आसाममधील नामरूप येथील युरिया प्रकल्पाच्या भूमिपूजन प्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन

December 21st, 04:25 pm

ही वीरांची भूमी आहे. सौलुंग सुकाफा, महावीर लचित बोरफुकन, भीमबर देउरी, शहीद कुसल कुवर, मोरान राजा बोडौसा, मालती मेम, इंदिरा मिरी, स्वर्गदेव सर्वानंद सिंह आणि वीरांगना सती साधनी यांसारख्या महान व्यक्तींनी ही भूमी पवित्र केली आहे. अशा या वरच्या आसामच्या मातीत मी आदराने नमन करतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज आसाममधील दिब्रुगड मधील नामरूप इथे आसाम व्हॅली फर्टिलायझर अँड केमिकल कंपनी लिमिटेडच्या वतीने उभारल्या जात असलेल्या अमोनिया-युरिया खत प्रकल्पाची पायाभरणी

December 21st, 12:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज आसाममधील दिब्रुगड मधील नामरूप इथे आसाम व्हॅली फर्टिलायझर अँड केमिकल कंपनी लिमिटेडच्या वतीने उभारल्या जात असलेल्या अमोनिया-युरिया खत प्रकल्पाची पायाभरणी झाली. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधितही केले. ही भूमी चाओलंग सुखाफा आणि महावीर लाचित बोरफुकन यांसारख्या महान वीरांची भूमी असल्याचे त्यांनी नमूद केले. भीमबर देउरी, शहीद कुशल कुंवर, मोरान राजा बौदोसा, मालती मेम, इंदिरा मिरी, स्वर्गदेव सर्वानंद सिंग आणि पराक्रमी सती साधनी यांच्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेखही त्यांनी यावेळी केला. या शौर्य आणि बलिदानाच्या महान भूमीला, उजनी आसामच्या पवित्र मातीला आपण नमन करत असल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली.

Talking to you felt like talking to a family member, not the Prime Minister: Farmers say to PM Modi

October 12th, 06:45 pm

During the interaction with farmers at a Krishi programme in New Delhi, PM Modi enquired about their farming practices. Several farmer welfare initiatives like Government e-Marketplace (GeM) portal, PM-Kisan Samman Nidhi, Pradhan Mantri Matsya Sampada Yojana, and PM Dhan Dhaanya Krishi Yojana were discussed. Farmers thanked the Prime Minister for these initiatives and expressed their happiness.

35,440 कोटी रुपयांच्या दोन महत्त्वाच्या कृषी योजनांच्या शुभारंभाच्या प्रसंगी कृषी कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला

October 12th, 06:25 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेत आयोजित कृषी कार्यक्रमात शेतकऱ्यांशी संवाद साधला. हा कार्यक्रम शेतकऱ्यांचे कल्याण, कृषी स्वावलंबन आणि ग्रामीण पायाभूत सुविधा बळकट करण्याबाबत पंतप्रधानांच्या सातत्यपूर्ण वचनबद्धतेला अधोरेखित करतो. पंतप्रधान मोदी यांनी सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होण्यापूर्वी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. यावेळी त्यांनी कृषी क्षेत्रातील दोन महत्त्वपूर्ण योजनांचा शुभारंभ केला, ज्यासाठी एकूण 35,440 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी पी एम धन धान्य कृषी योजना 24,000 कोटींच्या तरतुदीसह सुरू करण्यात आली, तर डाळींच्या आत्मनिर्भरतेसाठी मोहीम सुरु करण्यात अली असून, त्यासाठी 11,440 कोटी रुपयांची तरतूद जाहीर करण्यात आली.

प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजनेच्या प्रारंभ प्रसंगी तसेच नवी दिल्लीतील भारतीय कृषी संशोधन संस्थेत विविध योजनांच्या उद्घाटन आणि पायाभरणीप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

October 11th, 12:30 pm

व्यासपीठावर विराजमान केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान जी, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्याशी जोडले गेलेले राजीव रंजन सिंह जी, श्रीमान भागीरथ चौधरी जी, विभिन्न राज्यांचे मुख्यमंत्री, संसद सदस्य, आमदार, इतर महानुभाव आणि देशभरातून या कार्यक्रमात जोडले गेलेल्या माझ्या सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींनो!!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कृषी क्षेत्रातील 35,440 कोटी रुपये खर्चाच्या दोन महत्त्वाच्या योजनांची सुरुवात

October 11th, 12:00 pm

या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी क्षेत्रातील 35,440 कोटी रुपये खर्चाच्या दोन महत्त्वाच्या योजनांचा प्रारंभ केला.यावेळी त्यांनी 24,000 कोटी रुपये खर्चाची पंतप्रधान धनधान्य कृषी योजना सुरु केली. तसेच त्यांनी 11,440 कोटी रुपये खर्चाचे डाळींच्या क्षेत्रातील आत्मनिर्भरता अभियान देखील सुरु केले. पंतप्रधानांनी कृषी, पशुपालन, मत्स्यव्यवसाय तसेच अन्न प्रक्रिया या क्षेत्रांतील 5,450 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन करून त्यांचे लोकार्पण देखील केले आणि सुमारे 815 कोटी रुपये खर्चाच्या अतिरिक्त प्रकल्पांची पायाभरणी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेत एका विशेष कृषी कार्यक्रमात होणार सहभागी

October 10th, 06:10 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10:30 वाजता नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेत एका विशेष कृषी कार्यक्रमात सहभागी होतील. पंतप्रधान शेतकऱ्यांशी संवाद साधतील आणि त्यानंतर एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होऊन उपस्थितांना संबोधित करतील.

79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील ठळक मुद्दे

August 15th, 03:52 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील लाल किल्ल्यावरून 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशाला संबोधित केले. त्यांचे हे भाषण 103 मिनिटांचे असून लाल किल्ल्यावरील सर्वात जास्त काळ चाललेले आणि महत्त्वाचे भाषण ठरले. या भाषणात, त्यांनी 2025 पर्यंत विकसित भारतासाठी एक महत्त्वाकांक्षी आराखडा मांडला. आत्मनिर्भरता, नावीन्यपूर्णता, आणि नागरिकांचे सक्षमीकरण यावर पंतप्रधानांनी भर दिला. एकेकाळी दुसऱ्यांवर अवलंबून असलेला देश, आज जागतिक स्तरावर आत्मविश्वासाने भरलेला, तंत्रज्ञानाने प्रगत आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनला आहे, हे त्यांनी आपल्या भाषणातून अधोरेखित केले.

79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेलं भाषण

August 15th, 07:00 am

स्वातंत्र्याचे हे महापर्व, 140 कोटी संकल्पाचे पर्व आहे. स्वातंत्र्याचे हे पर्व सामूहिक सिद्धींचे, गौरवाचे पर्व आहे. आणि हृदय अपेक्षांनी भरलेले आहे. देश एकतेच्या भावनेला सातत्याने बळकटी देत आहे. 140 कोटी देशवासीय आज तिरंग्याच्या रंगात रंगून गेले आहेत. हर घर तिरंगा... भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात, मग तो वाळवंटी भाग असो, किंवा हिमालयाची शिखरे असोत, सागर किनारे असोत, किंवा दाट लोकसंख्येचे भाग, प्रत्येक भागातून एकच आवाज घुमत आहे, एकच जयघोष आहे, आपल्या प्राणांपेक्षाही प्रिय मातृभूमीचे जयगान आहे …

भारतात 79 वा स्वातंत्र्यदिन साजरा

August 15th, 06:45 am

79 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित करताना घटना समिती, स्वातंत्र्यसैनिक आणि संविधान निर्मात्यांना आदरांजली वाहिली. भारत नेहमीच आपल्या शेतकरी, पशुपालक आणि मच्छिमारांच्या हिताचे रक्षण करेल याचा त्यांनी पुनरुच्चार केला. 2047 पर्यंत विकसित भारत साध्य करण्याच्या उद्देशाने GST सुधारणा, प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना, राष्ट्रीय क्रीडा धोरण आणि सुदर्शन चक्र मिशन या प्रमुख उपक्रमांवर त्यांनी प्रकाश टाकला. पंचायत सदस्य आणि ड्रोन दीदी सारख्या विशेष अतिथींनी लाल किल्ल्यावरील सोहळ्याला हजेरी लावली.

नवी दिल्ली इथे एम एस स्वामीनाथन शताब्दी आंतरराष्ट्रीय परिषदेतले पंतप्रधानांचे संबोधन

August 07th, 09:20 am

मंत्रिमंडळातले माझे सहकारी शिवराज सिंह चौहान जी, एम एस स्वामीनाथन संशोधन प्रतिष्ठानच्या अध्यक्ष डॉ सौम्या स्वामिनाथन जी,नीती आयोगाचे सदस्य डॉ रमेश चंद जी,स्वामिनाथन जी यांच्या कुटुंबातले सर्व जण इथे उपस्थित असलेले मी पाहत आहे, त्यांनाही माझा नमस्कार.सर्व वैज्ञानिक, इतर मान्यवर आणि महिला आणि पुरुषहो !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एम.एस.स्वामीनाथन शताब्दी आंतरराष्ट्रीय परिषदेला केले संबोधित

August 07th, 09:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील आयसीएआर- पुसा येथे आयोजित करण्यात आलेल्या एम.एस. स्वामीनाथन शताब्दी आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केले आणि उपस्थितांना संबोधित केले. प्राध्यापक एम एस स्वामिनाथन हे एक द्रष्टे होते ज्यांचे योगदान कोणत्याही एका युगापुरते सीमित नव्हते , असे त्यांना आदरांजली वाहताना पंतप्रधानांनी सांगितले. प्राध्यापक स्वामिनाथन हे एक थोर शास्त्रज्ञ होते ज्यांनी विज्ञानाला लोकसेवेचे माध्यम बनवले असे ते म्हणाले. राष्ट्राला अन्नसुरक्षा बहाल करण्यासाठी प्राध्यापक स्वामिनाथन यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले, असे त्यांनी अधोरेखित केले. प्राध्यापक स्वामिनाथन यांनी एक अशी चेतना निर्माण केली जी भारताच्या पुढील अनेक शतकांच्या धोरणांमध्ये आणि प्राधान्यक्रमांमध्ये झळकत राहील, असे पंतप्रधान म्हणाले. एम.एस.स्वामीनाथन शताब्दी सोहळ्यानिमित्त त्यांनी सर्वांनी शुभेच्छा दिल्या.

अर्थसंकल्पानंतर कृषी आणि ग्रामीण समृद्धीसंबंधित वेबिनारमध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण

March 01st, 01:00 pm

या वर्षीचा अर्थसंकल्प हा आमच्या सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला सर्वंकष अर्थसंकल्प होता. या अर्थसंकल्पातून आमच्या धोरणांमधील सातत्य तर दिसून आलेच पण त्याचबरोबर विकसित भारताच्या संकल्पनेचा नवा विस्तार देखील दिसला. अर्थसंकल्पापूर्वी तुम्हा भागधारकांनी जी मौल्यवान माहिती दिली, ज्या सूचना केल्या, त्या अर्थसंकल्प तयार करण्यात आमच्यासाठी खूप उपयुक्त ठरल्या. आता या अर्थसंकल्पातील बाबी अधिक प्रभावी पद्धतीने प्रत्यक्षात अमलात आणण्यात, या अर्थसंकल्पातील बाबींचा परिणाम खरोखरीच अधिकाधिक उत्तम आणि जलद पद्धतीने साध्य व्हावा, सगळे निर्णय आणि धोरणे प्रभावी व्हावीत या साठी तुम्हा सर्वांच्या भूमिकेची जबाबदारी अधिकच वाढली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी आणि ग्रामीण समृद्धीवरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला केले संबोधित

March 01st, 12:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे कृषी आणि ग्रामीण समृद्धीवरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला संबोधित केले. अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमधील सहभागाचे महत्त्व अधोरेखित करताना, पंतप्रधानांनी कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे आभार मानले आणि या वर्षीचा अर्थसंकल्प हा सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला पूर्ण अर्थसंकल्प आहे, जो धोरणांमध्ये सातत्य आणि विकसित भारताच्या दृष्टिकोनाचा नवा विस्तार दर्शवितो असे अधोरेखित केले. अर्थसंकल्पापूर्वी सर्व संबंधितांकडून मिळालेल्या मौल्यवान माहिती आणि सूचनांची त्यांनी दखल घेतली , ज्या खूप उपयुक्त होत्या. हा अर्थसंकल्प अधिक प्रभावी बनवण्यात हितधारकांची भूमिका अधिक महत्त्वाची बनली आहे यावर त्यांनी भर दिला. विकसित भारताच्या ध्येयाच्या दिशेने आमचा संकल्प अतिशय स्पष्ट आहे आणि एकत्रितपणे आम्ही अशा भारताची उभारणी करत आहोत जिथे शेतकरी समृद्ध आणि सक्षम असतील, असे मोदी म्हणाले. एकही शेतकरी मागे राहू नये, प्रत्येक शेतकऱ्याला पुढे नेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. कृषी क्षेत्र हे विकासाचे पहिले इंजिन मानून शेतकऱ्यांना गौरवपूर्ण स्थान दिले आहे असे ते म्हणाले. भारत एकाच वेळी दोन प्रमुख उद्दिष्टांच्या दिशेने काम करत आहे: कृषी क्षेत्राचा विकास आणि गावांची समृद्धी, असे त्यांनी नमूद केले.