ख्यातनाम गायक पंकज उधास यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शोक व्यक्त
February 26th, 07:08 pm
ख्यातनाम गायक पंकज उधास यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. पंकज उधास यांच्याशी अनेकदा झालेल्या संवादाचे स्मरण करून पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे की, पंकज उधास हे भारतीय संगीताचे दीपस्तंभ होते, त्यांच्या स्वरांनी अनेक पिढ्यांना प्रभावित केले. पंतप्रधानांनी पुढे म्हटले आहे की, पंकज उधास यांच्या निधनाने संगीत विश्वात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे.