India-Indonesia Joint Statement on the State Visit by Prime Minister of India to Indonesia
July 07th, 05:15 pm
At the invitation of Indonesian President Prabowo Subianto, PM Modi is on a State Visit to Indonesia from 6-8 July 2026. PM Modi's visit reflects the shared commitment of the two leaders to achieve a substantial upward trajectory in the India-Indonesia Comprehensive Strategic Partnership. The two leaders held discussions at Istana Merdeka in Jakarta, covering the full spectrum of bilateral relations.जपानच्या पंतप्रधानांसोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधानांचे निवेदन
July 02nd, 01:30 pm
भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेसाठी पंतप्रधान ताकाइची यांचे त्यांच्या पहिल्या भारत भेटीवर स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे. त्या जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान असून एक दूरदर्शी आणि लोकप्रिय नेत्या आहेत. इतकेच नाही तर त्या जपानच्या 'नारा प्रीफेक्चर' (Nara Prefecture) मधल्या आहेत, जे भारत आणि जपानच्या सामायिक बौद्ध वारशाचे एक अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे.म्यानमारच्या राष्ट्रपतींच्या भारत दौऱ्यादरम्यान भारत आणि म्यानमारचे संयुक्त निवेदन
June 01st, 07:16 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून, म्यानमारचे राष्ट्रपती यू मिन आँग ह्लाइंग 30 मे ते 3 जून, 2026 या कालावधी साठी भारताच्या आपल्या पहिल्या अधिकृत दौ-यावर आले आहेत.युरोपीय उद्योगांच्या गोलमेज बैठकीत पंतप्रधानांचे संबोधन
May 18th, 05:00 am
सर्वात आधी, मला या गोलमेज बैठकीत आमंत्रित केल्याबद्दल मी पंतप्रधान क्रिस्टरसन यांचे मनापासून आभार मानतो. ही बैठक गॉथेनबर्ग मध्ये आयोजित केली जात आहे, याचा मला आनंद आहे. हे एक असे शहर आहे जे नवोन्मेषासोबतच युरोपच्या उत्पादक वृत्तीचे एक जिवंत प्रतीक आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युरोपीय उद्योगांच्या गोलमेज बैठकीला केले संबोधित
May 17th, 12:12 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 मे 2026 रोजी गॉथेनबर्ग येथे 'युरोपियन उद्योगांच्या गोलमेज बैठकीला (ERT) संबोधित केले. व्हॉल्वो समूहाने (Volvo Group) आयोजित केलेल्या या संवाद सत्रात स्वीडनचे पंतप्रधान महामहीम उल्फ क्रिस्टरसन, युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा महामहीम उर्सुला वॉन डेर लेयेन, युरोपियन उद्योगांचे वरिष्ठ नेते आणि आघाडीच्या युरोपियन आणि भारतीय कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.It is the need of the hour that we transform 'Vocal for Local' into a mass movement: PM Modi in Vadodara
May 11th, 06:15 pm
Addressing a special gathering during the inauguration of Sardardham Hostel in Vadodara, PM Modi said education, skill development and women’s empowerment are key to shaping India’s future workforce and entrepreneurial growth. Highlighting the impact of global economic challenges and the West Asia crisis, he urged citizens to support “Vocal for Local”, reduce dependence on imports, conserve foreign exchange and strengthen self-reliance through collective responsibility and everyday actions.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमधल्या वडोदरा इथे सरदारधाम वसतिगृहाचे उद्घाटन
May 11th, 06:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वडोदरा, गुजरात इथे सरदारधाम वसतिगृहाचे उद्घाटन केले. वडोदरा इथल्या सरदारधाममध्ये एका प्रतिष्ठित मेळाव्याला संबोधित करताना, ज्या दिवशी सोमनाथ मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा 75 वा वर्धापन दिन साजरा केला गेला, त्याच दिवशी शैक्षणिक संस्थांच्या उद्घाटनाचा आध्यात्मिक स्मरणाशी असलेल्या शुभ योगाचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. यावेळी डॉ. दुष्यंत आणि दक्षा पटेल संकुलाचे उद्घाटन, अध्यापन सहाय्य योजनेचा शुभारंभ तसेच अनेक शैक्षणिक प्रकल्पांचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले. पंतप्रधानांनी या विविध उपक्रमांचे वर्णन तरुणांच्या भावी करिअरसाठी 'लाँचिंग पॅड्स' असे केले. काही तासांपूर्वी मी प्रभास पाटण येथे सोमनाथ अमृत महोत्सव साजरा करत होतो आणि आता आपण इथे परिवर्तन घडवणाऱ्या शैक्षणिक संस्थांचे उद्घाटन करत आहोत, हा समन्वय वारसा आणि प्रगती एकत्रितपणे कशी पुढे जाते याचे प्रतीक आहे, असे मोदी यांनी नमूद केले.राजस्थानमधील बालोतरा जिल्ह्यातील पचपदरा येथील एचपीसीएल राजस्थान रिफायनरी लिमिटेड या कंपनीच्या खर्चात आणि भांडवली बाजारातील गुंतवणुकीत सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाने दिली मंजुरी
April 08th, 04:21 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने एचपीसीएल राजस्थान रिफायनरी लिमिटेड (एचआरआरएल) प्रकल्पाचा खर्च 43,129 कोटी रुपयांवरून 79,459 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यास आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) द्वारे 8,962 कोटी रुपयांच्या अतिरिक्त भांडवली बाजारात गुंतवणूक करण्यास मंजुरी दिली आहे. या वाढीनंतर एचपीसीएलची भांडवली बाजारातील एकूण गुंतवणूक 19,600 कोटी रुपये इतकी होईल.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची भेट घेतली
February 26th, 08:56 pm
इस्रायलच्या राजकीय भेटीदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 26 फेब्रुवारी 2026 रोजी जेरुसलेममध्ये इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी अधिकृत चर्चा केली.केंद्रीय अर्थसंकल्पावर पंतप्रधानांची प्रतिक्रिया
February 01st, 01:38 pm
आजचा अर्थसंकल्प ऐतिहासिक आहे; यातून देशातील महिलांच्या शक्तीचे सशक्त प्रतिबिंब झळकते. महिला अर्थमंत्री म्हणून निर्मलाजींनी सलग नवव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. हा अर्थसंकल्प अफाट संधींचा राजमार्ग आहे. हा अर्थसंकल्प वर्तमानातील स्वप्ने साकार करतो आणि भारताच्या उज्ज्वल भविष्याचा पाया मजबूत करतो. हा अर्थसंकल्प 2047 च्या विकसित भारताच्या दिशेने उंच भरारीचा एक मजबूत पाया आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अर्थसंकल्प 2026-27 विषयी व्यक्त केलेली प्रतिक्रिया
February 01st, 01:00 pm
आज मांडलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 विषयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य माध्यमाव्दारे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. आजचा अर्थसंकल्प ऐतिहासिक असून त्यात देशातील सक्षम महिलांच्या भावनांचे प्रतिबिंब दिसत आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या देशाचा अर्थसंकल्प सलग नऊ वेळा सादर करणाऱ्या पहिल्या महिला अर्थमंत्री असून, हा एक विक्रम आहे असे त्यांनी अधोरेखित केले. हा अर्थसंकल्प म्हणजे अनंत संधींनी परिपूर्ण असा एक महामार्ग असून भारताच्या वर्तमानातील स्वप्ने पूर्ण करणारा तसेच उज्वल भवितव्याची पायाभरणी करणारा आहे, असे ते म्हणाले. हा अर्थसंकल्प वर्ष 2047 पर्यंत विकसित भारत बनण्याच्या संकल्पाकडे झेप घेण्यास देशाची तयारी करत आहे, असे त्यांनी म्हटले.भारत-जॉर्डन व्यापार बैठकीत पंतप्रधानांचे संबोधन
December 16th, 12:24 pm
जगात अनेक देशांच्या सीमा जोडलेल्या असतात तर काही देशांच्या बाजारपेठा जोडल्या जातात. परंतू भारत आणि जॉर्डन यांचे संबंध असे आहेत जिथे ऐतिहासिक विश्वास आणि भविष्यातील आर्थिक संधी यांचे एकत्रीकरण होते.पंतप्रधान मोदी आणि जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीय यांनी भारत-जॉर्डन व्यापार मंचाला केले संबोधित
December 16th, 12:23 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीय यांनी आज अम्मान येथे भारत-जॉर्डन व्यापार मंचाला संबोधित केले. या मंचाला युवराज हुसेन आणि जॉर्डनचे व्यापार व उद्योग, तसेच गुंतवणूक मंत्री उपस्थित होते. राजे अब्दुल्ला द्वितीय आणि पंतप्रधानांनी दोन्ही देशांमधील व्यापार संबंध वृद्धिंगत करणे, आवश्यक असल्यावर सहमती व्यक्त केली आणि दोन्ही देशांच्या उद्योजकांना क्षमता व संधींचे रूपांतर विकास आणि समृद्धीमध्ये करण्याचे आवाहन केले. जॉर्डनचे मुक्त व्यापार करार आणि भारताची आर्थिक शक्ती यांच्या संयोगातून दक्षिण आशिया आणि पश्चिम आशिया व त्यापुढील प्रदेशांदरम्यान एक आर्थिक मार्गिका तयार केली जाऊ शकते, असे जॉर्डनच्या राजांनी नमूद केले.नवी दिल्लीत एनडीटीव्ही वर्ल्ड समिट 2025 मध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण
October 17th, 11:09 pm
श्रीलंकेच्या पंतप्रधान महामहीम हरिणी अमरसूर्या महोदया, ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान, माझे मित्र टोनी ऍबट महोदय, यूकेचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक महोदय, मान्यवर अतिथी, स्त्री-पुरुषहो नमस्कार!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे एनडीटीव्ही जागतिक शिखर परिषद 2025 ला केले संबोधित
October 17th, 08:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे एनडीटीव्ही जागतिक शिखर परिषद 2025 ला संबोधित केले. उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. सर्व नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना मोदी म्हणाले की एनडीटीव्ही जागतिक शिखर परिषद उत्सवाच्या वातावरणात आयोजित केली जात आहे. त्यांनी सत्राची संकल्पना अजेय भारत ची प्रशंसा केली आणि ते खरोखरच समर्पक असल्याचे नमूद केले, कारण आज भारत थांबण्याच्या मनःस्थितीत नाही. पंतप्रधान म्हणाले की भारत थांबणार नाही किंवा वेग कमीही करणार नाही, 140 कोटी भारतीय पूर्ण गतीने एकत्रितपणे पुढील वाटचाल करत आहेत.भारत-युके सीईओ फोरममध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण
October 09th, 04:41 pm
आज भारत-युके सीईओ फोरमच्या बैठकीत सहभागी होणे ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. सर्वप्रथम मी पंतप्रधान स्टार्मर यांच्या मौलिक विचारांबद्दल त्यांचे आभार मानतो.फॅक्ट शीट: भारत-जपान आर्थिक सुरक्षा सहकार्य
August 29th, 08:12 pm
भारत-जपान विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी, आपल्या सामायिक मूल्ये आणि परस्पर सन्मानावर आधारित असून दोन्ही देशांची सुरक्षा आणि समृद्धी पुढे नेण्यासाठी महत्वाची आहे. आर्थिक सुरक्षेच्या क्षेत्रातील सहकार्य हा आमचा धोरणात्मक दृष्टीकोन आणि आर्थिक अनिवार्यतेमधील वाढत्या अभिसरणातून निर्माण झालेल्या द्विपक्षीय सहकार्याचा एक प्रमुख आधारस्तंभ आहे.गुजरातमधील अहमदाबाद येथे विविध विकास योजनांच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
August 25th, 06:42 pm
तुम्ही सर्वांनी आज छान वातावरण निर्मिती केली आहे. अनेक वेळा माझ्या मनात विचार येतो की मी किती नशीबवान आहे, ज्यामुळे मला लाखो लोकांचे प्रेम आणि आशीर्वाद लाभत आहेत. मी तुम्हा सर्वांचे कितीही आभार मानले तरीही ते कमीच आहेत. पहा तिकडे कोणी छोटा नरेंद्र उभा आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अहमदाबाद, गुजरात येथे 5,400 कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन, पायाभरणी आणि लोकार्पण
August 25th, 06:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील अहमदाबाद येथे 5,400 कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन, पायाभरणी आणि राष्ट्रार्पण केले. उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी सांगितले की, संपूर्ण देश सध्या गणेशोत्सवाच्या उत्साहाने भरलेला आहे. गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने आज गुजरातच्या प्रगतीशी जोडलेल्या अनेक विकास प्रकल्पांचा शुभारंभ होत आहे. त्यांनी सांगितले की, अनेक प्रकल्प जनतेच्या चरणी समर्पित करण्याचा मान त्यांना मिळाला आहे आणि या विकास उपक्रमांसाठी त्यांनी सर्व नागरिकांचे मनापासून अभिनंदन केले.India-Fiji Joint Statement: Partnership in the spirit of Veilomani Dosti
August 25th, 01:52 pm
PM Modi warmly welcomed Fiji’s PM Sitiveni Rabuka on his first official visit to India. The two leaders shared heartfelt discussions on strengthening bonds in health, education, trade, defence and climate action. Reaffirming India-Fiji’s deep friendship, PM Modi praised Fiji’s global role and pledged to work together for a secure, sustainable and peaceful Indo-Pacific future.