The future of farming lies not merely in "Produce More,” but in "Produce Better": PM Modi at FAO

May 20th, 11:00 pm

Accepting the Agricola Medal for 2026 from the FAO, PM Modi said the recognition reflected India’s commitment to human welfare, food security and sustainable development. He dedicated the honour to Indian farmers and the country’s agricultural scientific community. He also highlighted initiatives such as ‘Per Drop More Crop’, micro-irrigation and precision farming, which are guiding India’s agricultural policies.

पंतप्रधानांना रोम येथे संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेतर्फे 'ॲग्रिकोला पदक' प्रदान

May 20th, 10:55 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेतर्फे (एफएओ) रोम येथील मुख्यालयात 2026 साठी प्रतिष्ठेच्या 'ॲग्रिकोला’ पदकाने सन्मानित करण्यात आले. भारतात आणि जागतिक स्तरावर अन्न सुरक्षा, शाश्वत कृषी आणि ग्रामीण विकास, यासारख्या क्षेत्रांमधील त्यांच्या असाधारण नेतृत्वाची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

बंगळुरू येथील 'आर्ट ऑफ लिव्हिंग'च्या 45 व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधानांच्या संबोधनाचा मूळ मजकूर

May 10th, 11:05 am

आजची ही सकाळ एक वेगळीच अनुभूती घेऊन आली आहे. मुलांच्या वैदिक मंत्रांनी झालेले स्वागत, भगवान श्री गणेशाचे दर्शन, श्री श्री रविशंकर जींची 70 वर्षे आणि 'आर्ट ऑफ लिव्हिंग'ची 45 वर्षे; हे असे क्षण आहेत जे माझ्या स्मरणात कायम राहतील. या अद्भुत सोहळ्यात मला आमंत्रित केल्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटकातील बंगळुरू इथे आयोजित द आर्ट ऑफ लिविंगच्या 45 व्या वर्धापन दिन सोहळ्यात सहभागी

May 10th, 11:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक मधील बंगळुरू इथे आयोजित द आर्ट ऑफ लिविंगच्या 45 व्या वर्धापन दिन सोहळ्यात सहभागी झाले. हा सोहळा म्हणजे मंगलमय प्रसंग असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. सोहळ्याच्या आजच्या दिवशी सकाळी मुलांनी गायलेले वैदिक मंत्र, भगवान श्री गणेशाचे दर्शन, श्री श्री रविशंकर जी यांचे 70 वे वर्ष आणि आर्ट ऑफ लिविंगच्या स्थापनेचा 45 वा वर्धापन दिन, अशा अनेक सुखद घडामोडींमुळे आजची सकाळ समृद्ध झाल्याचे त्यांनी नमूद केले. हे क्षण सदैव आपल्या स्मरणात राहतील अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

आसाममधल्या गुवाहाटी इथे विविध विकास कामांचा प्रारंभ करताना पंतप्रधानांनी केलेले संबोधन

March 13th, 05:30 pm

आसामचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य जी, इथले लोकप्रिय मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा जी, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी सर्बानंद सोनोवाल जी, राज्य सरकारचा उपस्थित मंत्री वर्ग, लोकप्रतिनिधी, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या कार्यक्रमाशी देशभरातून जोडले गेलेले आपले सर्व अन्नदाता,चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या माझ्या बंधू-भगिनी, आणि मी पाहत आहे आपले अनेक ज्येष्ठ मुख्यमंत्री देशाच्या कानाकोपऱ्यातून जोडले गेले आहेत, सर्वाना माझा नमस्कार.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुवाहाटीत ₹19,480 कोटींच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन, देशभरातील शेतकऱ्यांना ₹18,000 कोटींचा पीएम किसान सन्मान निधी वितरित

March 13th, 05:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आसाममध्ये गुवाहाटी येथे सुमारे 19,480 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले. गुवाहाटीतील भव्य सभेला संबोधित करताना पंतप्रधानांनी गुवाहाटीवासीयांबरोबर देशभरातून सहभागी शेतकऱ्यांचे तसेच चहाच्या बागांमध्ये काम करणाऱ्या बंधू आणि भगिनीनांही मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. नवरात्रीच्या पूर्वसंध्येला ‘माँ कामाख्या’च्या पवित्र भूमीवर उपस्थित राहण्याचे सौभाग्य लाभल्याबद्दल पंतप्रधानांनी कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, “नवरात्रीचा आरंभ होण्यापूर्वी माँ कामाख्येच्या या पवित्र भूमीवर तुमचे दर्शन घेण्याचे भाग्य मला लाभले आहे.”

नेसेट मधले पंतप्रधानांचे संबोधन

February 25th, 08:20 pm

या प्रतिष्ठीत सदनामध्ये उपस्थित राहणे ही माझ्यासाठी भाग्याची आणि सन्मानाची बाब आहे.भारताचे पंतप्रधान म्हणून आणि एका प्राचीन संस्कृतीचा प्रतिनिधी म्हणून दुसऱ्या प्राचीन संस्कृतीला संबोधित करत आहे. माझ्यासमवेत 140 कोटी भारतीयांच्या शुभेच्छा आणि मैत्री, आदर आणि भागीदारीचा संदेश घेऊन मी आलो आहे.

पंतप्रधानांनी केले इस्रायली संसद ‘नेसेट’ ला संबोधित

February 25th, 08:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जेरुसलेमध्ये इस्रायली संसद 'नेसेट'च्या एका विशेष अधिवेशनाला संबोधित केले. इस्रायली संसदेला संबोधित करणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान आहेत.

नवी दिल्ली येथे पोंगल सणानिमित्त पंतप्रधानांनी केलेले भाषण

January 14th, 11:00 am

आज, पोंगल हा एक जागतिक सण झाला आहे. जगभरातील तमिळ समुदाय आणि तमिळ संस्कृतीवर प्रेम करणारे लोक तो उत्साहाने साजरा करतात आणि त्यापैकी मीदेखील एक आहे. हा विशेष सण तुम्हा सर्वांसोबत साजरा करणे, माझ्यासाठी भाग्याचे आहे. आपल्याकडे तमिळ जीवनात पोंगल हा एक आनंददायी अनुभव आहे. हा सण आपल्या शेतकऱ्यांच्या मेहनतीप्रती, पृथ्वी आणि सूर्याप्रती कृतज्ञतेचे प्रतीक आहे.त्याचसोबत हा सण आपल्याला निसर्ग, कुटुंब आणि समाज यांच्यात संतुलन साधण्याचा मार्गदेखील दर्शवतो. देशाच्या विविध भागात लोहडी, मकर संक्रांती, माघ बिहू आणि इतर सणांचा देखील उत्साह आहे. मी भारतातील आणि जगभरातील माझ्या सर्व तमिळ बंधू आणि भगिनींना पोंगल आणि सर्व सणांच्या हार्दिक शुभेच्छा देतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे पोंगल सोहळ्याला केले संबोधित

January 14th, 10:45 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे आयोजित पोंगल सोहळ्याला संबोधित केले. तमिळ भाषेत शुभेच्छा देताना पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले की, “आज पोंगल हा एक जागतिक सण बनला आहे”, जो जगभरातील तमिळ समुदायांद्वारे आणि तमिळ संस्कृतीवर प्रेम करणाऱ्या लोकांद्वारे उत्साहाने साजरा केला जातो, आणि आपण देखील त्यापैकीच एक आहेत. हा विशेष सण सर्वांसोबत साजरा करणे हे आपले भाग्य आहे, असे त्यांनी सांगितले. तमिळ जीवनात पोंगल हा एक सुखद अनुभव आहे, जो शेतकऱ्यांच्या कष्टाबद्दल, पृथ्वीबद्दल आणि सूर्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो, तसेच निसर्ग, कुटुंब आणि समाजात संतुलन राखण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करतो, असे पंतप्रधानांनी नमूद केले. या काळात देशाच्या विविध भागांमध्ये लोहरी, मकर संक्रांती, माघ बिहू आणि इतर सणांच्या उत्साहात लोक रमले आहेत, असेही पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी भारतातील आणि जगभरातील सर्व तमिळ बंधू-भगिनींना पोंगलच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या तसेच इतर सर्व सणांसाठी शुभेच्छा दिल्या.

प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजनेच्या प्रारंभ प्रसंगी तसेच नवी दिल्लीतील भारतीय कृषी संशोधन संस्थेत विविध योजनांच्या उद्घाटन आणि पायाभरणीप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

October 11th, 12:30 pm

व्यासपीठावर विराजमान केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान जी, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्याशी जोडले गेलेले राजीव रंजन सिंह जी, श्रीमान भागीरथ चौधरी जी, विभिन्न राज्यांचे मुख्यमंत्री, संसद सदस्य, आमदार, इतर महानुभाव आणि देशभरातून या कार्यक्रमात जोडले गेलेल्या माझ्या सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींनो!!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कृषी क्षेत्रातील 35,440 कोटी रुपये खर्चाच्या दोन महत्त्वाच्या योजनांची सुरुवात

October 11th, 12:00 pm

या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी क्षेत्रातील 35,440 कोटी रुपये खर्चाच्या दोन महत्त्वाच्या योजनांचा प्रारंभ केला.यावेळी त्यांनी 24,000 कोटी रुपये खर्चाची पंतप्रधान धनधान्य कृषी योजना सुरु केली. तसेच त्यांनी 11,440 कोटी रुपये खर्चाचे डाळींच्या क्षेत्रातील आत्मनिर्भरता अभियान देखील सुरु केले. पंतप्रधानांनी कृषी, पशुपालन, मत्स्यव्यवसाय तसेच अन्न प्रक्रिया या क्षेत्रांतील 5,450 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन करून त्यांचे लोकार्पण देखील केले आणि सुमारे 815 कोटी रुपये खर्चाच्या अतिरिक्त प्रकल्पांची पायाभरणी केली.

Our government's intentions, policies and decisions are empowering rural India with new energy: PM

January 04th, 11:15 am

PM Modi inaugurated Grameen Bharat Mahotsav in Delhi. He highlighted the launch of campaigns like the Swamitva Yojana, through which people in villages are receiving property papers. He remarked that over the past 10 years, several policies have been implemented to promote MSMEs and also mentioned the significant contribution of cooperatives in transforming the rural landscape.

PM Modi inaugurates the Grameen Bharat Mahotsav 2025

January 04th, 10:59 am

PM Modi inaugurated Grameen Bharat Mahotsav in Delhi. He highlighted the launch of campaigns like the Swamitva Yojana, through which people in villages are receiving property papers. He remarked that over the past 10 years, several policies have been implemented to promote MSMEs and also mentioned the significant contribution of cooperatives in transforming the rural landscape.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून 'जल संचय जन भागीदारी' उपक्रमाचा केला शुभारंभ

September 06th, 01:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील सुरत येथे ‘जल संचय जन भागिदारी’ उपक्रमाच्या शुभारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून 'जल संचय जन भागीदारी' उपक्रमाचा केला शुभारंभ

September 06th, 12:30 pm

या कार्यक्रमांतर्गत, पावसाच्या पाण्याचा संचय वाढविण्यासाठी आणि दीर्घकाळ पाण्याची शाश्वतता सुनिश्चित करण्यासाठी राज्यभरात अंदाजे 24,800 रेनवॉटर हार्वेस्टिंग, अर्थात पावसाचे पाणी साठवणाऱ्या संरचना बांधल्या जातील.

विकसित भारत विकसित गुजरात कार्यक्रमात पंतप्रधानांचे संबोधन

February 10th, 01:40 pm

गुजरातच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, केम छो...मजा मा. आज विकसित भारत-विकसित गुजरात हे फार मोठे अभियान सुरु होत आहे. आणि मला असे सांगण्यात आले आहे की, गुजरातमधील विधानसभेच्या सर्वच्या सर्व 182 जागांवर गुजरातच्या कानाकोपऱ्यातून लाखो लोक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या कार्यक्रमाशी जोडले गेले आहेत. विकसित गुजरातच्या या प्रवासात तुम्ही सर्वजण इतक्या उत्साहाने सहभागी झाला आहात...मी तुम्हा सर्वांचे खूप-खूप अभिनंदन करतो.

‘विकसित भारत विकसित गुजरात’ कार्यक्रमात पंतप्रधानांचे मार्गदर्शन

February 10th, 01:10 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘विकसित भारत विकसित गुजरात’ या कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी प्रधानमंत्री आवास योजना(PMAY) आणि इतर गृहनिर्माण योजनांतर्गत गुजरातमध्ये बांधण्यात आलेल्या 1.3 लाखांपेक्षा जास्त घरांचे उद्घाटन आणि भूमीपूजन केले. यावेळी त्यांनी आवास योजनेच्या काही लाभार्थ्यांसोबत संवाद देखील साधला.

PM Modi campaigns in Madhya Pradesh’s Betul, Shajapur and Jhabua

November 14th, 11:30 am

Amidst the ongoing election campaigning in Madhya Pradesh, Prime Minister Modi’s rally spree continued as he addressed multiple public meetings in Betul, Shajapur and Jhabua today. PM Modi said, “In the past few days, I have traveled to every corner of the state. The affection and trust towards the BJP are unprecedented. Your enthusiasm and this spirit have decided in Madhya Pradesh – ‘Phir Ek Baar, Bhajpa Sarkar’. The people of Madhya Pradesh will come out of their homes on 17th November to create history.”

कर्नाटकमधल्या यादगिरी जिल्ह्यात कोडेकल इथे विविध विकासकामांच्या लोकार्पण आणि भूमिपूजन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

January 19th, 12:11 pm

कर्नाटकचे राज्यपाल श्री थावरचंद गेहलोतजी, मुख्यमंत्री श्री बसवराज बोम्मई जी, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी श्री भगवंत खुबा जी, कर्नाटक सरकारचे मंत्रीगण, खासदार तसच आमदार आणि प्रचंड मोठ्या संख्येनं आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या माझ्या प्रिय बंधु भगिनींनो!