पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2026 या नववर्षासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत
January 01st, 11:22 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2026 या नववर्षासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिडे जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धा 2025 मध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल कोनेरू हम्पीचे केले अभिनंदन
December 29th, 03:35 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोहा येथे झालेल्या फिडे जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धा 2025 मध्ये महिला गटात उत्कृष्ट कामगिरी करत कांस्यपदक जिंकल्याबद्दल कोनेरू हम्पी यांचे अभिनंदन केले आहे. खेळाप्रती त्यांची निष्ठा प्रशंसनीय आहे. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा, अशा शुभेच्छा पंतप्रधानांनी दिल्या.पवित्र प्रकाश उत्सवानिमित्त पंतप्रधानांनी श्री गुरु गोविंद सिंह जी यांना वाहिली आदरांजली
December 27th, 12:06 pm
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज पवित्र प्रकाश उत्सवानिमित्त श्री गुरु गोविंद सिंहजी यांना आदरांजली वाहिली. ते धैर्य, करुणा आणि त्यागाचे अवतार होते आहेत, असे श्री मोदी यांनी सांगितले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना दिल्या आनंदमयी नाताळच्या शुभेच्छा
December 25th, 09:10 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना शांती, करुणा व आशेने भारलेल्या आनंदमयी नाताळच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण आपल्या समाजातील सलोखा आणखी दृढ करो, अशी कामनाही पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.सशस्त्र सीमा बलाच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या जवानांना शुभेच्छा
December 20th, 11:29 am
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी सशस्त्र सीमा बलाच्या स्थापना दिनानिमित्त संस्थेशी संबंधित सर्व जवानांना, कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त,दिव्यांग व्यक्तींना प्रतिष्ठा,सुलभ प्रवेश आणि संधी बहाल करण्यासाठीच्या वचनबद्धतेचा केला पुनरुच्चार
December 03rd, 04:09 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग बंधू आणि भगिनींना सन्मान, सुलभ प्रवेश आणि संधी देण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. दिव्यांगांनी त्यांच्या सर्जनशीलता आणि दृढनिश्चयामुळे विविध क्षेत्रात स्वतःचे वेगळेपण सिद्ध केले आहे आणि आपल्या राष्ट्रीय प्रगतीला लक्षणीयरीत्या समृद्ध केले आहे, असे पंतप्रधान म्हणाले. गेल्या काही वर्षात भारताने दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी अनेक कायदे, अनुकूल पायाभूत सुविधा, सर्वसमावेशक शैक्षणिक धोरणे आणि सहायक तंत्रज्ञानामध्ये नवोन्मेषी संकल्पनासह विविध उपक्रम राबवले आहेत, येणाऱ्या काळात आम्ही यादृष्टीने अधिक कार्य करु असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.माजी राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली आदरांजली
December 03rd, 09:11 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एका सक्रिय सेनानी पासून संविधान सभेचे अध्यक्षस्थान भूषवण्यापर्यंत आणि देशाचे पहिले राष्ट्रपती म्हणून राजेंद्र प्रसाद यांनी अद्वितीय प्रतिष्ठा, समर्पण आणि हेतूंमधील स्पष्टता या गुणांनी राष्ट्राची सेवा केली आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. सार्वजनिक जीवनातील त्यांचा दीर्घ प्रवास साधेपणा, धाडस आणि राष्ट्रीय एकतेप्रती असलेल्या श्रद्धेने परिपूर्ण आहे. त्यांची आदर्श सेवा आणि दूरदृष्टी पिढ्यान्पिढ्यांना प्रेरणा देत राहील. असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी तमिळ संगमम साठी दिल्या हार्दिक शुभेच्छा
December 02nd, 07:02 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पासून सुरु झालेल्या काशी तमिळ संगमम साठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. हा चैतन्यदायी कार्यक्रम 'एक भारत, श्रेष्ठ भारत' या भावनेला अधिक दृढ करतो. संगमम मध्ये येणाऱ्या प्रत्येकाला काशी मध्ये प्रसन्न आणि संस्मरणीय वास्तव्याचा लाभ होवो, अशा मी शुभेच्छा देतो.आसाम राज्य स्थापनादिनानिमित्त पंतप्रधानांनी आसामच्या जनतेला दिल्या शुभेच्छा
December 02nd, 03:56 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाम राज्य स्थापनादिनानिमित्त आसाममधील बंधु आणि भगिनींना शुभेच्छा दिल्या आहेत. स्वर्गदेव चाओलुंग सुकाफा यांचे स्वप्न पूर्ण करण्याप्रति आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करण्याचा आजचा दिवस आहे; असे मोदी म्हणाले. गेल्या काही वर्षांत, केंद्र आणि आसाममधील रालोआ सरकार आसामच्या प्रगतीला चालना देण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि जोडी हेडन यांच्या विवाहाप्रित्यर्थ दिल्या शुभेच्छा
November 29th, 09:05 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपले जिवलग मित्र ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि जोडी हेडन यांना त्यांच्या विवाहाप्रित्यर्थ मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.दृष्टीबाधित महिला टी20 विश्वकरंडक विजेत्या संघाशी पंतप्रधानांचा संवाद
November 28th, 10:15 am
सर, ती गाते हे तुम्हाला कसे कळलेभारतीय अंध महिला टी-20 विश्वचषक विजेत्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला संवाद
November 28th, 10:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीतील 7, लोक कल्याण मार्ग येथे भारतीय अंध महिला टी-20 विश्वचषक विजेत्यांशी संवाद साधला. मोदींनी खेळाडूंशी अतिशय जिव्हाळ्याने बातचीत केली. त्यांच्या दृढनिश्चयाचे कौतुक केले; आत्मविश्वास आणि कठोर परिश्रम करत त्यांचा प्रवास सुरू ठेवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले. कठोर परिश्रमाने पुढे जाणारे लोक केवळ क्रीडा क्षेत्रातच नव्हे तर जीवनातील इतर क्षेत्रातही कधीच अपयशी ठरत नाहीत, यावर त्यांनी भर दिला. खेळाडूंनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे, असे त्यांनी नमूद केले.हीपंतप्रधानांनी अंध महिला टी-20 विश्वचषक विजेत्या भारतीय अंध महिला क्रिकेट संघाचे केले स्वागत
November 27th, 10:03 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अंध महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या भारतीय अंध महिला क्रिकेट संघाचे स्वागत केले. पंतप्रधान मोदी यांनी खेळाडूंशी संवाद साधला, त्यावेळी खेळाडूंनी स्पर्धेतील त्यांचे अनुभव सामायिक केले.टोकियो येथे झालेल्या 25 व्या उन्हाळी डेफलिंपिक्स 2025 मधील असामान्य कामगिरीबद्दल भारतीय डेफलिंपियन्सचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
November 27th, 05:10 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज टोकियो येथे झालेल्या 25 व्या उन्हाळी डेफलिंपिक्स 2025 मधील असामान्य कामगिरीबद्दल भारतीय डेफलिंपियन्सचे हार्दिक अभिनंदन केले.भारतीय अंध महिला क्रिकेट संघाने मिळवलेल्या पहिल्या T20 अंध महिला क्रिकेट विश्वचषक विजयाबद्दल पंतप्रधानांनी भारतीय संघाचे केले अभिनंदन
November 24th, 12:23 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय अंध महिला क्रिकेट संघाचे, अंध महिला T 20 विश्वचषक प्रथमच जिंकून इतिहास रचल्याबद्दल अभिनंदन केले आहे.देशाचे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या शपथविधी समारंभाला पंतप्रधान उपस्थित
November 24th, 11:37 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भारताचे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या शपथविधी समारंभाला उपस्थित होते.पंतप्रधानांनी काशी खासदार क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांचे आणि सहभागींचे केले अभिनंदन
November 21st, 03:46 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी खासदार क्रीडा स्पर्धेतील सर्व विजेत्यांचे आणि सहभागींचे हार्दिक अभिनंदन केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छठ पूजेच्या पवित्र खरना विधीनिमित्त दिल्या शुभेच्छा
October 26th, 10:44 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महापूजा छठमधील खरना या महत्त्वाच्या विधीनिमीत्त सर्व भक्तांना शुभेच्छा दिल्या आहेत. या पवित्र उत्सवातील कठोर व्रत आणि विधी करणाऱ्या सर्वांप्रती त्यांनी आदराची भावना व्यक्त केली आहे.बोलिव्हियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल रॉड्रिगो पाझ परेरा यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
October 21st, 06:37 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बोलिव्हियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल रॉड्रिगो पाझ परेरा यांचे हार्दिक अभिनंदन केले.जपानच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल साने ताकाइची यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
October 21st, 11:24 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल साने ताकाइची यांचे हार्दिक अभिनंदन केले. X या समाजमाध्यमावरच्या संदेशात, पंतप्रधान मोदींनी भारत-जपान विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी अधिक मजबूत करण्याची वचनबद्धता व्यक्त केली.