The aspirations, skills and potential of our youth shape the path to a Viksit Bharat: PM Modi at VBRY programme
June 19th, 05:15 pm
Addressing beneficiaries, industry representatives and stakeholders of the PM Viksit Bharat Rozgar Yojana, PM Modi disbursed incentives worth around ₹2,400 crore and highlighted the government's commitment to empowering India's youth and boosting employment generation. He described PM-VBRY as a bridge between youth and industry, noting that the scheme has supported the creation of 15 lakh jobs and brought nearly 70 lakh first-time employees under social security.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, प्रधान मंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत, 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहनपर निधीचे वितरण
June 19th, 05:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचे संबंधित लाभार्थी, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि विविध भागधारकांशी संवाद साधत, भारतातील युवकांना सक्षम बनवणे आणि देशभरात रोजगारनिर्मितीला अधिक चालना देण्यासाठीची सरकारची कटिबद्धता अधोरेखित केली. यावेळी पंतप्रधानांनी, प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत, 2,400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहनपर निधीचे वितरण केले. केंद्र सरकारच्या रोजगार-संलग्न प्रोत्साहन योजना या पथदर्शी अशा प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेच्या अंमलबजावणीतला हा एक महत्वाचा टप्पा ठरला असून विविध क्षेत्रात, समाजिक सुरक्षेची व्याप्तीही यामुळे वाढली आहे. या प्रोत्साहनपर निधीमुळे, देशभरात 15 लाख रोजगारनिर्मिती झाली आहे.पंतप्रधानांच्या हस्ते 19 जून रोजी पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत सुमारे 2,400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन रकमेचे होणार वितरण
June 17th, 03:14 pm
नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात दिनांक 19 जून 2026 रोजी संध्याकाळी 5 वाजता होणाऱ्या विशेष कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेंतर्गत (पीएम-व्हीबीआरवाय)2,400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन रकमेचे वितरण होणार आहे.रोजगार मेळाव्यात पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे केलेल्या भाषणाचा मजकूर
October 24th, 11:20 am
यंदाचा प्रकाशाचा उत्सव 'दिवाळी' तुमच्या सर्वांच्या जीवनात प्रकाशाची एक नवी तिरीप घेऊन आला आहे. सणासुदीच्या काळात कायमस्वरूपी नोकरीचे नियुक्तीपत्र मिळणे, म्हणजेच, उत्सवाचा उत्साह आणि यशाचा दुहेरी आनंद! हाच आनंद आज देशातील 51 हजारहून अधिक तरुण-तरुणींना मिळाला आहे. मला जाणवतंय की, तुम्हा सर्वांचे कुटुंबिय देखील किती आनंदले असतील. मी तुम्हा सर्वांचे आणि तुमच्या कुटुंबियांचे खूप खूप अभिनंदन करतो. जीवनाच्या या नवीन प्रारंभासाठी मी तुम्हाला अनेक शुभेच्छा देतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोजगार मेळ्याला केले संबोधित
October 24th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून रोजगार मेळाव्याला संबोधित केले. यावर्षीच्या दिव्यांच्या सणाने अर्थात दिवाळीने प्रत्येकाचे आयुष्य नव्याने उजळून टाकले आहे, असे पंतप्रधान म्हणाले. सण साजरे करत असताना कायमस्वरूपी नोकरीची नियुक्ती पत्रे हातात येणे म्हणजे सणांचा उत्साह आणि रोजगार मिळाल्याचे यश असा द्विगुणित आनंद होय. हा आनंद आज देशभरातील 51,000 युवकांपर्यंत पोहोचला आहे, असे पंतप्रधान म्हणाले. यामुळे सर्वांच्या कुटुंबियांना अमाप आनंद मिळाल्याचे सांगून त्यांनी सर्व उमेदवारांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे अभिनंदन केले. त्यांच्या आयुष्यातील नवीन आरंभाबद्दल त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.दिल्लीमध्ये यशोभूमी येथे इंडिया मोबाईल काँग्रेस 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
October 04th, 10:45 am
मंत्रिमंडळातले माझे सहकारी ज्योतिरादित्य सिंदिया जी, राज्यमंत्री चंद्र शेखर पेम्मासानी जी,विविध राज्यांचे प्रतिनिधी,परदेशातून आपले अतिथी,टेलीकॉम क्षेत्रातले मान्यवर,विविध महाविद्यालयांमधून आलेले माझे युवा मित्र,महिला आणि पुरुष वर्ग,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 62,000 कोटी रुपयांहून जास्त खर्चाच्या युवा केंद्रित उपक्रमांचा शुभारंभ करताना, कौशल दीक्षांत समारोह कार्यक्रमाला केले संबोधित
October 04th, 10:29 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे कौशल्य दीक्षांत समारोहादरम्यान 62,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध युवा-केंद्रित उपक्रमांचा शुभारंभ केला. पंतप्रधानांनी देशातील आयटीआय अर्थात औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये शिकणारे लाखो विद्यार्थी, तसेच बिहारमधील विद्यार्थी आणि शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी आठवण करून दिली की काही वर्षांपूर्वी सरकारने आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणात दीक्षांत समारंभ आयोजित करण्याची नवी परंपरा सुरू केली होती. आजचा दिवस त्या परंपरेतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे, असे त्यांनी यावेळी नमूद केले.अहमदाबाद येथील कन्या वसतिगृह - सरदारधाम दुस-या टप्प्याच्या शिलान्यास कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
August 24th, 10:39 pm
केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सर्व सहकारी, गुजरात सरकारचे सर्व मंत्री, उपस्थित सर्व खासदार, सर्व आमदार, सरदारधामचे प्रमुख गगजी भाई, विश्वस्त व्ही. के. पटेल, आणि इतर सर्व मान्यवर, आणि माझ्या प्रिय बंधून भगिनींनो, विशेषत्वाने प्रिय कन्या !!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अहमदाबादच्या सरदारधाम टप्पा –2, कन्या वसतिगृह येथील भूमिपूजन सोहळ्यातील भाषण
August 24th, 10:25 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 ऑगस्ट 2025 रोजी गुजरातमधील अहमदाबाद येथील सरदारधाम टप्पा –2, कन्या वसतिगृह भूमिपूजन सोहळ्यास व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले. उपस्थितांना उद्देशून बोलताना पंतप्रधानांनी नमूद केले की, सरदारधाम हे नाव जितके पवित्र आहे तितकेच त्याचे कार्यही पवित्र आहे. मुलींच्या शिक्षण व सेवेसाठी समर्पित अशा या वसतिगृहाच्या उद्घाटनाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, या वसतिगृहात राहणाऱ्या मुली आपल्या सोबत स्वप्ने आणि आकांक्षा घेऊन येतील व त्या पूर्ण करण्यासाठी त्यांना भरपूर संधी येथे उपलब्ध होतील. या मुली आत्मनिर्भर आणि सक्षम झाल्यानंतर स्वाभाविकपणे राष्ट्रनिर्मितीत मोलाचे योगदान देतील तसेच त्यांचे कुटुंबही सक्षम होईल, असे ते म्हणाले. पंतप्रधानांनी या वसतिगृहात प्रवेश मिळविणाऱ्या सर्व मुलींना आणि त्यांच्या कुटुंबियांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.बिहारच्या गया जीमधील विविध विकास प्रकल्पांच्या उद्घाटनावेळी पंतप्रधानांचे भाषण
August 22nd, 12:00 pm
बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खानजी, येथील लोकप्रिय मुख्यमंत्री नितीश कुमारजी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी जीतन राम मांझीजी, राजीव रंजन सिंह, चिराग पासवानजी, राम नाथ ठाकूरजी, नित्यानंद रायजी, सतीश चंद्र दुबेजी, राज भूषण चौधरीजी, उपमुख्यमंत्री सम्राट चौधरीजी, विजय कुमार सिन्हाजी, बिहार सरकारचे मंत्रीगण, संसदेतील माझे सहकारी उपेंद्र कुशवाहा जी, इतर खासदार आणि बिहारमधील माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमधील गया येथे 12,000 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे भूमीपूजन आणि उद्घाटन
August 22nd, 11:20 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज बिहारमधील गया येथे 12,000 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे भूमीपूजन आणि उद्घाटन झाले. यावेळी पंतप्रधाननांनी ज्ञान आणि मुक्तीचे पवित्र शहर असलेल्या गयाजीला अभिवादन केले आणि विष्णुपद मंदिराच्या या गौरवशाली भूमीतून सर्वांना शुभेच्छाही दिल्या. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधितही केले. गयाजीची भूमी ही अध्यात्म आणि शांतीची भूमी आहे, असे पंतप्रधान म्हणाले. याच पवित्र भूमीवर भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती, ही बाब त्यांनी अधोरेखित केली. गयाजींचा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा अतिशय प्राचीन आणि समृद्ध आहे, असे पंतप्रधान म्हणाले. आपल्या शहराचा उल्लेख केवळ गया असा न करता तो आदरपूर्वक गयाजी असा केला जावा अशा, या प्रदेशातील जनतेच्या अपेक्षेचा आणि भावनेचा आदर केल्याबद्दल पंतप्रधानांनी बिहार सरकारचे अभिनंदन केले. केंद्र सरकार आणि बिहारमधील सरकारे गयाजीच्या जलद विकासासाठी सातत्याने काम करत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.पंतप्रधान मोदी यांचे 79 व्या स्वातंत्र्यदिनाचे भाषण: विकसित भारत 2047 साठी एक दृष्टीकोन
August 15th, 11:58 am
79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरून तब्बल 103 मिनिटांचे त्यांचे सर्वात मोठे आणि सर्वात निर्णायक भाषण दिले, ज्यामध्ये त्यांनी 2047 पर्यंत विकसित भारताच्या उभारणीसाठी एक धाडसी आराखडा मांडला. स्वयंपूर्णता , नवोन्मेष आणि नागरिक सक्षमीकरणावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करून, पंतप्रधानांनी इतर देशांवर अवलंबून असलेला देश ते जागतिक स्तरावरचा प्रचंड आत्मविश्वास असलेला , तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत आणि आर्थिकदृष्ट्या लवचिक देश हा आतापर्यंतचा भारताचा प्रवास अधोरेखित केला.