PM chairs CCS Meeting to review the situation and mitigating measures in the context of ongoing West Asia Conflict
March 22nd, 09:06 pm
Amid the West Asia conflict, PM Modi chaired a meeting of the Cabinet Committee on Security to review the situation and ongoing and proposed mitigating measures. A detailed assessment of the availability of critical needs of the common man, including food, energy and fuel security, was made. The PM instructed that all arms of the government should work together to ensure the least inconvenience to citizens.गुजरातमधील अहमदाबाद येथे विविध विकास योजनांच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
August 25th, 06:42 pm
तुम्ही सर्वांनी आज छान वातावरण निर्मिती केली आहे. अनेक वेळा माझ्या मनात विचार येतो की मी किती नशीबवान आहे, ज्यामुळे मला लाखो लोकांचे प्रेम आणि आशीर्वाद लाभत आहेत. मी तुम्हा सर्वांचे कितीही आभार मानले तरीही ते कमीच आहेत. पहा तिकडे कोणी छोटा नरेंद्र उभा आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अहमदाबाद, गुजरात येथे 5,400 कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन, पायाभरणी आणि लोकार्पण
August 25th, 06:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील अहमदाबाद येथे 5,400 कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन, पायाभरणी आणि राष्ट्रार्पण केले. उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी सांगितले की, संपूर्ण देश सध्या गणेशोत्सवाच्या उत्साहाने भरलेला आहे. गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने आज गुजरातच्या प्रगतीशी जोडलेल्या अनेक विकास प्रकल्पांचा शुभारंभ होत आहे. त्यांनी सांगितले की, अनेक प्रकल्प जनतेच्या चरणी समर्पित करण्याचा मान त्यांना मिळाला आहे आणि या विकास उपक्रमांसाठी त्यांनी सर्व नागरिकांचे मनापासून अभिनंदन केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचे महामहिम युवराज आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान यांची घेतली भेट; तसेच भारत-सौदी अरेबिया धोरणात्मक भागीदारी परिषदेचे भूषवले सह-अध्यक्षपद
April 23rd, 02:20 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 एप्रिल , 2025 रोजी सौदी अरेबियाला भेट दिली. सौदी अरेबियाचे युवराज आणि पंतप्रधान महामहिम मोहम्मद बिन सलमान यांनी जेद्दाह येथील रॉयल पॅलेसमध्ये पंतप्रधानांचे समारंभपूर्वक स्वागत केले.हरयाणातील यमुनानगर येथे विकास प्रकल्पांच्या उद्घाटन/शिलान्यासप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण
April 14th, 12:00 pm
हरयाणाचे लोकप्रिय मुख्यमंत्री नायब सिंग सैनी जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी मनोहर लाल जी, राव इंद्रजीत सिंग जी, कृष्णपाल जी, हरयाणा सरकारचे मंत्रीमंडळ, खासदार आणि आमदारगण आणि माझ्या प्रिय भाऊ आणि बहिणींनो, हरयाणातील माझ्या भावंडांना मोदींचा राम-राम!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हरियाणात यमुना नगर येथे विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी
April 14th, 11:54 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हरियाणात यमुनानगर येथे विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले तसेच त्यांच्या हस्ते या प्रकल्पांचा कोनशीला समारंभ झाला. हरियाणाच्या जनतेला शुभेच्छा देऊन त्यांनी हरियाणाच्या पवित्र भूमीला आदरांजली वाहिली आणि ही भूमी माता सरस्वतीचे उत्पत्तिस्थान, मंत्रादेवीचे निवासस्थान, पंचमुखी हनुमानाची आणि पवित्र कपालमोचन साहिब यांची भूमी असल्याचा आवर्जून उल्लेख केला. “हरियाणा म्हणजे संस्कृती, भक्ती आणि समर्पण यांचा संगम आहे,” ते म्हणाले.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची दूरदृष्टी आणि प्रेरणा भारताच्या विकासात्मक वाटचालीला मार्गदर्शक ठरत आहे हे अधोरेखित करत पंतप्रधानांनी सर्व नागरिकांना बाबासाहेबांच्या 135 व्या जयंतीदिनाच्या शुभेच्छा देखील दिल्या.पंतप्रधानांचे मध्यप्रदेशात भोपाळ येथे आयोजित जागतिक गुंतवणूकदार परिषद 2025 मधील उद्घाटनपर भाषण
February 24th, 10:35 am
सर्वप्रथम मला इथे येण्यास विलंब झाला, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांची क्षमा मागतो. विलंब अशासाठी झाला की काल मी जेव्हा इथे पोहोचलो, तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की आज 10 वी आणि 12 वी च्या विद्यार्थ्यांची परीक्षा आहे, आणि त्यांच्या परीक्षेची वेळ आणि माझी राजभवनातून बाहेर पडण्याची वेळ साधारण एकच होती. आणि त्यामुळे शक्यता अशी होती की सुरक्षेच्या कारणाने जर रस्ते बंद झाले तर, मुलांना परीक्षेच्या वेळेत पोहोचणं कठीण झालं असतं. हा अडथळा येऊ न देता मुलं एकदाची परीक्षा केंद्रावर पोहोचल्यानंतरच राजभवनातून निघावं असा विचार मी केला, त्यामुळे मी निघतानाच 15-20 मिनिटं उशीर केला आणि त्यामुळे तुम्हा सर्वांची जी गैरसोय झाली, त्याबद्दल मी पुन्हा एकदा माफी मागतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील भोपाळ येथे जागतिक गुंतवणूकदार शिखर परिषद 2025 चे केले उद्घाटन
February 24th, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशात भोपाळ येथे जागतिक गुंतवणूकदार शिखर परिषद(GIS) 2025 चे उद्धाटन केले. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी या कार्यक्रमात येण्यासाठी त्यांना विलंब झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. दहावी आणि बारावी इयत्तांच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू असल्यामुळे कार्यक्रमाच्या मार्गावर त्यांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांमुळे विद्यार्थ्यांना असुविधा होऊ नये म्हणून विलंबाने आल्याचे त्यांनी सांगितले. राजा भोज यांच्या भूमीमध्ये गुंतवणूकदार आणि व्यवसाय क्षेत्रातील अग्रणी यांचे स्वागत करताना आपल्याला अतिशय अभिमान वाटत आहे, असे मोदी म्हणाले. विकसित भारताच्या दिशेने होणाऱ्या वाटचालीत विकसित मध्य प्रदेश किंवा विकास झालेला मध्य प्रदेश महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी मध्य प्रदेश सरकारचे या शिखर परिषदेच्या अतिशय उत्तम आयोजनाबद्दल अभिनंदन केले.उत्कर्ष ओदिशा - मेक इन इंडिया कॉनक्लेव्हमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण
January 28th, 11:30 am
जानेवारी महिन्यात, म्हणजे 2025 च्या सुरुवातीलाच माझा ओदिशाचा हा दुसरा दौरा आहे. काही दिवसांपूर्वी मी इथे झालेल्या अनिवासी भारतीय दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झालो होतो. आज आता उत्कर्ष ओदिशा कॉन्क्लेव्हमध्ये मी तुमच्या सोबत आलो आहे. मला सांगण्यात आले आहे की ओदिशामध्ये आयोजित केलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी व्यवसायविषयक शिखर परिषद आहे. पूर्वीच्या तुलनेत पाच ते सहा पटीने अधिक गुंतवणूकदार यात सहभागी होत आहेत. ओदिशाच्या जनतेचे, ओदिशा सरकारचे या अप्रतिम कार्यक्रमासाठी मी खूप खूप अभिनंदन करतो. तुम्हा सर्वांचे या कार्यक्रमात अभिनंदन करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भुवनेश्वरमध्ये केले “उत्कर्ष ओदिशा- मेक इन ओदिशा” संमेलन 2025 चे उद्घाटन
January 28th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ओदिशामध्ये भुवनेश्वर येथे “उत्कर्ष ओदिशा- मेक इन ओदिशा” संमेलन 2025 चे उद्घाटन केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी जानेवारी 2025 या महिन्यातील त्यांची ही दुसरी भेट असल्याचे सांगताना त्यांनी प्रवासी भारतीय दिवस 2025 या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी ओदिशाला दिलेल्या भेटीची आठवण करून दिली. ओदिशामध्ये आतापर्यंतची ही सर्वात मोठी व्यावसायिक शिखर परिषद असल्याचे नमूद करत मोदी यांनी मेक इन ओदिशा संमेलन 2025 मध्ये पाच ते सहा पट जास्त गुंतवणूकदार सहभागी झाले असल्याची माहिती दिली. त्यांनी ओदिशाची जनता आणि ओदिशा सरकारचे देखील या भव्य कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल अभिनंदन केले.Congress wants to loot your property and distribute it among its favorite vote bank: PM in Betul
April 24th, 03:00 pm
Prime Minister Narendra Modi addressed massive public gatherings in Madhya Pradesh’s Betul, reaffirming the strong support of the people for the BJP government and emphasizing the importance of stable governance for development.Congress wants to snatch your property and impose inheritance tax: PM Modi in Sagar
April 24th, 03:00 pm
Prime Minister Narendra Modi addressed a massive public gathering today in Sagar, Madhya Pradesh, reaffirming the strong support of the people for the BJP government and emphasizing the importance of stable governance for development.PM Modi addresses public meetings in Sagar and Betul, Madhya Pradesh
April 24th, 02:50 pm
Prime Minister Narendra Modi addressed massive public gatherings in Madhya Pradesh’s Sagar and Betul, reaffirming the strong support of the people for the BJP government and emphasizing the importance of stable governance for development.‘भारत ऊर्जा सप्ताह 2024, गोवा’ उद्घाटन कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
February 06th, 12:00 pm
गोव्याचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई जी, गोव्याचे युवा मुख्यमंत्री प्रमोद सावंत जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, हरदीप सिंह पुरी जी, रामेश्वर तेली जी, वेगवेगळ्या देशांतून आलेले प्रतिनिधी, भगिनी आणि सद्गृहस्थ हो !पंतप्रधानांच्या हस्ते भारतीय ऊर्जा सप्ताह 2024 चे उद्घाटन
February 06th, 11:18 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गोव्यात भारत ऊर्जा सप्ताह 2024 चे उद्घाटन केले. भारतीय ऊर्जा सप्ताह 2024 हे भारतातील सर्वात मोठे आणि सर्वसमावेशक ऊर्जा प्रदर्शन आणि परिषद आहे. भारताच्या ऊर्जा संक्रमण उद्दिष्टांना चालना देण्यासाठी संपूर्ण ऊर्जा मूल्य साखळीला ही परिषद एका मंचावर आणते. पंतप्रधानांनी, जागतिक तेल आणि वायू मुख्य कार्यकारी अधिकारी आणि तज्ञांसोबत गोलमेज बैठकही घेतली.ओदिशा मध्ये संबलपुर येथील विविध विकासकामांचे उद्घाटन तसेच पायाभरणी समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण
February 03rd, 02:10 pm
आज ओदिशाच्या विकासयात्रेतील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे.सुमारे 70 हजार कोटी रुपये खर्चाच्या या विकास प्रकल्पांबद्दल मी ओदिशाच्या लोकांचे खूप खूप अभिनंदन करतो. शिक्षण, रेल्वे, रस्ते, वीज, पेट्रोलियम या क्षेत्रांशी संबंधित अनेक प्रकल्पांचा यामध्ये समावेश आहे. या प्रकल्पांचा लाभ ओदिशा राज्यातील गरीब, श्रमिक, कर्मचारी, दुकानदार, व्यापारी, शेतकरी यांना म्हणजेच समाजाच्या प्रत्येक वर्गातील लोकांना होणार आहे. हे उपक्रम, ओदिशा राज्यात सोयीसुविधा निर्माण करण्यासोबतच येथील तरुणांसाठी रोजगाराच्या हजारो नव्या संधी देखील घेऊन येणार आहेत.ओदिशा, संबलपूर इथे, पंतप्रधानांच्या हस्ते, 68,000 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन अणि लोकार्पण
February 03rd, 02:07 pm
देशाचे माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ नेते लाल कृष्ण आडवाणी यंना भारत रत्न देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. माजी उपपंतप्रधान अडवाणी यांनी, गृहमंत्री आणि माहिती व प्रसारण मंत्री, तसेच दीर्घकाळ खासदार म्हणूनही देशासाठी अद्वितीय योगदान दिले आहे, असे मोदी म्हणाले.मध्य प्रदेशात चित्रकूट येथे दिवंगत अरविंदभाई मफतलाल जन्मशताब्दी समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण
October 27th, 02:46 pm
अर्थात्, चित्रकूटमध्ये प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मणजींच्या सोबत नित्य निवास करत असतात. येथे येण्यापूर्वी आता मला श्री रघुवीर मंदिर आणि श्रीराम जानकी मंदिरात दर्शन घेण्याचे भाग्य देखील लाभले आणि मी हेलीकॉप्टरमधूनच कामदगिरि पर्वताला देखील नमस्कार केला. मी पूज्य रणछोड़दास जी आणि अरविंदभाई यांच्या समाधीवर पुष्पांजली अर्पित करण्यासाठी गेलो होतो. प्रभू श्रीराम जानकीचे दर्शन, संतांचे मार्गदर्शन आणि संस्कृत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून वेदमंत्रांचे हे अद्भुत गायन, या अनुभवाचे, या अनुभूतीचे तोंडाने वर्णन करणे कठीण आहे. मानव सेवेच्या महान यज्ञाचा भाग बनवण्याचे आणि त्यासाठी श्री सद्गुरु सेवासंघाचे देखील आज मी सर्व पीड़ित, शोषित, गरीब, आदिवासींच्या वतीने आभार व्यक्त करतो. जानकीकुंड चिकित्सालयाच्या ज्या नव्या विंगचे आज लोकार्पण झाले आहे, यामुळे लाखों रुग्णांना नवीन जीवन मिळेल. आगामी काळात, सद्गुरु मेडिसिटी मध्ये गरीबांच्या सेवेच्या या अनुष्ठानाला नवा विस्तार मिळेल. आज या प्रसंगी अरविंद भाई यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भारत सरकार ने विशेष टपाल तिकिट देखील प्रकाशित केले आहे. हा क्षण आपल्या सर्वांसाठी गौरवास्पद क्षण आहे, समाधानाचा क्षण आहे, मी तुम्हा सर्वांना याबद्दल शुभेच्छा देतो.मध्य प्रदेशातील चित्रकूट येथे दिवंगत अरविंद भाई मफतलाल यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित समारंभाला पंतप्रधानांनी केले संबोधित
October 27th, 02:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशातील चित्रकूट येथे दिवंगत अरविंद भाई मफतलाल यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. श्री सद्गुरु सेवा संघ ट्रस्टची स्थापना 1968 मध्ये परमपूज्य रणछोडदासजी महाराज यांनी केली होती. अरविंद भाई मफतलाल हे परमपूज्य रणछोडदासजी महाराज यांच्या कार्याने प्रेरित होते आणि त्यांनी या ट्रस्टच्या स्थापनेत मोलाची भूमिका बजावली होती. अरविंद भाई मफतलाल हे स्वातंत्र्योत्तर भारतातील अग्रगण्य उद्योजकांपैकी एक होते, ज्यांनी देशाच्या विकासाच्या गाथेत महत्त्वाची भूमिका बजावली.मध्य प्रदेशात बिना येथे केली 50,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी कार्यक्रमातील पंतप्रधानांचे भाषण
September 14th, 12:15 pm
बुंदेलखंडची ही धरती वीरांची धरती आहे, शूरवीरांची धरती आहे. या भूमीला बीना आणि बेतवा, दोन्हींचा आशीर्वाद मिळाला आहे. आणि मला तर एक महिन्यात दुसऱ्यांदा, सागरला येऊन आपणा सर्वांचे दर्शन घेण्याचे सौभाग्य प्राप्त झाले आहे. आणि मी शिवराज जींच्या सरकारचे अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो कारण आज इथे येऊन, आपणा सर्वांचे दर्शन घेण्याची संधी दिली. मागच्या वेळी मी संत रोहिदासजींच्या त्या भव्य स्मारकाच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने आपणा सर्वांना भेटायला आलो होतो. आज मला मध्य प्रदेशचा विकास आणि त्या विकासाला नवी गती देणाऱ्या अनेक प्रकल्पांचे भूमिपूजन करण्याची संधी मिळत आहे. हे प्रकल्प, या क्षेत्राच्या औद्योगिक विकासाला नवी गती देतील. या प्रकल्पांवर केंद्र सरकार 50 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करणार आहे. तुम्ही कल्पना करू शकता, पन्नास हजार कोटी किती असतात? आपल्या देशातल्या अनेक राज्यांचा पर्ण वर्षाचा अर्थसंकल्प देखील इतका नसतो, जितका खर्च आज एकाच कार्यक्रमासाठी भारत सरकार करत आहे. यातून हे दिसून येते की मध्य प्रदेशसाठी आमचे संकल्प किती मोठे आहेत. हे सगळे प्रकल्प येणाऱ्या काळात मध्य प्रदेश मध्ये लाखो तरुणांना रोजगार देतील. हे प्रकल्प, गरीब आणि मध्यमवर्गातल्या कुटुंबांची स्वप्न सत्यात उतरवणारे आहेत. मी बीना रिफायनरीचे विस्तारीकरण आणि अनेक नव्या सुविधांच्या भूमिपूजनाच्या मध्य प्रदेशच्या कोट्यवधी जनतेला अनेक अनेक शुभेच्छा देतो.