तिसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेच्या निमित्ताने दाखल झालेल्या डेन्मार्कच्या हंगामी पंतप्रधानांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
May 19th, 06:40 pm
यावेळी उभय नेत्यांनी द्विपक्षीय सहकार्याचा आढावा घेतला आणि सामायिक कृतीक्रमाच्या संदर्भात झालेल्या प्रगतीविषयी समाधान व्यक्त केले. पर्यावरण आणि हवामानबदलाच्या क्षेत्रांत सहयोगाला प्राधान्य देणाऱ्या भारत-डेन्मार्क हरित धोरणात्मक भागीदारीत झालेल्या प्रगतीचे दोन्ही नेत्यांनी स्वागत केले. दोन्ही देशांमध्ये हरित व्यवस्थेकडे वाटचाल करण्यासाठी संसाधनांचे एकत्रीकरण करण्यालाही यात प्राधान्य देण्यात आले आहे. 2020 मध्ये हरित धोरणात्मक भागीदारीचा प्रारंभ झाल्यापासून दोन्ही देशांमध्ये नियमितपणे झालेल्या उच्चस्तरीय आदान-प्रदानाची उजळणी करत दोन्ही नेत्यांनी येथून पुढे नवीन आणि उगवत्या तंत्रज्ञानाच्या बाबतीत, तसेच संदेशवहन, प्रगत संशोधन, स्टार्टअप आणि शैक्षणिक आदान-प्रदान यांच्या बाबतीत सहयोग अधिक बळकट करण्याचा निर्णय घेतला. संरक्षण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांत सहकार्य करण्याबद्दलही त्यांनी चर्चा केली. गुजरातमध्ये जीआयएफटी शहरात व्यवसाय करण्यासाठी पंतप्रधानांनी डेन्मार्कच्या कंपन्यांना निमंत्रणही दिले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नॉर्वेच्या पंतप्रधानांसोबत केली द्विपक्षीय चर्चा
May 18th, 08:21 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नॉर्वेचे पंतप्रधान महामहीम जोनास गहर स्टोर यांच्यासोबत ओस्लो इथे द्विपक्षीय चर्चा केली. भारत आणि नॉर्वे यांच्यातील दृढ संबंधांचे प्रतीक म्हणून, पंतप्रधान स्टोर यांनी आज सकाळी पंतप्रधान मोदी यांचे ओस्लो विमानतळावर आगमन झाल्यावर अत्यंत उत्साहाने स्वागत केले.पंतप्रधानांची नॉर्वेचे राजे महामहीम किंग हॅराल्ड पाचवे यांच्याशी भेट
May 18th, 07:36 pm
पंतप्रधान मोदींनी ओस्लो येथील रॉयल पॅलेसमध्ये नॉर्वेचे राजे महामहीम किंग हॅराल्ड पाचवे यांची भेट घेतली, जिथे दोन्ही नेत्यांनी वाढत्या भारत-नॉर्वे भागीदारी आणि विविध क्षेत्रांमधील, विशेषतः नवीन तंत्रज्ञानातील प्रगतीवर चर्चा केली. या भेटीनंतर पंतप्रधान मोदींच्या सन्मानार्थ दुपारच्या भोजनाचे आयोजन करण्यात आले होते.