Prime Minister greets all CRPF personnel on their Raising Day
July 27th, 02:13 pm
Prime Minister Shri Narendra Modi today extended his greetings to all CRPF personnel on their Raising Day. He stated that the CRPF has distinguished itself through its unwavering courage and commitment to duty.India-New Zealand relationship built on enduring friendship, shared values, common commitment: PM Modi in Auckland
July 11th, 01:15 pm
PM Modi addressed a vibrant community event in Auckland, praising the Indian diaspora as a strong bridge between India and New Zealand. He highlighted the elevation of bilateral ties to a Strategic Partnership, celebrated 100 years of sporting ties between the two countries and underscored the shared heritage and deepening partnership between the two nations.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूझीलंडमधील भारतीय समुदायाला केले संबोधित
July 11th, 12:35 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ऑकलंड येथे 'किया ओरा मोदी' कार्यक्रमात न्यूझीलंडमधील भारतीय समुदायाच्या विशाल मेळाव्याला संबोधित केले. मोदी यांचा विशेष सन्मान म्हणून न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन या कार्यक्रमात सहभागी झाले होते. हा मेळावा 10,000 हून अधिक भारतीय समुदायाच्या सदस्यांच्या स्नेह, ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला होता.पंतप्रधानांची न्यूझीलंडच्या पंतप्रधानांसोबत अधिकृत चर्चा
July 11th, 08:09 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांची आज ऑकलंडमधील गव्हर्नमेंट हाऊस येथे भेट घेतली. गव्हर्नमेंट हाऊसवर आगमन होताच पंतप्रधान मोदींचे पारंपरिक माओरी पद्धतीने उत्साहात स्वागत करण्यात आले. या स्वागत सोहळ्यात शांतता, आदर आणि आदरातिथ्याचे प्रतीक असणाऱ्या पारंपरिक माओरी कलांचा समावेश होता. या पारंपरिक स्वागतानंतर पंतप्रधानांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.भारत-न्यूझीलंड संयुक्त निवेदन
July 11th, 07:59 am
न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्या निमंत्रणावरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 आणि 11 जुलै 2026 रोजी ऑकलंड, न्यूझीलंडच्या अधिकृत दौऱ्यावर गेले आहेत. गेल्या 40 वर्षांतला भारतीय पंतप्रधानाचा न्यूझीलंडचा हा पहिलाच दौरा असून, हा एक ऐतिहासिक टप्पा आहे आणि दोन्ही देशांमधील दीर्घकालीन मैत्री व भागीदारीला एक नवीन दिशा देणारा आहे.The Indo-Pacific represents the shared aspirations of like-minded democracies such as India and Australia: PM Modi at the Joint Press Meet
July 09th, 11:15 am
Addressing a joint press meet with Australian Prime Minister Anthony Albanese, PM Modi highlighted the expanding India-Australia Comprehensive Strategic Partnership. He also likened the India-Australia partnership to cricket, saying the agenda is One-Day focused, decisions are as fast as T20 and the partnership is as long and deep as a Test match.Our shared democratic values and common aspirations will take India-Indonesia relations to new heights: PM Modi at Indonesia Parliament
July 07th, 03:15 pm
Addressing the Parliament of Indonesia in Jakarta, PM Modi spoke about the deep civilisational and democratic ties between India and Indonesia. He also highlighted their maritime partnership, proposed the Ganga-Mahakam Vision and called for closer cooperation across development, security and the Global South, while reaffirming a free, open, inclusive and rules-based Indo-Pacific.पंतप्रधानांनी इंडोनेशियाच्या संसदेला केले संबोधित
July 07th, 03:00 pm
पंतप्रधानांनी आपल्या संबोधनाची सुरुवात इंडोनेशियाचे अध्यक्ष महामहीम प्रबोवो सुबियांतो यांच्या सन्माननीय उपस्थितीबद्दल त्यांचे, आणि संसदेच्या अध्यक्षा महामहीम पुआन महारानी यांनी दिलेल्या अगत्यपूर्ण आमंत्रणाबद्दल व भारत-इंडोनेशिया भागीदारीतील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल आभार मानून केली. भारताच्या 1.4 अब्ज जनतेच्या वतीने खासदारांना शुभेच्छा देताना ते म्हणाले की, 'लोकशाहीची जननी' या नात्याने भारत इंडोनेशियासोबतचे लोकशाही संबंध अधिक दृढ करण्यासाठी उत्सुक आहे. दोन्ही देशांमधील सखोल सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि सागरी संबंध अधोरेखित करत, दोन सहस्रकांहून अधिक काळ हिंदी महासागराने विचार, व्यापार, संस्कृती आणि श्रद्धेच्या देवाणघेवाणीद्वारे भारत आणि इंडोनेशियाला जोडले असल्याची आठवण पंतप्रधानांनी करून दिली. 'वसुधैव कुटुंबकम्' आणि 'भिन्नेक तुंगल इका' (विविधतेत एकता) या दोन्ही देशांच्या समान आदर्शांचा उल्लेख करत त्यांनी स्पष्ट केले की, ही मूल्ये आजही दोन्ही देशांमधील भागीदारीला दिशा देत आहेत. ते पुढे म्हणाले की, समान ऐतिहासिक प्रवास, समान आव्हाने आणि दोन्ही देशांतील जनतेच्या समान आकांक्षा यामुळे भारत आणि इंडोनेशिया नैसर्गिक आणि विश्वासू भागीदार म्हणून एकत्र आले आहेतइंडोनेशियाच्या अध्यक्षांसोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान पंतप्रधानांचे प्रसारमाध्यमांसमोर निवेदन
July 07th, 11:21 am
आज सकाळी मला अत्यंत स्नेहभावनेने आणि आदराने इंडोनेशियाचा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला आहे. हा सन्मान कोट्यवधी भारतीयांचा आहे, इंडोनेशियातील जनतेच्या भावनांचा आहे, तसेच भारत आणि इंडोनेशियाच्या ऐतिहासिक आणि घनिष्ठ संबंधांचा आहे. मी अध्यक्ष प्रबोवोजी, इंडोनेशिया सरकार आणि येथील जनतेचे मनापासून आभार मानतो.जपानच्या पंतप्रधानांसोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधानांचे निवेदन
July 02nd, 01:30 pm
भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेसाठी पंतप्रधान ताकाइची यांचे त्यांच्या पहिल्या भारत भेटीवर स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे. त्या जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान असून एक दूरदर्शी आणि लोकप्रिय नेत्या आहेत. इतकेच नाही तर त्या जपानच्या 'नारा प्रीफेक्चर' (Nara Prefecture) मधल्या आहेत, जे भारत आणि जपानच्या सामायिक बौद्ध वारशाचे एक अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे.पंतप्रधानांनी घेतली मॉरिशसच्या पंतप्रधानांची भेट.
June 28th, 08:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिक्टोरिया, माहे येथे मॉरिशसचे पंतप्रधान महामहिम डॉ. नवीनचंद्र रामगुलाम यांची भेट घेतली. सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमामध्ये दोन्ही नेत्यांची भेट झाली. पंतप्रधान रामगुलाम यांनी नोव्हेंबर 2024 मध्ये पदभार स्विकारल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेली ही चौथी भेट आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एव्हियन येथे आयोजित G7 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली
June 18th, 05:04 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 जून 2026 रोजी फ्रान्समधील एव्हियन येथे आयोजित G7 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड जे. ट्रम्प यांची भेट घेतली.जी-7 शिखर परिषदे निमित्त पंतप्रधानांनी घेतली संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांची भेट
June 17th, 12:38 am
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज फ्रान्समधील एव्हियन इथे आयोजित, जी-7 शिखर परिषदेदरम्यान संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांची भेट घेतली. 2026 या वर्षभरातील, उभय नेत्यांची ही तिसरी भेट होती. ही भेट भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील दृढ आणि गतिमान 'सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी'चं प्रतीक आहे.संयुक्त राष्ट्रांचा 'मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर' पुरस्कार मिळाल्याबद्दल मेजर अभिलाषा बराक यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
June 07th, 02:06 pm
मेजर अभिलाषा बराक यांना 'यूएन मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर' पुरस्कार मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांचे अभिनंदन केले. मेजर बराक या लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या अंतरिम दलात (UNIFIL) एंगेजमेंट टीम कमांडर आणि जेंडर फोकल पॉइंट म्हणून कार्यरत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले आहे.पंतप्रधानांनी सामायिक केले महर्षी पतंजली आणि योगाभ्यासाच्या गुणांचा गौरव करणारे एक संस्कृत सुभाषित
June 04th, 09:16 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महर्षी पतंजली यांना अभिवादन करणारे आणि योगाभ्यासाच्या सखोल फायद्यांचे महत्त्व अधोरेखित करणारे एक संस्कृत सुभाषित सामायिक केले. नियमित योगसाधना केल्याने शरीर सुदृढ आणि मन शांत राहते, तसेच दैनंदिन दिनचर्येचा भाग बनवल्याने जीवन संतुलित आणि ऊर्जावान बनते, असे नरेंद्र मोदी यांनी नमूद केले.पंतप्रधानांनी खऱ्या ज्ञानाच्या परिवर्तन घडवण्याच्या शक्तीवर प्रकाश टाकणारे एक संस्कृत सुभाषित सामायिक केले
May 26th, 09:20 am
पंतप्रधान, नरेंद्र मोदी म्हणाले की, खरे ज्ञान राष्ट्र, समाज आणि संपूर्ण मानवतेच्या कल्याणाचा मार्ग प्रशस्त करत असते. आपले ज्ञान आणि कृती संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणास्रोत होणे महत्त्वाचे आहे. असेही त्यांनी म्हटले आहे.अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली
May 23rd, 04:20 pm
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.Joint Statement on the State Visit of the President of the Republic of Cyprus
May 22nd, 09:31 pm
At the invitation of PM Modi, Cyprus President Nikos Christodoulides is on a State Visit to India, during which they held discussions on a wide range of issues. The two leaders agreed to elevate the bilateral Comprehensive Partnership to a Strategic Partnership and welcomed the significant progress made in the implementation of the India-Cyprus Joint Action Plan 2025-2029. President Christodoulides congratulated PM Modi on the successful hosting of the AI Impact Summit 2026.पंतप्रधानांनी आपल्या मातृभूमीच्या पवित्र वारशाचे महत्त्व सांगणारे आणि जागतिक समृद्धीसाठी प्रार्थना करणारे संस्कृत सुभाषित केले शेअर
May 21st, 09:04 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक संस्कृत सुभाषित शेअर केले. यात म्हटले आहे की, आपली मातृभूमी ही अध्यात्मिक साधना आणि उपासना, तसेच धैर्य, सामर्थ्य आणि वैश्विक कल्याणाची पवित्र भूमी राहिली आहे. महान वारसा आणि प्राचीन संस्कृती असलेली ही पवित्र भूमी सर्वांना सदैव सुख आणि समृद्धीने परिपूर्ण ठेवो, अशी भावना मोदी यांनी व्यक्त केली आहे.तिसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेतील संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान पंतप्रधानांनी केलेले निवेदन
May 19th, 04:25 pm
लोकशाही, कायद्याचे राज्य आणि बहुपक्षीयतेप्रति असलेली सामायिक वचनबद्धता आपल्या दोन्ही देशांना नैसर्गिक भागीदार बनवते. तंत्रज्ञान व शाश्वतता यांमधील सामायिक प्राधान्यक्रम आपल्या संबंधांना अनेक संधी देऊन परिपूर्ण करतात. म्हणूनच, आठ वर्षांपूर्वी, नॉर्डिक देशांसोबतच्या संबंधांना अधिक ऊर्जा देण्यासाठी आणि गती देण्यासाठी आपण ही शिखर परिषद घेत आहोत.