फिजिओथेरपीशी संबंधित सर्वांच्या प्रयत्नांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले कौतुक

September 08th, 08:20 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त फिजिओथेरपीशी संबंधित सर्वांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. गतिशीलता, प्रतिष्ठा आणि जीवनाचा दर्जा सुधारून लोकांच्या, विशेषतः वृद्धांच्या कल्याणासाठी ते ज्याप्रकारे योगदान देतात ते कौतुकास्पद आहे,असे मोदींनी नमूद केले.