पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या जन्मदिनी, त्यांच्यासोबत ओदिशातील पहाडपूर गावाला दिली भेट
June 20th, 08:58 pm
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या वाढदिवशी त्यांच्यासोबत ओदिशातील पहाडपूर गावाला भेट देणे हा आपण आपला बहुमान मानत असल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. पहाडपूर हे राष्ट्रपतींचे स्वतःचे गाव असून त्यांनी केलेले कार्य खरोखरच अत्यंत प्रेरणादायी असल्याचेही पंतप्रधानांनी म्हटले आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थनाही केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह पहाडपूर गावातील गोसानी पीठ येथे केली प्रार्थना
June 20th, 08:54 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, त्यांनी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पहाडपूर गावातील गोसानी पीठ येथे प्रार्थना केली.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह पंतप्रधानांनी पहाडपूर गावातील संथाली जहेरा व हो जहेरा इथे वाहिली आदरांजली
June 20th, 08:51 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासमवेत पहाडपूर गावातील संथाली जहेरा व हो जहेरा इथे आदरांजली वाहिली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहाडपूर गावातील कौशल्य विकास केंद्राला भेट देऊन कौशल्य विकासावर लक्ष केंद्रित केल्याबद्दल केले कौतुक
June 20th, 08:49 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशातील पहाडपूर गावातील कौशल्य विकास केंद्राला आज भेट दिली.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कुटुंबीयांच्या पहाडपूर येथील समाधीस्थळावर पंतप्रधानांकडून पुष्पांजली अर्पण
June 20th, 08:47 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहाडपूर येथील शाळेच्या परिसरात असलेल्या दिवंगत श्याम चरण मुर्मू, लखन मुर्मू आणि सिपुन मुर्मू यांच्या समाधीस्थळावर पुष्पांजली अर्पण केली.पंतप्रधानांनी पहाडपूर गावातील शाळेला दिली भेट; शैक्षणिक पायाभूत सुविधांमध्ये सुधारणेसाठी केलेल्या प्रयत्नांवर टाकला प्रकाश
June 20th, 08:44 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, पहाडपूर गावातील शाळेला भेट देताना आपल्याला आनंद झाला.Odisha is emerging as a gateway to growth and prosperity in eastern India: PM Modi in Pahadpur
June 20th, 01:10 pm
The President, Smt. Droupadi Murmu and the Prime Minister, Shri Narendra Modi visited Pahadpur village in Mayurbhanj district today. The President and the Prime Minister offered prayers at the sacred groves Santhali Jahera and Ho Jahera, Skill Centre and Pahadpur School. The President and Prime Minister participated in a programme at Rairangpur in Mayurbhanj district, marking the completion of two years of the Government of Odisha. The theme of the programme is “Vikas ra Dhara, Odisha Sara”. Shri Modi inaugurated and laid the foundation stone of various development projects worth over ₹47,600 crore.ओदिशा राज्य सरकारने दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ओदिशातील मयूरभंज जिल्ह्यातील रायरंगपूर इथे 47,600 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी
June 20th, 01:00 pm
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ओदिशात मयूरभंज जिल्ह्यातील पहाडपूर गावाला भेट दिली. यावेळी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी संथाली जाहेरा आणि हो जाहेरा या पवित्र उपवनांत, तसेच हो जाहेरा कौशल्य केंद्रात आणि पहाडपूर शाळेत जाऊन प्रार्थना केली. यानंतर राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी मयूरभंज जिल्ह्यातील रायरंगपूर इथे आयोजित एका कार्यक्रमात भाग घेतला. ओदिशा राज्य सरकारचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विकास रा धारा, ओदिशा सारा अशी या कार्यक्रमाची मुख्य संकल्पना होती. या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 47,600 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.पंतप्रधानांचा 20 जून रोजी ओदिशा दौरा
June 19th, 11:53 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 जून 2026 रोजी ओदिशाचा दौरा करणार आहेत. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधानांसोबत या दौऱ्यात सहभागी होणार असून, ओदिशासाठी हा एक क्वचितच घडून येणारा महत्त्वाचा प्रसंग ठरणार आहे.