पार्वती गिरी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पंतप्रधानांचे त्यांना अभिवादन

January 19th, 11:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पार्वती गिरी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांना आज अभिवादन केले आहे. वसाहतवादी राजवट संपवण्यासाठीच्या चळवळीत त्यांनी बजावलेली भूमिका, समाजाच्या सेवेबद्दलची त्यांची तळमळ तसेच आरोग्यसेवा, महिला सक्षमीकरण आणि संस्कृती यासारख्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याची मोदींनी प्रशंसा केली आहे.