मन की बात फेब्रुवारी 2026

February 22nd, 11:30 am

‘मन की बात’ मध्ये आपले स्वागत आहे, शुभेच्छा आहेत. (अभिनंदन आहे.) मन की बात हे देशाच्या आणि देशवासियांच्या कार्यकर्तृत्वाला (उपलब्धी) सर्वांसमोर आणण्यासाठी एक सशक्त व्यासपीठ आहे. नुकत्याच दिल्लीत संपन्न झालेल्या ग्लोबल एआय इम्पॅक्ट समिटमध्ये देशाने अशीच एक उपलब्धी पाहिली. अनेक देशांतील नेते, उद्योग क्षेत्रातील अग्रणी, नवोन्मेषक आणि स्टार्ट अप क्षेत्राशी संबंधित लोक, एआय इम्पॅक्ट समिटसाठी भारत मंडपम मध्ये एकत्र आले होते. आगामी एआय च्या शक्तीचा उपयोग जगभरात कसा केला जाईल या दृष्टीने ही शिखर परिषद एक महत्त्वाचे वळण ठरली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा 2026 च्या दुसऱ्या भागात कोईम्बतूर, छत्तीसगड, गुजरात आणि आसाममधील विद्यार्थ्यांशी साधलेल्या संवादाची क्षणचित्रे केली सामायिक

February 10th, 05:06 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2026 मधील परीक्षा पे चर्चा (PPC) या कार्यक्रमाच्या 9 व्या आवृत्तीत विद्यार्थ्यांशी साधलेल्या संवादाची काही क्षणचित्रे सामायिक केली आहेत. पंतप्रधान मोदी यांनी परीक्षा पे चर्चा 2026 च्या दुसऱ्या भागादरम्यान कोईम्बतूर, छत्तीसगड, गुजरात आणि आसाममधील एक्झाम वॉरियर्स (Exam Warriors) सोबत अनौपचारिक संवाद साधला. परीक्षा पे चर्चाच्या या विशेष आवृत्तीत विद्यार्थ्यांचे स्वागत करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी हा कार्यक्रम देशाच्या विविध भागांमध्ये आयोजित केला गेल्याचे नमूद केले.

‘परीक्षा पे चर्चा 2026’ कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागामध्ये पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी साधलेल्या संवादाचा मजकूर

February 09th, 10:30 am

माझ्या प्रिय मित्रांनो, 'परीक्षा पे चर्चा' च्या या महत्त्वपूर्ण भागात तुमचे स्वागत आहे. यावेळचा परीक्षा पे चर्चा कार्यक्रम काहीतरी वेगळा आहे, काहीतरी खास आहे. अनेक विद्यार्थ्यांनी मला सूचना पाठवल्या होत्या की देशाच्या वेगवेगळ्या भागांतही परीक्षा पे चर्चा व्हायला पाहिजे. म्हणून यावेळी मी देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये विद्यार्थ्यांसोबत बसून परीक्षा पे चर्चा केली आहे. या विशेष भागात तुम्हाला हेच पाहायला मिळणार आहे. तर चला प्रथम तामिळनाडूतील कोइम्बतूरला जाऊया. तामिळनाडूतील विद्यार्थ्यांची ऊर्जा आणि उत्सुकता पाहून मी खूप प्रभावित झालो. चला, पाहूया.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा 2026 च्या दुसऱ्या भागात कोईम्बतूर, रायपूर, देवमोगरा आणि गुवाहाटी येथील विद्यार्थ्यांशी साधला संवाद

February 09th, 10:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज परीक्षा पे चर्चा 2026 च्या 9 व्या आवृत्तीला पुढे सुरू ठेवत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. परीक्षा पे चर्चा 2026 च्या दुसऱ्या भागात पंतप्रधानांनी कोईम्बतूर, रायपूर, देवमोगरा आणि गुवाहाटी येथील 'एक्झॅम वॉरियर्स'शी अनौपचारिक संवाद साधला. 'परीक्षा पे चर्चा'च्या या विशेष आवृत्तीत विद्यार्थ्यांचे स्वागत करताना श्री मोदी यांनी नमूद केले की, यावेळी हा कार्यक्रम देशाच्या विविध भागांत आयोजित करण्यात आला आहे. कोईम्बतूर आवृत्तीची सुरुवात करताना पंतप्रधानांनी नमूद केले की, तामिळनाडूच्या विद्यार्थ्यांमधील ऊर्जा आणि कुतूहलाने ते मनापासून प्रभावित झाले आहेत. वणक्कम म्हणून त्यांचे स्वागत करत त्यांनी हलकाफुलका संवाद साधला. विद्यार्थ्यांनी आपला उत्साह व्यक्त करताना सांगितले की, त्यांना आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता जेव्हा त्यांनी पंतप्रधानांना पाहिले; त्यांना वाटले होते की पंतप्रधानांचे आगमन खूप नाट्यमय असेल, परंतु त्यांना ते अत्यंत साधे, नम्र आणि जमिनीशी नाते असलेले वाटले. एका विद्यार्थ्याने आपला अनुभव सांगताना म्हटले की, पंतप्रधानांच्या आगमनाच्या वेळी त्यांना कमालीचे दडपण आल्यासारखे वाटत होते.

पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांची अमर्याद क्षमता अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित आणि 'परीक्षा पे चर्चा'चा उद्देश केला सामायिक

February 09th, 09:06 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे की, आपले विद्यार्थी असामान्य प्रतिभेने संपन्न आहेत आणि त्यांच्यामध्ये आपली स्वप्ने प्रत्यक्षात आणण्याची पूर्ण क्षमता आहे. त्यांनी नमूद केले की, परीक्षा पे चर्चाचा उद्देश विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमता आणि कौशल्यांचा वैयक्तिक वाढ आणि यशासाठी अर्थपूर्ण वापर कसा करावा, यावर मार्गदर्शन करणे हा आहे.

“परीक्षा पे चर्चा 2026” कार्यक्रमात पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी साधलेला संवाद

February 06th, 10:21 am

मी सानवी आचार्य, मी तुमच्याच राज्यातून म्हणजे गुजरातमधील आहे. माझा पहिला प्रश्न असा आहे की, पालक आमची चिंता करतात आणि शिक्षक देखील आम्हाला मदत करतात. मात्र मुख्य मुद्दा तेव्हा येतो , जेव्हा शिक्षक आम्हाला अभ्यासाची एक वेगळी पद्धत सुचवतात. पालक वेगळ्या पद्धतीने सांगतात की या पॅटर्ननुसार अभ्यास करा आणि विद्यार्थ्यांमध्ये तर वेगळाच ट्रेंड सुरु असतो, त्यामुळे त्यावेळी आम्ही गोंधळून जातो की कोणती पद्धत बरोबर आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'परीक्षा पे चर्चा 2026' या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी साधला संवाद

February 06th, 10:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'परीक्षा पे चर्चा' (पीपीसी) च्या नवव्या भागात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पंतप्रधानांनी दिल्लीतील आपल्या निवासस्थानी 'एक्झाम वॉरियर्स'सोबत अनौपचारिक संवाद साधला.

Prime Minister Invites everyone to Join #ParikshaPeCharcha26

February 05th, 09:56 pm

Prime Minister Shri Narendra Modi invited everyone to join #ParikshaPeCharcha26 to be held tomorrow, 6th February at 10 AM. He highlighted that this year’s edition will feature very interesting topics relating to examinations, notably the importance of remaining stress free and focusing on learning. The Prime Minister emphasized that this platform has always been one he enjoys, as it provides him with the opportunity to interact with bright minds from across the country.