जागतिक स्तरावर भारतीय विद्यापीठांच्या चढत्या आलेखाचे पंतप्रधानांकडून कौतुक

June 27th, 03:03 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक स्तरावर भारतीय विद्यापीठांच्या चढत्या आलेखाचे कौतुक केले आहे. त्यांनी दर्जेदार शिक्षण तसेच विकास आणि नवोन्मेषाच्या संधी उपलब्ध करून देण्याबाबत सरकारची बांधिलकी देखील अधोरेखित केली.