पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गंगटोक येथील ऑर्किडेरियमला भेट; सिक्कीमच्या विलक्षण जैवविविधतेचे केले कौतुक
April 28th, 03:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सिक्कीममधील गंगटोक येथील ऑर्किडेरियमला भेट दिली. यावेळी त्यांनी तेथील सौंदर्य आणि राज्याच्या विलक्षण जैवविविधतेचे कौतुक केले. ऑर्किडेरियमच्या या भेटीचे वर्णन पंतप्रधानांनी एक मंत्रमुग्ध करणारा अनुभव असल्याचे म्हटले आहे. निसर्ग संवर्धनाचे असे समर्पित प्रयत्न हे मानवाचे निसर्गाशी असलेले घट्ट नाते दर्शवतात, हे उपक्रम नागरिकांना निसर्ग संरक्षण आणि शाश्वत जीवनशैलीचा अंगीकार करण्यासाठी प्रेरणा देणारे ठरतील, असे त्यांनी नमूद केले.पंतप्रधान 27-28 एप्रिल रोजी सिक्किम दौऱ्यावर
April 26th, 03:47 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 27-28 एप्रिल 2026 रोजी सिक्कीमला भेट देतील. 27 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता त्यांचे गंगटोक इथं आगमन होणार आहे. 28 एप्रिल रोजी साधारण सकाळी 9.30 वाजता पंतप्रधान गंगटोकमधील ऑर्किडेरियम येथे भेट देणार आहेत. राज्याच्या पर्यावरणीय आणि पुष्पवारसाचे दर्शन घडवण्यासाठी 'स्वर्णजयंती मैत्री मंजरी पार्क' चा अत्याधुनिक आणि जागतिक दर्जाचे ऑर्किड अनुभव केंद्र म्हणून विकास करण्यात आला आहे.