Rozgar Mela reflects our Government’s commitment to empowering the Yuva Shakti with new opportunities: PM Modi

May 23rd, 11:15 am

At the 19th Rozgar Mela, PM Modi distributed over 51,000 appointment letters and said India’s growing investments, global partnerships and expanding sectors are creating new opportunities for the youth. He highlighted rising opportunities across technology, manufacturing, startups, defence, infrastructure and public service as India moves towards the vision of Viksit Bharat.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रोजगार मेळाव्यात 51,000 हून अधिक तरुणांना शासकीय नियुक्ती पत्रांचे वाटप

May 23rd, 11:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे 19 व्या रोजगार मेळाव्यात विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नवनियुक्त झालेल्या तरुणांना 51,000 हून अधिक नियुक्ती पत्रांचे वाटप केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी हा दिवस देशभरातील हजारो तरुणांसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगितले. सरकारी सेवेत नव्याने रुजू झालेल्या सर्व तरुणांचे स्वागत करताना पंतप्रधानांनी रेल्वे, बँकिंग, संरक्षण, आरोग्य आणि शिक्षण यांसारख्या विविध क्षेत्रांतील भारताच्या विकासात हे तरुण लवकरच महत्त्वपूर्ण योगदान देतील, यावर त्यांनी भर दिला. येत्या काळात तुम्ही सर्वजण विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहात, असा ठाम विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.

हैदराबाद येथील विविध विकास प्रकल्पांच्या शुभारंभ प्रसंगी पंतप्रधानांनी केलेल्या संबोधनाचा मूळ मजकूर

May 10th, 03:45 pm

तेलंगणाचे राज्यपाल श्रीमान शिव प्रताप शुक्ला जी, राज्याचे मुख्यमंत्री श्रीमान रेवंत रेड्डी जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी जी. किशन रेड्डी, बंडी संजय कुमार, संसदेतील माझे सहकारी कोंडा विश्वेश्वर रेड्डी जी, तेलंगणा सरकारचे मंत्री, इतर लोकप्रतिनिधी, आणि उपस्थित मान्यवर!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तेलंगणातील हैदराबाद इथे सुमारे 9,400 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण

May 10th, 03:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तेलंगणातील हैदराबाद इथे सुमारे 9,400 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण केले. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधितही केले. आपल्या संबोधनातून त्यांनी हैदराबाद हे राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावरील महत्त्वाचे केंद्र म्हणून त्याचे परिवर्तनाच्यादृष्टीने असलेले महत्व अधोरेखित केले. तेलंगणा आणि संपूर्ण राष्ट्राच्या जलद गतीने होत असलेल्या विकासाला गती देण्याती हा प्रदेश बजावत असलेली महत्वाची भूमिकाही त्यांनी अधोरेखित केली. आज सुरू करण्यात आलेल्या मोठ्या स्तरावरील अनेक प्रकल्पांमुळे तेलंगण एक प्रमुख उत्पादन केंद्र म्हणून प्रस्थापित होईल असे त्यांनी सांगितले. या प्रकल्पांमुळे प्रादेशिक स्तरावरच्या संपर्क व्यवस्थेला बळकटी मिळेल आणि त्याचबरोबर रोजगाराच्या हजारो नवीन संधी निर्माण होतील, असे त्यांनी नमूद केले. या प्रकल्पांसाठी पंतप्रधानांनी तेलंगणातील जनतेचे अभिनंदनही केले.

संयुक्त राष्ट्र हवामान बदल आराखडा करारा'ला सूचित करण्यात येणाऱ्या भारताच्या राष्ट्रीय निर्धारित योगदानाला (2031-2035) केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी

March 25th, 05:35 pm

हवामान बदलाशी संबंधित भारताची कृती अधिक बळकट करण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल म्हणून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने 2031 ते 2035 या कालावधीसाठी भारताच्या राष्ट्रीय निर्धारीत योगदानाला (एनडीसी) मान्यता दिली आहे. याद्वारे यूएनएफसीसीसी आणि त्याअंतर्गत झालेल्या पॅरिस कराराच्या संदर्भात देशाची महत्त्वाकांक्षा उंचावण्यात आली असून, शाश्वत विकास आणि हवामान न्यायाप्रति भारताची वचनबद्धता अधिक दृढ करण्यात आली आहे.

नवी दिल्लीत, भारत मंडपम येथे, वर्ल्ड फूड इंडिया 2025 कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मजकूर

September 25th, 06:16 pm

‘वर्ल्ड फूड इंडिया’ या कार्यक्रमामध्ये आपले मनःपूर्वक स्वागत आणि अभिनंदन! आजच्या या आयोजनात आपले शेतकरी, उद्योजक, गुंतवणूकदार आणि ग्राहक, हे सर्व एकाच व्यासपीठावर एकत्र आलेले आहेत. ‘वर्ल्ड फूड इंडिया’ हा नव्या संपर्कांचा, नव्या संवादांचा आणि सर्जनशीलतेची एक पर्वणी ठरला आहे. मी थोड्याच वेळापूर्वी येथे भरवण्यात आलेल्या प्रदर्शनांना भेट देऊन आलो आहे. आनंदाची गोष्ट अशी की या प्रदर्शनात पोषणावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे, तेलाच्या वापरात बचत करण्यावर भर दिला आहे आणि पॅकबंद उत्पादनांची गुणवत्ता आणि पोषकता वाढवण्यावरही विशेष लक्ष देण्यात आले आहे. या महत्त्वपूर्ण आयोजनासाठी मी आपणा सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि मनःपूर्वक शुभेच्छा देतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ल्ड फूड इंडिया 2025 कार्यक्रमाला केले संबोधित

September 25th, 06:15 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत भारत मंडपम येथे आयोजित वर्ल्ड फूड इंडिया 2025 निमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. शेतकरी, उद्योजक, गुंतवणूकदार, नवोन्मेषक आणि ग्राहक हे सर्वजण या कार्यक्रमात एकाचवेळी उपस्थित असून , त्यामुळे वर्ल्ड फूड इंडिया नवीन संपर्क, नवीन जोडणी आणि सर्जनशीलतेचे व्यासपीठ बनले आहे, असे पंतप्रधान म्हणाले. आपण नुकतीच प्रदर्शनांना भेट दिली आहे असे सांगून पोषण, तेलाचा कमीत कमी वापर आणि पॅकेज केलेल्या उत्पादनांचा आरोग्यदायीपणा वाढवणे यावर प्राथमिक लक्ष केंद्रित केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. पंतप्रधानांनी कार्यक्रमातील सर्व सहभागींचे अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.

दिल्लीमध्ये यशोभूमी इथे सेमिकॉन इंडिया 2025 मध्ये पंतप्रधानांनी केलेले संबोधन

September 02nd, 10:40 am

केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी अश्विनी वैष्णव जी, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता जी,ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी जी, केंद्रीय राज्य मंत्री जितिन प्रसाद जी, सेमीचे अध्यक्ष अजित मनोचा जी,देश-विदेशातून आलेले सेमीकंडक्टर उद्योगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि त्यांचे सहकारी,विविध देशांतले इथे उपस्थित आमचे अतिथी, स्टार्ट अपशी संबंधित उद्योजक,विविध भागांमधून आलेले माझे युवा विद्यार्थी मित्र, उपस्थित स्त्री-पुरुषहो,

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे सेमिकॉन इंडिया 2025 चे उद्घाटन

September 02nd, 10:15 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील यशोभूमी येथे भारताच्या सेमीकंडक्टर परिसंस्थेला गती देण्याच्या उद्देशाने आयोजित 'सेमिकॉन इंडिया - 2025' चे उद्घाटन केले. उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधानांनी भारतातील आणि परदेशातील सेमीकंडक्टर उद्योगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीची दखल घेतली. त्यांनी विविध देशांमधील प्रतिष्ठित पाहुणे, स्टार्ट-अपशी संबंधित उद्योजक आणि देशातील विविध राज्यांमधून आलेल्या युवा विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

रोजगार मेळाव्यात 51,000 हून अधिक नियुक्ती पत्रांचे वितरण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाचा मजकूर

July 12th, 11:30 am

केंद्र सरकारी आस्थापनांमध्ये तरुणाईला कायमस्वरूपी नोकऱ्या देण्याचा आमचा उपक्रम सातत्याने सुरू आहे. आणि आमची ओळखसुद्धा अशीच आहे – ना कागद ना खर्च! (शिफारस किंवा लाचेशिवाय निव्वळ गुणवत्ता आणि पात्रतेच्या आधारे नोकऱ्या देणे). आज 51 हजारांहून अधिक तरुण-तरुणींना नियुक्तीपत्रे दिली गेली आहेत. अशा रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून आतापर्यंत लाखो तरुण-तरुणींना केंद्र सरकारमध्ये कायमस्वरूपी नोकऱ्या मिळाल्या आहेत. ही तरुणाई आता राष्ट्रनिर्मितीत मोठी भूमिका बजावत आहे. आजही आपल्यापैकी अनेकांनी भारतीय रेल्वेमध्ये आपले कार्यभार स्वीकारले आहेत. काही मित्र आता देशाच्या सुरक्षेचे रक्षक बनणार आहेत. टपाल विभागात नियुक्त झालेले मित्र गावागावात सरकारच्या सुविधा (योजना) पोहोचवतील. काहीजण ‘हेल्थ फॉर ऑल’ (सर्वांसाठी आरोग्य) या अभियानाचे शिलेदार असतील. अनेक युवक-युवती आर्थिक समावेशनाच्या इंजिनाला अधिक वेग देतील आणि बरेचसे युवक-युवती भारताच्या औद्योगिक विकासाला नवीन चालना देतील. आपले विभाग वेगवेगळे असले, पदे वेगवेगळी असली, तरी ध्येय एकच आहे. आणि ते ध्येय आपल्याला वारंवार लक्षात ठेवायचे आहे –‘राष्ट्रसेवा’! सूत्र एकच – ‘नागरिक प्रथम, Citizen First!’ आपल्याला देशवासियांच्या सेवेसाठी एक मोठे व्यासपीठ लाभले आहे. जीवनाच्या या महत्त्वाच्या टप्प्यावर मिळालेल्या या मोठ्या यशाबद्दल मी आपणा सर्व तरुणाईचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. या नव्या प्रवासासाठी माझ्याकडून आपल्याला खूप खूप शुभेच्छा!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोजगार मेळाव्याला केले संबोधित

July 12th, 11:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रोजगार मेळाव्याला संबोधित केले, यावेळी त्यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विविध सरकारी विभाग आणि संस्थांमधील 51,000 हून अधिक नवनियुक्त तरुणांना नियुक्ती पत्रेही वितरित केली. आज या युवा वर्गाची भारत सरकारच्या विविध विभागांमधील नवीन जबाबदाऱ्यांची सुरुवात होत असल्याचे त्यांनी आपल्या संबोधनातून अधोरेखित केले. विविध विभागांमधील आपल्या सेवेची सुरुवात करणाऱ्या युवा उमेदवारांचे त्यांनी अभिनंदनही केले. या सर्वांच्या भूमिका वेगवेगळ्या असल्या तरी राष्ट्रसेवा हेच त्यांचे परस्पर समान उद्दिष्ट आहे, आणि ते नागरिक प्रथम या तत्त्वावर आधारलेले आहे ही बाबही त्यांनी नमूद केली.

इंडिया स्टील 2025 कार्यक्रमातील पंतप्रधानांचे भाषण

April 24th, 02:00 pm

आज आणि पुढील दोन दिवस, आपण भारताच्या सनराईज सेक्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलाद क्षेत्राच्या सामर्थ्य आणि संधींवर सविस्तर चर्चा करणार आहोत. हे एक असे क्षेत्र आहे, जे भारताच्या प्रगतीचा आधार आहे, विकसित भारताचा मजबूत पाया आहे, आणि जो भारतात मोठा बदल घडवून आणणाऱ्या नव्या युगाची गाथा लिहीत आहे. मी इंडिया स्टील 2025 मध्ये आपले मन:पूर्वक स्वागत करतो. मला विश्वास आहे की हा कार्यक्रम नव्या कल्पनांची देवाणघेवाण, नव्या भागीदारींची निर्मिती आणि नवप्रवर्तनाला चालना देणाऱ्या एका नव्या प्लॅटफॉर्मची भूमिका पार पाडेल. पोलादक्षेत्रात एका नव्या पर्वाची ही सुरुवात ठरेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी इंडिया स्टील 2025 या कार्यक्रमाला केले संबोधित

April 24th, 01:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईत झालेल्या इंडिया स्टील 2025 या कार्यक्रमाला व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून संबोधित केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुढचे दोन दिवस भारताच्या उदयोन्मुख क्षेत्राची - स्टील अर्थात पोलाद उद्योग क्षेत्राची क्षमता आणि संधी यावर चर्चा होणार असल्याचे ते म्हणाले. हे क्षेत्र भारताच्या प्रगतीचा पाया आहे, हे क्षेत्र विकसित भारताचा पाया मजबूत करणारे क्षेत्र आहे, तसेच हे क्षेत्र देशाच्या परिवर्तनाचा नवा अध्याय लिहीत आहे, असे ते म्हणाले. आपल्या संबोधनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया स्टील 2025 या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्वांचे स्वागत केले. हा कार्यक्रम परस्परांसोबत नवीन कल्पना सामायिक करण्यासाठी, नवीन भागीदाऱ्या स्थापित करण्यासाठी तसेच नवोन्मेषाला चालना देण्यासाठीचे व्यासपीठ म्हणून कामी येईल असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला. हा कार्यक्रम पोलाद उद्योग क्षेत्राच्या विकासाच्या नव्या अध्यायाशी संबंधित पाया रचेल असे ते म्हणाले.

अर्थसंकल्पानंतर एमएसएमई क्षेत्राबाबत झालेल्या तीन वेबिनारमध्ये पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केलेले मूळ भाषण

March 04th, 01:00 pm

उत्पादन आणि निर्यात या विषयांवर आधारित अर्थसंकल्प वेबिनार सर्वच दृष्टीने खूपच महत्त्वाचं आहे.आपल्याला माहितीच आहे की, हा अर्थसंकल्प आमच्या सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला पूर्ण अर्थसंकल्प होता.अपेक्षेपेक्षा जास्त लाभ हे या अर्थसंकल्पाचं सगळ्यात खास वैशिष्ट्य होतं. अशी अनेक क्षेत्रं आहेत, ज्यामधे तज्ज्ञांच्या अपेक्षेपेक्षाही जास्त मोठमोठी पावलं सरकारनं उचलली हे तुम्ही अर्थसंकल्पात पाहिलं आहेच. उत्पादन आणि निर्यातीशी संबंधित अनेक महत्त्वाचे निर्णय अर्थसंकल्पात घेतले गेले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पोत्तर वेबिनार्सना केले संबोधित

March 04th, 12:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून अर्थसंकल्प-पश्चात वेबिनार्सना संबोधित केले.विकासाचे इंजिन या रूपाने एमएसएमई’; निर्मिती, निर्यात आणि अणुउर्जा मोहिमा;नियामकीय, गुंतवणूक तसेच व्यवसाय सुलभता सुधारणा या विषयावर हे वेबिनार्स आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, निर्मिती आणि निर्यात या विषयांवर आधारित अर्थसंकल्प-पश्चात वेबिनार्स अत्यंत महत्त्वाची आहेत. हा अर्थसंकल्प विद्यमान सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिलाच सर्वंकष अर्थसंकल्प आहे याचा उल्लेख करून अपेक्षेच्याही पलीकडे साकार हा या अर्थसंकल्पाचा सगळ्यात उल्लेखनीय पैलू आहे हे त्यांनी ठळकपणे नमूद केले. अनेक क्षेत्रांमध्ये तज्ञांनी व्यक्त केलेल्या अंदाजांच्या पलीकडे जाऊन सरकारने पावले उचलली आहेत याकडे मोदी यांनी सर्वांचे लक्ष वेधले.निर्मिती आणि निर्यात यांच्या बाबतीत या अर्थसंकल्पात घेण्यात आलेले महत्त्वाचे निर्णय देखील त्यांनी अधोरेखित केले.