Prime Minister attends the Civil Investiture Ceremony-II

May 28th, 09:27 am

Prime Minister, Shri Narendra Modi, today, attended the Civil Investiture Ceremony-II, where the Padma Awards were presented. The Padma awardees have made notable contributions to our society. The life journeys of those who were conferred the Padma are deeply motivating, Shri Modi added.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवानंद बाबा यांच्या निधनाबद्दल व्यक्त केला शोक

May 04th, 10:58 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगसाधक आणि काशीचे रहिवासी शिवानंद बाबा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.

मुंबईतील वेव्हज परिषदमध्ये पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मराठी अनुवाद

May 01st, 03:35 pm

वेव्हज परिषदे मध्ये उपस्थित महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन जी, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी अश्विनी वैष्णव जी, एल. मुरुगन जी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, अजित पवार जी, जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेले सृजनशील विश्वातील सर्व मान्यवर, विविध देशांतून आलेले माहिती, संवाद, कला आणि संस्कृती विभागांचे मंत्री, विविध देशांचे राजदूत, जगभरातील सृजनशील विश्वातील चेहरे, इतर मान्यवर, बंधूंनो आणि भगिनींनो

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वेव्हज 2025 चे उद्घाटन

May 01st, 11:15 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे भारतातील पहिल्या जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेचे उद्घाटन केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना, त्यांनी आज साजरा होत असलेल्या महाराष्ट्र दिन आणि गुजरात राज्य स्थापना दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. सर्व आंतरराष्ट्रीय मान्यवर, राजदूत आणि सृजनशील उद्योगातील अग्रणींच्या उपस्थितीचे कौतुक करत, पंतप्रधानांनी या मेळाव्याचे महत्त्व अधोरेखित केले. 100 हून अधिक देशांचे कलाकार, नवोन्मेषक, गुंतवणूकदार आणि धोरणकर्ते, प्रतिभा आणि सृजनशीलतेच्या जागतिक परिसंस्थेचा पाया रचण्यासाठी एकत्र आले आहेत यावर त्यांनी भर दिला. वेव्हज ही केवळ एक संक्षिप्त संज्ञा नव्हे तर संस्कृती, सृजनशीलता आणि सार्वत्रिक कनेक्टिव्हिटीचे प्रतिनिधित्व करणारी एक लाट आहे, असे त्यांनी नमूद केले. ही शिखर परिषद चित्रपट, संगीत, गेमिंग, अॅनिमेशन आणि कथाकथनाच्या विस्तृत जगाचे प्रदर्शन करते, तसेच कलाकार आणि सर्जकांचा संवाद साधून त्यांच्या सहयोगासाठी एक जागतिक मंच प्रदान करत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. पंतप्रधानांनी या ऐतिहासिक प्रसंगी सर्व सहभागींचे अभिनंदन केले आणि देश-विदेशातील मान्यवर अतिथींचे हार्दिक स्वागत केले.

नागरी पुरस्कार वितरण सोहळा-I ला पंतप्रधानांची उपस्थिती

April 28th, 09:46 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागरी पुरस्कार वितरण सोहळा-I ला उपस्थित राहिले. या सोहळ्यात पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. विविध क्षेत्रातील उत्कृष्ट व्यक्तींना त्यांच्या सेवेसाठी आणि कामगिरीसाठी गौरवण्यात आले, असे मोदी म्हणाले.

2025 या वर्षाच्या सर्व पद्म पुरस्कार विजेत्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

January 25th, 09:27 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 2025 या वर्षाच्या सर्व पद्म पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. पुरस्कारप्राप्त प्रत्येक व्यक्तिमत्व हे कठोर परिश्रम, ध्यास आणि नाविन्यतेचे प्रतीक आहेत, त्यांच्यामुळे असंख्य लोकांच्या जीवनमानावर सकारात्मक परिणाम घडून आला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

पद्म पुरस्कार विजेते प्रख्यात वनस्पतिशास्त्रज्ञ डॉ. के एस मणिलाल यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख

January 01st, 10:29 pm

पद्म पुरस्कार विजेते आणि प्रख्यात वनस्पतिशास्त्रज्ञ डॉ. के.एस. मणिलाल यांच्या निधनाबद्दल आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे.