गुजरातमध्ये देडियापाडा येथे जनजातीय गौरव दिन कार्यक्रमातील पंतप्रधानांचे भाषण
November 15th, 03:15 pm
गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत जी, इथले लोकप्रिय मुख्यमंत्री श्रीमान भूपेंद्र भाई पटेल, गुजरात भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जगदीश विश्वकर्मा जी, गुजरात सरकारमधले मंत्री नरेश भाई पटेल, जयराम भाई गामीत जी, संसदेतले माझे जुने मित्र मनसुख भाई वसावा जी, भगवान बिरसा मुंडा यांचा परिवारातले व्यासपीठावर उपस्थित सर्व सदस्य, देशाच्या कानाकोपऱ्यातून या कार्यक्रमात सहभागी झालेले माझे आदिवासी बंधुभगिनी, अन्य सर्व आदरणीय व्यक्ती आणि आत्ता देशात सुरू असलेल्या अनेक कार्यक्रमांमधून तंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्याशी जोडले गेलेले अनेक लोक, राज्याराज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्री अशा सर्वांना जनजातीय गौरव दिनाच्या निमित्ताने मी मनापासून शुभेच्छा देतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील देडियापाडा येथे धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त जनजातीय गौरव दिवस कार्यक्रमाला केले संबोधित
November 15th, 03:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील देडियापाडा येथे धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त जनजातीय गौरव दिवस कार्यक्रमाला संबोधित केले. या प्रसंगी त्यांनी 9,700 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. माँ नर्मदेची पवित्र भूमी आज आणखी एका ऐतिहासिक प्रसंगाची साक्षीदार होत आहे असे सांगून, मोदी यांनी भारताची एकता आणि विविधता साजरी करण्यासाठी 31 ऑक्टोबर रोजी सरदार पटेल यांची 150 वी जयंती याच ठिकाणी साजरी करण्यात आली होती, भारत पर्वाची सुरुवात झाली होती याची आठवण करून दिली. भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीच्या भव्य सोहळ्यासह भारत पर्वचा समारोप होत आहे असे पंतप्रधानांनी सांगितले .या शुभ प्रसंगी त्यांनी भगवान बिरसा मुंडा यांना आदरांजली वाहिली. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि संपूर्ण आदिवासी पट्ट्यात स्वातंत्र्याची भावना जागृत करणाऱ्या गोविंद गुरुंचे आशीर्वाद देखील या कार्यक्रमाशी जोडलेले आहेत असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. व्यासपीठावरून त्यांनी गोविंद गुरुंना आदरांजली वाहिली. थोड्या वेळापूर्वी देवमोगरा मातेच्या मंदिराला भेट देण्याचा आणि पुन्हा एकदा त्यांच्या चरणी नतमस्तक होण्याचे सौभाग्य लाभले असे ते म्हणाले.15 नोव्हेंबर रोजी ‘जनजातीय गौरव दिवसा निमित्त पंतप्रधान गुजरातमधील नर्मदा जिल्ह्याला भेट देणार
November 14th, 11:41 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 नोव्हेंबर रोजी गुजरातला भेट देणार असून, दुपारी 12:45 वाजता ते नर्मदा जिल्ह्यातील देवमोगरा मंदिरात पूजा आणि दर्शन करतील. त्यानंतर सुमारे 2:45 वाजता ते नर्मदा जिल्ह्यातील डेडियापाडा येथे धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होतील. या प्रसंगी पंतप्रधान 9,700 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध पायाभूत आणि विकास प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन करतील आणि उपस्थितांना संबोधित करतील.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवा रायपूर येथे छत्तीसगड रौप्य महोत्सवी समारंभात केलेले भाषण
November 01st, 03:30 pm
छत्तीसगडचे राज्यपाल आदरणीय रमेन डेका जी, राज्याचे लोकप्रिय आणि ऊर्जावान मुख्यमंत्री विष्णु देव साय जी, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे ज्येष्ठ मित्र जुएल ओरांव जी, दुर्गा दास उइके जी, तोखन साहू जी, राज्य विधानसभेचे अध्यक्ष रमन सिंह जी, उपमुख्यमंत्री अरुण साहू जी, विजय शर्मा जी, उपस्थित मंत्रीवर्ग, लोकप्रतिनिधी आणि छत्तीसगडच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने आलेल्या प्रिय बंधु भगिनींनो,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडच्या रजत महोत्सवाला केले संबोधित
November 01st, 03:26 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवा रायपूर येथे छत्तीसगड राज्याच्या स्थापनेला 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित 'छत्तीसगड रजत महोत्सवा'ला संबोधित केले. त्यांनी रस्ते, उद्योग, आरोग्यसेवा आणि ऊर्जा यांसारख्या प्रमुख क्षेत्रांना समाविष्ट करणाऱ्या 14,260 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विकास आणि परिवर्तनकारी प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी देखील केली. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी, छत्तीसगडच्या लोकांना शुभेच्छा दिल्या आणि आज छत्तीसगड राज्याच्या स्थापनेला 25 वर्षे पूर्ण झाली आहेत, असे सांगितले. या निमित्ताने त्यांनी छत्तीसगडच्या जनतेचे मनापासून अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.ओडिशातील झारसुगुडा येथे विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मराठी अनुवाद
September 27th, 11:45 am
येथे काही तरुण बांधव अनेक कलाकृती घेऊन आलेले आहेत. ओडिशातील कला प्रेम जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे. आपण दिलेली ही भेट मी आदरपूर्वक स्वीकारतो. माझे एसपीजी सहकारी या सर्व कलाकृती आपल्याकडून गोळा करतील. जर तुम्ही मागे तुमचे नाव व पत्ता लिहून दिलात, तर माझ्याकडून तुम्हाला पत्र अवश्य मिळेल. मागे एक लहान मूलही कलाकृती घेऊन उभे आहे, त्याचे हात दुखत असतील, कृपया त्याचीही मदत करा आणि वस्तू गोळा करून घ्या. मी या स्नेहपूर्ण भेटीसाठी आणि या कलाकृती भेट देणाऱ्या सर्व युवक-युवती व बालकांचे मनःपूर्वक आभार मानतो.ओदिशात झारसुगुडा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 60,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विकासकामांचे उद्घाटन आणि पायाभरणी
September 27th, 11:30 am
सुमारे दीड वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या आठवणींना उजाळा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ओदिशातील जनतेने त्यावेळी विकसित ओदिशा या ध्येयाने पुढे जाण्याचा दृढ संकल्प केला होता. आज केंद्र आणि राज्य सरकारांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे ओदिशा वेगाने प्रगतीच्या मार्गावर पुढे जात असल्याचे त्यांनी समाधानाने नमूद केले. पंतप्रधानांनी ओदिशा तसेच देशाच्या विकासासाठी हजारो कोटींच्या विविध प्रकल्पांची सुरुवात झाल्याची घोषणा केली. या प्रसंगी त्यांनी बीएसएनएलच्या स्वदेशी 4G सेवांचा शुभारंभ करत बीएसएनएलचा नवा अवतार जनतेसमोर सादर केला. याशिवाय, देशभरातील आयआयटी संस्थांच्या विस्तारालाही आज औपचारिक सुरुवात झाल्याचे त्यांनी सांगितले. ओदिशामध्ये शिक्षण, कौशल्य विकास आणि संपर्क सुविधा यांच्याशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते झाले. बेरहमपूर ते सुरत या मार्गावर धावणाऱ्या आधुनिक अमृत भारत गाडीला हिरवा झेंडा दाखवून त्यांनी जनतेसाठी मोठी सोय उपलब्ध करून दिली. या कार्यक्रमाला केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण, तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती-तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव, गुजरात मधील सुरत येथून दूरदृष्य प्रणाली द्वारे उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीचा पंतप्रधानांनी गौरवपूर्वक उल्लेख केला. या सर्व विकास उपक्रमांबद्दल ओदिशातील जनतेचे त्यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील ठळक मुद्दे
August 15th, 03:52 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील लाल किल्ल्यावरून 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशाला संबोधित केले. त्यांचे हे भाषण 103 मिनिटांचे असून लाल किल्ल्यावरील सर्वात जास्त काळ चाललेले आणि महत्त्वाचे भाषण ठरले. या भाषणात, त्यांनी 2025 पर्यंत विकसित भारतासाठी एक महत्त्वाकांक्षी आराखडा मांडला. आत्मनिर्भरता, नावीन्यपूर्णता, आणि नागरिकांचे सक्षमीकरण यावर पंतप्रधानांनी भर दिला. एकेकाळी दुसऱ्यांवर अवलंबून असलेला देश, आज जागतिक स्तरावर आत्मविश्वासाने भरलेला, तंत्रज्ञानाने प्रगत आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनला आहे, हे त्यांनी आपल्या भाषणातून अधोरेखित केले.79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेलं भाषण
August 15th, 07:00 am
स्वातंत्र्याचे हे महापर्व, 140 कोटी संकल्पाचे पर्व आहे. स्वातंत्र्याचे हे पर्व सामूहिक सिद्धींचे, गौरवाचे पर्व आहे. आणि हृदय अपेक्षांनी भरलेले आहे. देश एकतेच्या भावनेला सातत्याने बळकटी देत आहे. 140 कोटी देशवासीय आज तिरंग्याच्या रंगात रंगून गेले आहेत. हर घर तिरंगा... भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात, मग तो वाळवंटी भाग असो, किंवा हिमालयाची शिखरे असोत, सागर किनारे असोत, किंवा दाट लोकसंख्येचे भाग, प्रत्येक भागातून एकच आवाज घुमत आहे, एकच जयघोष आहे, आपल्या प्राणांपेक्षाही प्रिय मातृभूमीचे जयगान आहे …भारतात 79 वा स्वातंत्र्यदिन साजरा
August 15th, 06:45 am
79 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित करताना घटना समिती, स्वातंत्र्यसैनिक आणि संविधान निर्मात्यांना आदरांजली वाहिली. भारत नेहमीच आपल्या शेतकरी, पशुपालक आणि मच्छिमारांच्या हिताचे रक्षण करेल याचा त्यांनी पुनरुच्चार केला. 2047 पर्यंत विकसित भारत साध्य करण्याच्या उद्देशाने GST सुधारणा, प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना, राष्ट्रीय क्रीडा धोरण आणि सुदर्शन चक्र मिशन या प्रमुख उपक्रमांवर त्यांनी प्रकाश टाकला. पंचायत सदस्य आणि ड्रोन दीदी सारख्या विशेष अतिथींनी लाल किल्ल्यावरील सोहळ्याला हजेरी लावली.बिहारमधील मोतीहारी येथे विविध विकास कामांचा प्रारंभ करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
July 18th, 11:50 am
पवित्र श्रावण महिन्यामध्ये आपण बाबा सोमोश्वरनाथाच्या चरणी वंदन करीत आहोत आणि संपूर्ण बिहारवासियांचे जीवन सुखमय-शुभ व्हावे, यासाठी त्याने आपल्या सर्वांना आशीर्वाद द्यावेत, अशी प्रार्थना करीत आहोत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील मोतिहारी येथे 7,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन केले
July 18th, 11:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधील मोतिहारी येथे 7,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण केले. पवित्र श्रावण महिन्यात बाबा सोमेश्वरनाथांच्या चरणी नमस्कार करत पंतप्रधानांनी आशीर्वाद मागितले आणि बिहारमधील सर्व नागरिकांच्या जीवनात आनंद आणि समृद्धी नांदो, अशी सदिच्छा व्यक्त केली. सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ही चंपारणची भूमी आहे, या भूमीने इतिहासाला आकार दिला आहे. स्वातंत्र्य चळवळीदरम्यान, या भूमीने महात्मा गांधींना एक नवीन दिशा दिली. याच भूमीतील प्रेरणा आता बिहारचे नवे भविष्य घडवेल, असे ते म्हणाले. या विकास उपक्रमांसाठी त्यांनी उपस्थित असलेल्या सर्वांचे आणि बिहारच्या जनतेला अभिनंदन केले.श्री नारायण गुरु आणि गांधीजी यांच्यातील संवादाच्या शताब्दीनिमित्त आयोजित समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण
June 24th, 11:30 am
आज हा परिसर देशाच्या इतिहासातील एका अभूतपूर्व घटनेचे स्मरण करण्याचा साक्षीदार होतो आहे. ती एक अशी ऐतिहासिक घटना होती, ज्या घटनेने आपल्या स्वातंत्र्य चळवळीला केवळ एक नवीन दिशा दिली नाही तर स्वातंत्र्याच्या उद्दिष्टाला, स्वतंत्र भारताच्या स्वप्नाला ठोस अर्थ दिला. शंभर वर्षांपूर्वीची श्री नारायण गुरु आणि महात्मा गांधी यांची ती भेट आजही तितकीच प्रेरणादायी आणि प्रासंगिक आहे. शंभर वर्षांपूर्वी झालेली ती भेट आजही सामाजिक सौहार्द आणि विकसित भारताच्या सामूहिक उद्दिष्टांसाठी उर्जेचा एक मोठा स्रोत आहे. या ऐतिहासिक प्रसंगी, मी श्री नारायण गुरुंच्या चरणी प्रणाम करतो. गांधीजींनाही मी आदरांजली वाहतो.श्री नारायण गुरू आणि महात्मा गांधी यांच्यातील ऐतिहासिक संवादाच्या शताब्दी समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित
June 24th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील विज्ञान भवनात भारताचे दोन महान आध्यात्मिक आणि नैतिक नेते श्री नारायण गुरू आणि महात्मा गांधी यांच्यातील ऐतिहासिक संवादाच्या शताब्दी समारंभाला संबोधित केले. या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी आदरपूर्वक अभिवादन केले आणि सांगितले की आज हे ठिकाण देशाच्या इतिहासातील एका अभूतपूर्व क्षणाचे साक्षीदार आहे. आपल्या स्वातंत्र्यचळवळीला नवी दिशा देणारी ही एक ऐतिहासिक घटना होती, स्वतंत्र भारताच्या स्वप्नाला आणि स्वातंत्र्याच्या उद्दिष्टांना तिने ठोस अर्थ दिला,असे त्यांनी सांगितले. श्री नारायण गुरू आणि महात्मा गांधी यांच्यात 100 वर्षांपूर्वी झालेली ही भेट आजही प्रेरणादायी आणि प्रासंगिक आहे, आणि सामाजिक सलोखा आणि विकसित भारताच्या सामूहिक उद्दिष्टांसाठी उर्जेचा एक शक्तिशाली स्रोत आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. या ऐतिहासिक प्रसंगी, त्यांनी श्री नारायण गुरूंच्या चरणी वंदन केले आणि महात्मा गांधींना आदरांजली वाहिली.ओदिशाच्या राज्य सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले संबोधन
June 20th, 04:16 pm
ओदिशाचे राज्यपाल हरी बाबूजी, आपले लोकप्रिय मुख्यमंत्री मोहन चरण माझीजी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी जुएल ओरांवजी, धर्मेंद्र प्रधानजी, अश्विनी वैष्णवजी, ओदिशाचे उपमुख्यमंत्री कनक वर्धन सिंह देवजी, प्रवाती परिदाजी, राज्य सरकारचे इतर मंत्रीगण, खासदार आणि आमदारगण, आणि ओडिशातील माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनो!ओडिशा सरकारच्या वर्षपूर्ती कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 18,600 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी
June 20th, 04:15 pm
ओडिशा सरकारच्या एक वर्ष पूर्तीनिमित्त आज भुवनेश्वर येथे झालेल्या राज्यस्तरीय कार्यक्रमाचे अध्यक्षपद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूषवले. ओडिशाच्या सर्वांगीण विकासाच्या त्यांच्या वचनबद्धतेनुसार, पंतप्रधानांनी पिण्याचे पाणी, सिंचन, कृषी पायाभूत सुविधा, आरोग्य पायाभूत सुविधा, ग्रामीण रस्ते आणि पूल, राष्ट्रीय महामार्गांचे काही भाग आणि नवीन रेल्वे मार्ग यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांचा समावेश असलेल्या 18,600 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.From the land of Sindoor Khela, India showcased its strength through Operation Sindoor: PM Modi in Alipurduar, West Bengal
May 29th, 02:00 pm
PM Modi addressed a public meeting in Alipurduar, West Bengal. He ignited the spirit of the people urging them to take charge of shaping a prosperous future for Bengal & India. He lambasted the TMC for shielding corrupt leaders and appealed to the people to reject TMC. The PM invoked the Bengal’s spirit by saying “From the land of Sindoor Khela, India showcased its strength through Operation Sindoor.”PM Modi rallies in Alipurduar, West Bengal with a resounding Call to Action
May 29th, 01:40 pm
PM Modi addressed a public meeting in Alipurduar, West Bengal. He ignited the spirit of the people urging them to take charge of shaping a prosperous future for Bengal & India. He lambasted the TMC for shielding corrupt leaders and appealed to the people to reject TMC. The PM invoked the Bengal’s spirit by saying “From the land of Sindoor Khela, India showcased its strength through Operation Sindoor.”गुजरातमधील दाहोद येथे विविध विकास कामांच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
May 26th, 11:45 am
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र भाई, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, गुजरात सरकारच्या मंत्रिमंडळातील माझे सर्व सहकारी, खासदार, आमदार आणि इतर सर्व मान्यवर आणि दाहोदचे माझे प्रिय बंधू आणि भगिनी, कसे आहात आपण? जरा मोठय़ा आवाजात उत्तर द्या, आता दाहोदचा प्रभाव वाढला आहे. आज 26 मे आहे. 2014 मध्ये आजच्याच दिवशी मी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. तिरंगा झेंडा हवा आहे, तुम्ही गुजरातच्या जनतेने मला भरभरून आशीर्वाद दिला आणि नंतर देशातील कोट्यवधी जनतेनेही मला आशीर्वाद देण्यात कोणतीही कसर सोडली नाही. तुमच्या आशीर्वादाच्या बळावर मी दिवसरात्र देशवासीयांच्या सेवेत आहे. या वर्षांमध्ये देशाने असे निर्णय घेतले, जे अकल्पनीय होते, ते अभूतपूर्व आहेत. या वर्षांमध्ये देशाने अनेक दशकांच्या गुलामगिरीच्या बेड्या तोडल्या, देश प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहे. आज देश निराशेच्या अंधारातून बाहेर येऊन श्रद्धेच्या प्रकाशात तिरंगा झेंडा फडकवत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमधील दाहोद येथे 24,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण
May 26th, 11:40 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील दाहोद येथे 24,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण केले. उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले की, 26 मे या दिवसाला विशेष महत्व आहे कारण 2014 मध्ये आजच्याच दिवशी त्यांनी पहिल्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. देशाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवणाऱ्या गुजरातच्या जनतेच्या अढळ पाठिंब्याचा आणि आशीर्वादाचा त्यांनी उल्लेख केला. या विश्वासाने आणि प्रोत्साहनाने देशाची दिवसरात्र सेवा करण्याप्रति त्यांच्या समर्पणाला बळ दिले आहे असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. गेल्या काही वर्षांमध्ये भारताने असे काही निर्णय घेतले आहेत जे अभूतपूर्व आणि अकल्पनीय होते, दशकांच्या जुन्या बंधनांमधून मुक्त होत आज देश प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहे. आज, देश निराशेच्या आणि अंधाराच्या युगातून आत्मविश्वास आणि आशावादाच्या नवीन युगात उदयाला आला आहे, असे ते म्हणाले.