पियुष पांडे यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
October 24th, 11:29 am
जाहिरात आणि संवादक्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व पियूष पांडे यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. एका शोक संदेशात पंतप्रधानांनी पांडे यांच्या विलक्षण सर्जनशीलतेचे आणि भारताच्या जाहिरात क्षेत्रातील त्यांच्या अमुल्य योगदानाचे स्मरण केले.