फिलीपिन्समध्ये भूकंपामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला
October 01st, 03:23 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिलीपिन्समध्ये भूकंपामुळे झालेली जीवितहानी आणि मोठ्या नुकसानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.भारत सरकार आणि फिलीपिन्स सरकार यांच्यातील धोरणात्मक भागीदारीच्या स्थापनेबाबत घोषणा
August 05th, 05:23 pm
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून फिलीपिन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनेंड आर. मार्कोस ज्युनिअर यांनी 4-8 ऑगस्ट 2025 दरम्यान भारताचा दौरा केला. राष्ट्राध्यक्ष मार्कोस यांच्यासमवेत फर्स्ट लेडी लुईस अरनेटा मार्कोस, आणि उच्चस्तरीय अधिकृत शिष्टमंडळ होते, ज्यामध्ये फिलीपिन्सचे अनेक कॅबिनेट मंत्री आणि उच्चस्तरीय व्यावसायिक प्रतिनिधीमंडळाचा समावेश होता.फिलिपिन्सच्या राष्ट्राध्यक्षांचा भारत दौरा: फलनिष्पत्ती
August 05th, 04:31 pm
भारत आणि फिलिपिन्स दरम्यान धोरणात्मक भागीदारी स्थापन झाल्याची घोषणाफिलीपिन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड आर.मार्कोस ज्युनियर यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मजकूर
August 05th, 03:45 pm
आपले आणि आपल्या प्रतिनिधी मंडळाचे भारतात हार्दिक स्वागत आहे. आजचा दिवस आपल्या द्विपक्षीय संबंधांच्यासंदर्भात एक ऐतिहासिक दिवस आहे. आपण भारत-फिलिपिन्स संबंधांना धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर घेऊन जात आहोत. यामुळे आपल्या संबंधांना एक नवीन गती आणि सघनता मिळेल. संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रातील आपल्या संबंधांना बळ मिळेल. गेल्या काही वर्षांत, आपल्या एकमेकांच्या सर्व क्षेत्रातील संबंधांमध्ये प्रगती झाली आहे. यामध्ये व्यापार, संरक्षण, सागरी, आरोग्य, सुरक्षा, अन्न सुरक्षा, विकास भागीदारी आणि नागरीकांना एकमेकांविषयीचा असलेला जिव्हाळा यांचा समावेश आहे. आज आपण पुढील पाच वर्षांसाठी एक कृती आराखडा बनवत आहोत ही खूप आनंदाची बाब आहे.फिलिपिन्सच्या राष्ट्राध्यक्षांबरोबरच्या संयुक्त पत्रकार परिषदेतील पंतप्रधानांचे माध्यमांसाठी निवेदन
August 05th, 11:06 am
सर्वप्रथम मी राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे भारतात हार्दिक स्वागत करतो. या वर्षी भारत आणि फिलिपिन्स आपल्यातील राजनैतिक संबंधांचे पंचाहत्तरवे वर्ष साजरे करत आहेत. आणि या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा महत्वाचा ठरतो. आमच्यातील राजनैतिक संबध नवीन असले, तरी आमच्या संस्कृतींमधील संपर्क फार प्राचीन काळापासूनचा आहे. फिलीपिन्सचे रामायण - महाराडिया लावना - हे आमच्यातील शतकानुशतके जुन्या सांस्कृतिक संबंधांचे जिवंत उदाहरण आहे. दोन्ही देशांच्या राष्ट्रीय फुलांचे चित्र असलेले नुकतेच जारी केलेले टपाल तिकिट आमच्यातील मैत्रीचा सुगंध पसरवत आहे.या आठवड्यात भारत जगाच्या दृष्टीतून
February 10th, 06:40 pm
या आठवड्यात, भारताने आणि भारतीयांनी जागतिक स्तरावर आपली उल्लेखनीय प्रगती सुरू ठेवली, आंतरराष्ट्रीय भागीदारी मजबूत केली, अंतराळ तंत्रज्ञानात प्रगती केली आणि विविध क्षेत्रांतील यश साजरे केले. आग्नेय आशियासोबतचे संबंध वाढवण्यापासून ते कृत्रिम बुद्धिमत्ता आणि एरोस्पेसमध्ये प्रगती करण्यापर्यंत, भारताची प्रगती हा जागतिक भागधारकांचा मुख्य केंद्रबिंदू आहे. या आठवड्यातील काही प्रमुख ठळक गोष्टींवर एक नजर.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फिलीपिन्सचे राष्ट्राध्यक्ष महामहीम फर्डिनांड मार्कोस ज्युनियर यांच्यात दूरध्वनीद्वारे संवाद
August 05th, 02:44 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फिलीपिन्सचे राष्ट्राध्यक्ष महामहीम फर्डिनांड मार्कोस ज्युनियर यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. फिलीपिन्सचे सतरावे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल पंतप्रधानांनी महामहीम फर्डिनांड मार्कोस ज्युनियर यांचे अभिनंदन केले.Telephone conversation between Prime Minister and President of Philippines
June 09th, 07:47 pm
Prime Minister Shri Narendra Modi spoke on telephone today with President of Philippines, His Excellency Rodrigo Duterte, and discussed the steps being taken by the two Governments to address the challenges arising out of the COVID-19 pandemic.आसियान-भारत सामायिक मूल्ये समान भवितव्य : नरेंद्र मोदी
January 26th, 05:48 pm
“आसियान-भारत सामायिक मूल्ये , समान भवितव्य ” या लेखात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसियान-भारत भागीदारीबाबत आपली कल्पना मांडली आहे. आसियान देशांच्या प्रमुख दैनिकांमध्ये हा लेख प्रसिद्ध झाला आहे. या लेखातील संपूर्ण मजकूर पुढीलप्रमाणे :आसियान-भारत स्मृति शिखर परिषदेच्या पूर्वसंध्येला पंतप्रधानांच्या द्विपक्षीय बैठका
January 24th, 10:07 pm
भारत-आसियान भागिदारीला 25 वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त आयोजित आसियान-भारत स्मरणार्थ शिखर परिषदेच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्यानमारच्या स्टेट कौन्सलर आंग सान सू की, व्हिएतनामचे पंतप्रधान गुएन जुआन फुक आणि फिलिपिन्सचे राष्ट्रपती रॉड्रिगो रोआ ड्युटर्ट यांच्याबरोबर काल स्वतंत्रपणे द्विपक्षीय बैठका घेतल्या.फिलीपींस मनिलामधील भारत-आसियान परिषदेत पंतप्रधान मोदी यांचे भाषण
November 14th, 04:21 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज म्हटले आहे की आसियानची 50 वर्षे हा आनंद, अभिमान आणि आपण काय साध्य करू शकतो याबद्दल विचार करण्याचा क्षण आहे. आसियान आमच्या ‘अॅक्ट इस्ट’ धोरणाच्या केंद्रस्थानी आहे. आमचे आसियान बरोबरचे संबंध जुने आहेत आणि ते आधी मजबूत करण्याची आमची इच्छा आहे असे त्यांनी सांगितले.12 व्या पूर्व आशिया शिखर परिषदेत पंतप्रधानांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
November 14th, 02:39 pm
12 व्या ईस्ट एशिया शिखर परिषदेच्या वेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले की जागतिक पातळीवर दुफळीच्या वातावरणात आसियान ची निर्मिती झाली होती परंतु आज त्याच्या सुवर्ण जयंतीचा उत्सव साजरा केला जात आहे. तो आशेचा किरण म्हणून चमकला; शांतता आणि समृद्धीचे प्रतीक ठरला.पंतप्रधानांनी फिलिपिन्समध्ये मनिला येथे आसियान शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर द्विपक्षीय बैठका केल्या.
November 14th, 09:51 am
पंतप्रधान मोदी आसियान शिखर परिषदेच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक जागतिक नेत्यांची भेट घेतली.पंतप्रधानांनी फिलिपीन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो दुतेर्ते यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा केली
November 13th, 07:53 pm
पंतप्रधानांनी आज फिलिपीन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो दुतेर्ते यांच्यासोबत मनिला येथे द्विपक्षीय चर्चा केली. त्यांच्या बैठकीत दोन्ही देशांमधील सहकार्याच्या अनेक संधींची चर्चा झाली.फिलिपिन्समध्ये भारतीय समुदायाने केलेल्या स्वागत सोहळयामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
November 13th, 07:34 pm
जर तुम्हाला न भेटता मी निघून गेलो असतो तर माझा हा दौरा अपूर्ण राहिला असता. वेगवेगळ्या ठिकाणांहून वेळात वेळ काढून तुम्ही लोक आला आहात, तो देखील कामाचा दिवस असूनही आला आहात.सोशल मीडिया कॉर्नर 13 नोव्हेंबर 2017
November 13th, 06:53 pm
सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!पंतप्रधानांचे फिलिपाईन्समधील भारतीय समुदायाला संबोधन
November 13th, 04:36 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फिलिपाईन्समधील मनिला येथे भारतीय समुदायाला संबोधित केले.आसियान उद्योग आणि गुंतवणूक शिखर परिषद, मनिला येथे पंतप्रधानानी केलेले भाषण ( १३ नोव्हेंबर २०१७)
November 13th, 03:28 pm
सर्वात प्रथम, मला इथे येण्यात विलंब झाल्याबद्दल मी आपली क्षमा मागतो. राजकारणाप्रमाणेच, उद्योग-व्यापारातही, ‘वेळ पाळणे’ आणि ‘वेळ साधणे’ अतिशय महत्वाचे असते.पंतप्रधान मोदींची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी चर्चा
November 13th, 02:31 pm
फिलिपिन्समध्ये मनिला इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर द्विपक्षीय बोलणी केली. दोन्ही नेत्यांनी विविध क्षेत्रातील भारत-अमेरिका भागीदारी संबंधी चर्चा केली. पंतप्रधानांनी महावीर फिलिपिन फाउंडेशनला भेट दिली .पंतप्रधानांनी महावीर फिलिपिन फाउंडेशनला भेट दिली .
November 13th, 11:45 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, पूर्वीपासून सुरु असलेला भारत आणि फिलिपिन्स दरम्यानचा मानवीय सहकार्य कार्यक्रम ‘महावीर फिलिपिन फाउंडेशनला’ भेट दिली. भारतीय वशांचे मेयर रमोन भगतसिंग यांनी हा कार्यक्रम सुरु केला होता.