयुर्वेदिक आणि योग प्रक्रियांचे अनुसरण करून ते उपवासासाठी त्यांच्या शरीराला सज्ज करतात यावर अधिक भर देऊन पंतप्रधान मोदी यांनी या काळात पाणी पीत राहण्याचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की एकदा उपवास सुरु झाला की त्यानंतर ते त्याला भक्ती आणि स्वयंशिस्तीची कृती मानतात आणि त्या काळात सखोल आत्मचिंतन आणि लक्ष एकाग्र करण्यावर भर देतात. पंतप्रधान म्हणाले की त्यांच्या उपवासाचे मूळ वैयक्तिक अनुभवामध्ये असून त्यांच्या शालेय जीवनादरम्यान महात्मा गांधी यांच्या प्रेरणेतून सुरु झालेल्या चळवळीदरम्यान उपवास धरण्याची सुरुवात त्यांनी केली. त्यांच्या पहिल्याच उपवासादरम्यान त्यांना उर्जा आणि जागरुकता यामध्ये मोठी वाढ होत असल्याची अनुभूती आली आणि त्यातून उपवासाच्या परिवर्तनशील सामर्थ्याबद्दल त्यांची खात्री झाली असा अनुभव पंतप्रधानांनी सर्वांना सांगितला. उपवासामुळे त्यांच्या क्रिया मंद होत नाहीत तर उलट बहुतेकदा त्यांची उत्पादकता वाढते असे त्यांनी आवर्जून नमूद केले. ते म्हणाले की उपवासादरम्यान त्यांच्या विचारांचा ओघ अधिक मुक्तपणे आणि सर्जकतेसह वाहतो आणि त्यांच्यासाठी तो स्वतःला व्यक्त करण्याचा एक अतुलनीय अनुभव होऊन जातो.

India-Mauritius Joint Vision for an Enhanced Strategic Partnership

March 12th, 02:13 pm

PM Modi, during his visit to Mauritius, held productive talks with PM Dr. Navinchandra Ramgoolam, reaffirming the deep-rooted ties between India and Mauritius, built on shared history, culture, and values. They acknowledged the growing Comprehensive Strategic Partnership across trade, infrastructure, climate, and healthcare, committed to fostering prosperity, sustainable development, and regional stability.

India-Spain Joint Statement during the visit of President of Government of Spain to India (October 28-29, 2024)

October 28th, 06:32 pm

At the invitation of Prime Minister Narendra Modi, President of the Government of Spain, Mr. Pedro Sanchez paid an official visit to India. The two leaders noted that this visit has renewed the bilateral relationship, infusing it with fresh momentum and setting the stage for a new era of enhanced cooperation between the two countries across various sectors.

संसद टीव्हीच्या संयुक्त उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन

September 15th, 06:32 pm

आपल्या समवेत कार्यक्रमाला उपस्थित असलेले राज्यसभेचे माननीय सभापती आणि देशाचे उपराष्ट्रपती वेंकैया नायडू जी, लोकसभेचे माननीय अध्यक्ष ओम बिर्ला जी, राज्यसभेचे माननीय उपसभापती हरिवंश जी, लोकसभा आणि राज्यसभेतले विरोधी पक्षनेते, उपस्थित मान्यवर, पुरुष आणि महिला वर्ग!

उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि लोकसभा सभापतींच्या हस्ते संयुक्तपणे संसद टीव्हीचे उद्घाटन

September 15th, 06:24 pm

उपराष्ट्रपती आणि राज्यसभा अध्यक्ष एम वेंकैया नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा सभापती ओम बिर्ला यांच्या हस्ते आज संयुक्तरित्या, आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनाचे औचित्य साधत संसद टीव्हीचा शुभारंभ करण्यात आला.