Joint Statement on Enhanced Comprehensive Strategic Partnership between the Republic of India and the Socialist Republic of Vietnam

May 06th, 05:24 pm

At the invitation of Prime Minister of India, H.E. Shri Narendra Modi, the General Secretary of Central Committee of Communist Party of Viet Nam, President of the Socialist Republic of Viet Nam, H.E. Mr. To Lam, paid a State Visit to India from 05 May to 07 May 2026. General Secretary, President H.E. Mr. To Lam was accompanied by a high-level delegation. A strong business delegation also accompanied the dignitary.

फलनिष्पत्ती सूची: व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षांचा भारत दौरा

May 06th, 03:44 pm

आयआरईएल (इंडिया) लिमिटेड आणि व्हिएतनामच्या इन्स्टिट्यूट फॉर टेक्नॉलॉजी ऑफ रेडिओॲक्टिव्ह अँड रेअर एलिमेंट्स (आयटीआरआरई) यांच्यात परस्पर सहकार्याबाबत सामंजस्य करार

व्हिएतनामच्या कम्युनिस्ट पार्टीचे जनरल सेक्रेटरी आणि व्हिएतनामचे राष्ट्रपती यांच्यासोबतच्या संयुक्त पत्रकार निवेदनादरम्यान पंतप्रधानांनी केलेले संबोधन

May 06th, 01:00 pm

भारत आणि व्हिएतनामच्या भागीदारीमध्ये, वारसा आणि विकास - या दोन्ही बाबींना महत्त्व आहे. गेल्या वर्षी, जेव्हा भारतातून बौद्ध अवशेष व्हिएतनामला नेण्यात आले, तेव्हा त्यांचे दर्शन 1.5 कोटींहून अधिक, म्हणजेच संपूर्ण व्हिएतनामच्या लोकसंख्येच्या 15 टक्के लोकांनी घेतले होते. आपला सामायिक वारसा जतन करण्यासाठी, आपण व्हिएतनामच्या प्राचीन चंपा संस्कृतीच्या 'मी सॉन' आणि 'न्हान टॉवर' मंदिरांचे पुनरुज्जीवन करत आहोत. यासोबतच, आता आपण चंपा संस्कृतीतील हस्तलिखितांचे डिजिटायझेशन करून ही अमूल्य परंपरा भावी पिढ्यांसाठी सुरक्षित करत आहोत.

Ganga Expressway to become new lifeline of Uttar Pradesh’s development: PM Modi in Hardoi

April 29th, 11:35 am

PM Modi inaugurated the 594-km access-controlled Ganga Expressway in Hardoi, calling it a new lifeline for Uttar Pradesh’s development that will boost connectivity, support farmers and create industrial opportunities across multiple districts. He said the expressway will also bring the possibilities of the NCR closer and strengthen the state’s role in the journey towards Viksit Bharat.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, उत्तरप्रदेशात हरदोई इथे, 594 किमी लांबीच्या प्रवेश-नियंत्रित ग्रीनफील्ड गंगा द्रुतगती मार्गाचे केले उद्घाटन

April 29th, 11:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील हरदोई इथे 594 किमी लांबीच्या प्रवेश नियंत्रित ग्रीनफिल्ड गंगा द्रुतगती मार्गाचे उद्घाटन केले. आपल्या भाषणाची सुरुवात त्यांनी, भगवान नरसिंह यांच्या पवित्र भूमीला वंदन करून आणि जवळच वाहणाऱ्या गंगामातेच्या दैवी उपस्थितीचा उल्लेख करून केली. संपूर्ण उत्तरप्रदेश, गंगा नदीच्या आध्यात्मिक आणि पालनपोषण करणाऱ्या कृपेने पवित्र झालेले तीर्थक्षेत्र असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. “उत्तर प्रदेशाला लाभलेले द्रुतगती मार्ग स्वतः गंगामातेचे आशीर्वाद आहेत,” असे मोदी म्हणाले. या द्रुतगती मार्गामुळे पवित्र स्थळांपर्यंतचा प्रवास काही तासांत शक्य होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

केंद्रीय अर्थसंकल्पावर पंतप्रधानांची प्रतिक्रिया

February 01st, 01:38 pm

आजचा अर्थसंकल्प ऐतिहासिक आहे; यातून देशातील महिलांच्या शक्तीचे सशक्त प्रतिबिंब झळकते. महिला अर्थमंत्री म्हणून निर्मलाजींनी सलग नवव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. हा अर्थसंकल्प अफाट संधींचा राजमार्ग आहे. हा अर्थसंकल्प वर्तमानातील स्वप्ने साकार करतो आणि भारताच्या उज्ज्वल भविष्याचा पाया मजबूत करतो. हा अर्थसंकल्प 2047 च्या विकसित भारताच्या दिशेने उंच भरारीचा एक मजबूत पाया आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अर्थसंकल्प 2026-27 विषयी व्यक्त केलेली प्रतिक्रिया

February 01st, 01:00 pm

आज मांडलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 विषयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्‍य माध्‍यमाव्दारे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. आजचा अर्थसंकल्प ऐतिहासिक असून त्यात देशातील सक्षम महिलांच्या भावनांचे प्रतिबिंब दिसत आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या देशाचा अर्थसंकल्प सलग नऊ वेळा सादर करणाऱ्या पहिल्या महिला अर्थमंत्री असून, हा एक विक्रम आहे असे त्यांनी अधोरेखित केले. हा अर्थसंकल्प म्हणजे अनंत संधींनी परिपूर्ण असा एक महामार्ग असून भारताच्या वर्तमानातील स्वप्ने पूर्ण करणारा तसेच उज्वल भवितव्याची पायाभरणी करणारा आहे, असे ते म्हणाले. हा अर्थसंकल्प वर्ष 2047 पर्यंत विकसित भारत बनण्याच्या संकल्पाकडे झेप घेण्यास देशाची तयारी करत आहे, असे त्यांनी म्हटले.

India and Russia are embarking on a new journey of co-innovation, co-production, & co-creation: PM Modi says during the India–Russia Business Forum

December 05th, 03:45 pm

In his address at the India–Russia Business Forum, PM Modi conveyed deep gratitude to his friend President Putin for joining the forum. He noted that discussions have commenced on a Free Trade Agreement between India and the Eurasian Economic Union. He remarked that meaningful discussions have taken place over the past two days and expressed his happiness that all areas of India–Russia cooperation were represented.

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासमवेत झालेल्या भारत-रशिया व्यवसाय मंचाच्या संयुक्त बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण

December 05th, 03:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रशियाचे अध्यक्ष माननीय व्लादिमीर पुतिन यांच्यासमवेत नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे पार पडलेल्या भारत-रशिया व्यवसाय मंचाच्या बैठकीला संबोधित केले. पंतप्रधानांनी माननीय राष्ट्राध्यक्ष पुतीन, भारत आणि परदेशातील नेते आणि सर्व मान्यवर पाहुण्यांना अभिवादन करून आपल्या भाषणाची सुरुवात केली. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी राष्ट्राध्यक्ष पुतीन आपल्यासोबत मोठे शिष्टमंडळ घेऊन आले असल्याने भारत-रशिया व्यवसाय मंच हा त्यांच्या महत्त्वपूर्ण पुढाकाराचे द्योतक असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. त्यांनी बैठकीत सहभागी होत असलेल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करत त्यांच्यामध्ये उपस्थित राहण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. पंतप्रधानांनी आपले मित्र राष्ट्रपती पुतीन यांचे या मंचाच्या बैठकीत सहभागी झाल्याबद्दल आणि त्यांचे मोलाचे विचार मांडल्याबद्दल मनापासून आभार मानले. व्यवसायासाठी सुलभ आणि खात्रीलायक अशी यंत्रणा तयार केली जात असल्याचे स्पष्ट करत त्यांनी भारत आणि युरेशियन आर्थिक संघ यांच्यात मुक्त व्यापार करारावर चर्चा सुरू झाल्याचे नमूद केले.

भारत आणि युकेच्या पंतप्रधानांचा भारत तसेच युकेच्या उद्योगपतींशी संवाद

July 24th, 07:38 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान सर कीर स्टार्मर यांनी आज भारत आणि युकेच्या आघाडीच्या उद्योगपतीं ची भेट घेतली. दोन्ही देशांनी ऐतिहासिक अशा भारत युके सर्वसमावेशक आर्थिक व व्यापार करारावर (CETA) स्वाक्षरी केल्यानंतर ही भेट झाली. आरोग्य, औषधनिर्माण, मौल्यवान रत्ने व दागिने, वाहन, उर्जा, उत्पादन, दूरसंवाद, तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, लॉजिस्टीक्स, वस्त्रोद्योग आणि वित्तीय सेवा क्षेत्र अशा विविध क्षेत्रातील प्रमुख उद्योजक या कार्यक्रमाला उपस्थित होते. या क्षेत्रांचे दोन्ही देशामधील रोजगार निर्मिती आणि सर्वसमावेशक आर्थिक विकासातील योगदान उल्लेखनीय आहे.

The World This Week on India

April 22nd, 12:27 pm

From diplomatic phone calls to groundbreaking scientific discoveries, India’s presence on the global stage this week was marked by collaboration, innovation, and cultural pride.

श्री खोडलधाम ट्रस्ट- कर्करोग रुग्णालयाच्या पायाभरणी समारंभातील पंतप्रधानांचा व्हिडिओ संदेश

January 21st, 12:00 pm

आजच्या या विशेष कार्यक्रमात खोडलधामची पावन भूमी आणि खोडल मातेच्या भक्तांचा सहवास लाभणे माझ्यासाठी परम भाग्याची बाब आहे. जनकल्याण आणि सेवा क्षेत्रात श्री खोडलधाम ट्रस्टने आज आणखी एक महत्वपूर्ण पाऊल टाकले आहे. अमरेलीमध्ये आज पासून कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्राचे काम सुरू होत आहे. येत्या काही आठवड्यात श्री खोडलधाम ट्रस्ट-कागवड च्या स्थापनेला 14 वर्षे पूर्ण होत आहेत. तुम्हा सर्वांना या आयोजनाच्या खुप खुप शुभेच्छा.

श्री खोडलधाम ट्रस्ट-कर्करोग रुग्णालयाच्या पायाभरणी समारंभाला पंतप्रधानांनी ध्वनीचित्रफित संदेशाद्वारे केले संबोधित

January 21st, 11:45 am

खोडल धामच्या पवित्र भूमीशी आणि खोडल मातेच्या भक्तांशी जोडले जाणे, हा आपला बहुमान असल्याची भावना, पंतप्रधानांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. श्री खोडलधाम ट्रस्टने अमरेली इथे कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्राची पायाभरणी करून लोक कल्याण आणि सेवेच्या क्षेत्रात आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकल्याचे मोदी यांनी अधोरेखित केले. श्री खोडलधाम ट्रस्ट-कागवाड आपल्या स्थापनेला 14 वर्षे पूर्ण करणार असल्याचे नमूद करत त्यांनी शुभेच्छा दिल्या.