इथिओपियाच्या संसदेत संयुक्त अधिवेशनात पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर
December 17th, 12:25 pm
आज आपल्या समोर उभे राहण्याचा मला मोठा सन्मान आणि विशेषाधिकार लाभला आहे. सिंहांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इथिओपियात येणे हे अत्यंत आनंददायी आहे. मला येथे अगदी घरी असल्यासारखे वाटते कारण, भारतातील माझे गृह राज्य गुजरात हेही सिंहांचे निवासस्थान आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इथिओपियाच्या संसदेतील संयुक्त अधिवेशनाला केले संबोधित
December 17th, 12:12 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इथिओपियाच्या संसदेत संयुक्त अधिवेशनाला संबोधित केले. इथिओपियाचा हा त्यांचा पहिलाच द्विपक्षीय दौरा आहे. त्यानिमित्त त्यांना अधिवेशनात भाषण करण्याचा विशेष सन्मान मिळाला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इथिओपियाच्या पंतप्रधानांसोबत केली द्विपक्षीय चर्चा
December 17th, 12:02 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इथिओपियाच्या फेडरल डेमोक्रॅटिक रिपब्लिकचे पंतप्रधान महामहिम डॉ. अबी अहमद यांची आज आदिस अबाबा येथील नॅशनल पॅलेसमध्ये भेट घेतली. पॅलेसमध्ये आगमनावेळी पंतप्रधान मोदी यांचे पंतप्रधान डॉ. अबी अहमद यांनी मनःपूर्वक स्वागत केले. यावेळी पंतप्रधान मोदी यांचा औपचारिक सन्मान करण्यात आला.उडुपी येथील श्रीकृष्ण मठातील लक्षकंठ गीता पारायण कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
November 28th, 11:45 am
मी माझे भाषण सुरु करण्यापूर्वी — इथे काही मुलं चित्र काढून घेऊन आली आहेत. SPG चे लोक आणि स्थानिक पोलिस थोडी मदत करतील का, ती चित्रं गोळा करण्यासाठी? जर तुम्ही त्याच्या मागे तुमचा पत्ता लिहिला असेल, तर मी नक्कीच तुम्हाला आभारपत्र पाठवेन. ज्यांनी जे काही आणले असेल, ते देऊन टाका, ते गोळा करतील आणि मग तुम्ही निवांत बसू शकता. ही मुले इतकी मेहनत करतात, आणि कधी कधी, मीच त्यांच्या बाबतीत अन्याय करतो असं वाटतं, तेव्हा मला खूप वाईट वाटतं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील उडुपी येथील श्री कृष्ण मठातील 'लक्ष कंठ गीता पारायण' कार्यक्रमाला केले संबोधित
November 28th, 11:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटकातील उडुपी येथील श्री कृष्ण मठातील 'लक्ष कंठ गीता पारायण' कार्यक्रमाला संबोधित केले. भगवान श्रीकृष्णाचे दिव्य दर्शनाचे समाधान, श्रीमद् भगवद्गीतेच्या मंत्रांचा आध्यात्मिक अनुभव आणि इतक्या पूज्य संत आणि गुरूंची उपस्थिती, हे आपल्यासाठी एक परम भाग्य आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. हे असंख्य आशीर्वादांची प्राप्ती करण्यासारखे आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.Congress kept misleading ex-servicemen with false promises of One Rank One Pension: PM Modi in Aurangabad, Bihar
November 07th, 01:49 pm
Continuing his high-voltage election campaign, PM Modi today addressed a massive public meeting in Aurangabad. He said that Bihar has created history in the very first phase of voting. The PM noted that yesterday’s polling has recorded the highest turnout ever in Bihar, with nearly 65% of voters participating. He remarked that this clearly shows that the people of Bihar themselves have taken the lead in ensuring the return of the NDA government.PM Modi campaigns in Bihar’s Aurangabad and Bhabua
November 07th, 01:45 pm
Continuing his high-voltage election campaign, PM Modi today addressed two massive public meetings in Aurangabad and Bhabua. He said that Bihar has created history in the very first phase of voting. The PM noted that yesterday’s polling recorded the highest turnout ever in the state, with nearly 65% voter participation. He remarked that this clearly shows that the people of Bihar have themselves taken the lead in ensuring the return of the NDA government.मध्य प्रदेशातील धार येथे विकासकामांच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
September 17th, 11:20 am
मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगुभाई पटेल, इथले लोकप्रिय मुख्यमंत्री मोहन यादव जी, केंद्रातील माझ्या सहकारी सावित्री ठाकुर जी, देशातील कानाकोपऱ्यातून या कार्यक्रमात सहभागी झालेले सर्व केंद्रीय मंत्री, राज्यांचे राज्यपाल, राज्यांचे मुख्यमंत्री, मंचावर उपस्थित अन्य सर्व मान्यवर आणि देशातील माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील धार येथे विविध विकास कामांची पायाभरणी आणि उद्घाटन केले
September 17th, 11:19 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशातील धार येथे विविध विकास कामांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. उपस्थितांना संबोधित करण्यापूर्वी, पंतप्रधान धार भोजशाळेची पूज्य माता, ज्ञानदेवता, वाग्देवीच्या चरणी नतमस्तक झाले. आज कौशल्य आणि निर्मितीचे दैवत, भगवान विश्वकर्मा यांची जयंती आहे, असे सांगून मोदी यांनी भगवान विश्वकर्मा यांना अभिवादन केले. आपली कारागिरी आणि समर्पणातून राष्ट्र उभारणीच्या कामात योगदान देणाऱ्या कोट्यवधी बंधू-भगिनींप्रति त्यांनी आदर व्यक्त केला.25 व्या एससीओ शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधानांनी दिलेले निवेदन
September 01st, 10:14 am
25 व्या एससीओ शिखर परिषदेत सहभागी होताना मला आनंद होत आहे. शानदार स्वागत आणि आदरातिथ्याबद्दल मी राष्ट्रपती शी यांचे मनापासून आभार मानतो.चीनमधील तियानजिन येथील पंचविसाव्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत पंतप्रधानांचा सहभाग
September 01st, 10:00 am
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी दिनांक 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2025 दरम्यान चीनमधील तियानजिन येथे झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेतील (एससीओ) राष्ट्रप्रमुखांच्या पंचविसाव्या बैठकीत सहभाग झाले आहेत. या शिखर परिषदेत एससीओचे विकासविषयक धोरण, जागतिक प्रशासनात करण्याच्या सुधारणा, दहशतवाद विरोधी धोरण, शांतता आणि सुरक्षा, आर्थिक आणि वित्तीय सहकार्य आणि शाश्वत विकास यावर सफल चर्चा झाली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (125 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद
August 31st, 11:30 am
यंदाच्या पावसाळ्यात नैसर्गिक आपत्ती, देशाची परीक्षा पाहत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून आपण पूर आणि दरडी कोसळल्यामुळे घडलेला हाहाःकार पाहिला आहे. अनेक घरांचे नुकसान झाले, शेतं पाण्याखाली गेली, कुटूंबच्या कुटुंबे उध्वस्त झाली, पाण्याच्या वेगवान प्रवाहात अनेक पूल वाहून गेले, रस्ते वाहून गेले , लोकांवर संकट कोसळलं. या घटनांमुळे प्रत्येक भारतीयाला दुःख झालं आहे. ज्या कुटुंबांनी प्रियजनांना गमावले, त्यांचं दुःख आपणा सर्वांचं दुःख आहे. जिथे कुठे आपत्ती आली, तिथल्या लोकांना वाचवण्यासाठी आपले एनडीआरएफ-एसडीआरएफ चे जवान , अन्य सुरक्षा दले प्रत्येकजण रात्रंदिवस बचावकार्यात सहभागी झाले होते. जवानांनी तंत्रज्ञानाची देखील मदत घेतली आहे. थर्मल कॅमेरे , लाईव्ह डिटेक्टर , स्निफर डॉग्स आणि ड्रोन द्वारे देखरेख अशा अनेक आधुनिक संसाधनांच्या सहाय्यानं मदतकार्याला गती देण्याचे पुरेपूर प्रयत्न केले गेले . या दरम्यानच्या काळात हेलिकॉप्टरद्वारे मदतसामग्री पोहचवण्यात आली, जखमींना हेलिकॉप्टरमधून उपचारांसाठी हलवण्यात आलं. या संकटसमयी सैन्यदलाची मोठी मदत झाली. स्थानिक लोक, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर्स, प्रशासन या सर्वांनी या संकटाच्या काळात शक्य ते सर्व प्रयत्न केले. या कठीण काळात मानवता धर्म सर्वोपरी मानून मदत करणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे मी मनापासून आभार मानतो.गुजरातमधील अहमदाबाद येथे विविध विकास योजनांच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
August 25th, 06:42 pm
तुम्ही सर्वांनी आज छान वातावरण निर्मिती केली आहे. अनेक वेळा माझ्या मनात विचार येतो की मी किती नशीबवान आहे, ज्यामुळे मला लाखो लोकांचे प्रेम आणि आशीर्वाद लाभत आहेत. मी तुम्हा सर्वांचे कितीही आभार मानले तरीही ते कमीच आहेत. पहा तिकडे कोणी छोटा नरेंद्र उभा आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अहमदाबाद, गुजरात येथे 5,400 कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन, पायाभरणी आणि लोकार्पण
August 25th, 06:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील अहमदाबाद येथे 5,400 कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन, पायाभरणी आणि राष्ट्रार्पण केले. उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी सांगितले की, संपूर्ण देश सध्या गणेशोत्सवाच्या उत्साहाने भरलेला आहे. गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने आज गुजरातच्या प्रगतीशी जोडलेल्या अनेक विकास प्रकल्पांचा शुभारंभ होत आहे. त्यांनी सांगितले की, अनेक प्रकल्प जनतेच्या चरणी समर्पित करण्याचा मान त्यांना मिळाला आहे आणि या विकास उपक्रमांसाठी त्यांनी सर्व नागरिकांचे मनापासून अभिनंदन केले.बिहारच्या गया जीमधील विविध विकास प्रकल्पांच्या उद्घाटनावेळी पंतप्रधानांचे भाषण
August 22nd, 12:00 pm
बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खानजी, येथील लोकप्रिय मुख्यमंत्री नितीश कुमारजी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी जीतन राम मांझीजी, राजीव रंजन सिंह, चिराग पासवानजी, राम नाथ ठाकूरजी, नित्यानंद रायजी, सतीश चंद्र दुबेजी, राज भूषण चौधरीजी, उपमुख्यमंत्री सम्राट चौधरीजी, विजय कुमार सिन्हाजी, बिहार सरकारचे मंत्रीगण, संसदेतील माझे सहकारी उपेंद्र कुशवाहा जी, इतर खासदार आणि बिहारमधील माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमधील गया येथे 12,000 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे भूमीपूजन आणि उद्घाटन
August 22nd, 11:20 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज बिहारमधील गया येथे 12,000 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे भूमीपूजन आणि उद्घाटन झाले. यावेळी पंतप्रधाननांनी ज्ञान आणि मुक्तीचे पवित्र शहर असलेल्या गयाजीला अभिवादन केले आणि विष्णुपद मंदिराच्या या गौरवशाली भूमीतून सर्वांना शुभेच्छाही दिल्या. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधितही केले. गयाजीची भूमी ही अध्यात्म आणि शांतीची भूमी आहे, असे पंतप्रधान म्हणाले. याच पवित्र भूमीवर भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती, ही बाब त्यांनी अधोरेखित केली. गयाजींचा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा अतिशय प्राचीन आणि समृद्ध आहे, असे पंतप्रधान म्हणाले. आपल्या शहराचा उल्लेख केवळ गया असा न करता तो आदरपूर्वक गयाजी असा केला जावा अशा, या प्रदेशातील जनतेच्या अपेक्षेचा आणि भावनेचा आदर केल्याबद्दल पंतप्रधानांनी बिहार सरकारचे अभिनंदन केले. केंद्र सरकार आणि बिहारमधील सरकारे गयाजीच्या जलद विकासासाठी सातत्याने काम करत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील ठळक मुद्दे
August 15th, 03:52 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील लाल किल्ल्यावरून 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशाला संबोधित केले. त्यांचे हे भाषण 103 मिनिटांचे असून लाल किल्ल्यावरील सर्वात जास्त काळ चाललेले आणि महत्त्वाचे भाषण ठरले. या भाषणात, त्यांनी 2025 पर्यंत विकसित भारतासाठी एक महत्त्वाकांक्षी आराखडा मांडला. आत्मनिर्भरता, नावीन्यपूर्णता, आणि नागरिकांचे सक्षमीकरण यावर पंतप्रधानांनी भर दिला. एकेकाळी दुसऱ्यांवर अवलंबून असलेला देश, आज जागतिक स्तरावर आत्मविश्वासाने भरलेला, तंत्रज्ञानाने प्रगत आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनला आहे, हे त्यांनी आपल्या भाषणातून अधोरेखित केले.79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेलं भाषण
August 15th, 07:00 am
स्वातंत्र्याचे हे महापर्व, 140 कोटी संकल्पाचे पर्व आहे. स्वातंत्र्याचे हे पर्व सामूहिक सिद्धींचे, गौरवाचे पर्व आहे. आणि हृदय अपेक्षांनी भरलेले आहे. देश एकतेच्या भावनेला सातत्याने बळकटी देत आहे. 140 कोटी देशवासीय आज तिरंग्याच्या रंगात रंगून गेले आहेत. हर घर तिरंगा... भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात, मग तो वाळवंटी भाग असो, किंवा हिमालयाची शिखरे असोत, सागर किनारे असोत, किंवा दाट लोकसंख्येचे भाग, प्रत्येक भागातून एकच आवाज घुमत आहे, एकच जयघोष आहे, आपल्या प्राणांपेक्षाही प्रिय मातृभूमीचे जयगान आहे …भारतात 79 वा स्वातंत्र्यदिन साजरा
August 15th, 06:45 am
79 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित करताना घटना समिती, स्वातंत्र्यसैनिक आणि संविधान निर्मात्यांना आदरांजली वाहिली. भारत नेहमीच आपल्या शेतकरी, पशुपालक आणि मच्छिमारांच्या हिताचे रक्षण करेल याचा त्यांनी पुनरुच्चार केला. 2047 पर्यंत विकसित भारत साध्य करण्याच्या उद्देशाने GST सुधारणा, प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना, राष्ट्रीय क्रीडा धोरण आणि सुदर्शन चक्र मिशन या प्रमुख उपक्रमांवर त्यांनी प्रकाश टाकला. पंचायत सदस्य आणि ड्रोन दीदी सारख्या विशेष अतिथींनी लाल किल्ल्यावरील सोहळ्याला हजेरी लावली.फिलिपिन्सच्या राष्ट्राध्यक्षांबरोबरच्या संयुक्त पत्रकार परिषदेतील पंतप्रधानांचे माध्यमांसाठी निवेदन
August 05th, 11:06 am
सर्वप्रथम मी राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे भारतात हार्दिक स्वागत करतो. या वर्षी भारत आणि फिलिपिन्स आपल्यातील राजनैतिक संबंधांचे पंचाहत्तरवे वर्ष साजरे करत आहेत. आणि या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा महत्वाचा ठरतो. आमच्यातील राजनैतिक संबध नवीन असले, तरी आमच्या संस्कृतींमधील संपर्क फार प्राचीन काळापासूनचा आहे. फिलीपिन्सचे रामायण - महाराडिया लावना - हे आमच्यातील शतकानुशतके जुन्या सांस्कृतिक संबंधांचे जिवंत उदाहरण आहे. दोन्ही देशांच्या राष्ट्रीय फुलांचे चित्र असलेले नुकतेच जारी केलेले टपाल तिकिट आमच्यातील मैत्रीचा सुगंध पसरवत आहे.