Our guiding spirit is - Grow More, Achieve More: PM Modi at the community programme in Melbourne, Australia
July 09th, 03:22 pm
PM Modi and Australian PM Anthony Albanese participated in a community programme of the Indian diaspora in Melbourne. In his address, PM Modi elaborated on the rapid progress taking place in India and expressed appreciation for the contribution of the Indian diaspora in Australia to the bilateral relationship, describing them as a living bridge between the two countries.पंतप्रधानांनी ऑस्ट्रेलियातील भारतीय समुदायाला केले संबोधित
July 09th, 03:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मेलबर्नमधील मार्व्हल स्टेडियमवर ऑस्ट्रेलियातील भारतीय समुदायाच्या मोठ्या मेळाव्याला संबोधित केले. विशेष आदराची भावना दर्शवत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज हे देखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते.प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
April 27th, 11:30 am
माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार. आज मी तुमच्याशी 'मन की बात' मधून संवाद साधत आहे, मात्र माझे मन अतिशय व्यथित आहे. 22 एप्रिल रोजी पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशातील प्रत्येक नागरिक दुःखी झाला आहे. शोकाकुल कुटुंबांप्रति प्रत्येक भारतीयाच्या मनात सहानुभूती आहे. भले ते कुठल्याही राज्यातील असो, कोणतीही भाषा बोलणारे असो, मात्र या हल्ल्यात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांचे दुःख त्यांना जाणवत आहे. मला जाणीव आहे, दहशतवादी हल्ल्याची छायाचित्रं पाहून प्रत्येक भारतीयाचे रक्त खवळलं आहे. पहलगाममधील या हल्ल्यातून दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांची उद्विग्नता दिसून येते, त्यांचा भेकडपणा दिसून येतो. काश्मीरमध्ये पुन्हा एकदा शांतता नांदत होती, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये चैतन्य होते, पायाभूत सुविधांच्या निर्मितीला गती मिळाली होती, लोकशाही मजबूत होत होती, पर्यटकांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली होती, लोकांचे उत्पन्न वाढत होते, युवकांसाठी नवीन संधी निर्माण होत होत्या. मात्र देशाच्या शत्रूंना हे पसंत नव्हतं. दहशतवादी आणि त्यांचे आश्रयदाते यांना काश्मीर पुन्हा उद्ध्वस्त व्हावं असं वाटत होतं आणि म्हणूनच एवढा मोठा कट रचण्यात आला. दहशतवादाविरोधातल्या या युद्धात देशाची एकता, 140 कोटी भारतीयांची एकजूट ही आपली सर्वात मोठी ताकद आहे. हीच एकता दहशतवादाविरुद्ध आपल्या निर्णायक लढाईचा आधार आहे. देशासमोर उद्भवलेल्या या आव्हानाचा सामना करण्यासाठी आपल्याला आपले संकल्प अधिक बळकट करायचे आहेत. एक राष्ट्र म्हणून आपल्याला प्रबळ इच्छाशक्ती दाखवून द्यावी लागेल. आज जग पाहत आहे या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश एका सुरात बोलत आहे.महाराष्ट्रात नागपूर येथील माधव नेत्रालय प्रिमियम सेंटरच्या भूमिपूजन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
March 30th, 11:53 am
गुढी पाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना अतिशय मनःपूर्वक शुभेच्छा! कार्यक्रमाला उपस्थित असलेले सरसंघचालक डॉ. मोहन भागवत जी, स्वामी गोविंद गिरी महाराज जी, स्वामी अवधेशानंद गिरी महाराज जी, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, केंद्रिय मंत्रीमंडळातले माझे सहकारी नितीन गडकरी जी, डॉ. अविनाशचंद्र अग्निहोत्री जी, अन्य मान्यवर आणि इथे उपस्थित असलेल्या सर्व वरीष्ठ सहकाऱ्यांनो, आज या राष्ट्र यज्ञाच्या पवित्र कार्यक्रमात सहभागी होण्याचे भाग्य मला लाभले आहे. आजचा चैत्र शुद्ध प्रतिपदेचा हा दिवसही खास आहे. आजपासून नवरात्र सुरू होत आहे. देशाच्या निरनिराळ्या भागात आज गुढी पाडवा, उगादी आणि नवरेह सण साजरा केला जात आहे. आज भगवान झुलेलाल आणि गुरू अंगद देव यांचा प्रकटदिन देखील आहे. आमचे प्रेरणास्थान, परमपूज्य डॉक्टरसाहेबांचीही आज जयंती आहे आणि याच वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गौरवशाली परंपरेला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. आजच्या दिवशी स्मृती मंदिराला भेट देऊन पूज्य डॉक्टर साहेब आणि गुरुजी यांना आदरांजली अर्पण करता आली, हे मी माझं भाग्य समजतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील नागपूर येथे माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरची केली पायाभरणी
March 30th, 11:52 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रातील नागपूर येथे माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरची पायाभरणी केली. उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी पवित्र नवरात्रोत्सवाचा प्रारंभ म्हणजेच चैत्र शुक्ल प्रतिपदेचे महत्त्व अधोरेखित केले. देशभरात आज गुढी पाडवा, उगादी आणि नवरेह असे सण साजरे केले जात असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. याच दिवसाला जोडून येणाऱ्या भगवान झुलेलाल आणि गुरु अंगद देव यांच्या जयंतीचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले. हा दिवस प्रेरणादायी डॉ. के. बी. हेडगेवार यांची जयंती तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) गौरवशाली प्रवासाच्या शताब्दी वर्षाची आठवण करून देणारा असल्याचेही त्यांनी सांगितले. आजच्या महत्त्वपूर्ण दिवशी डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींना आदरांजली वाहण्यासाठी स्मृती मंदिराला भेट देणे हा आपल्यासाठी सन्मान असल्याचे त्यांनी सांगितले.भूकंप आपत्तीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी म्यानमारचे सिनियर जनरल महामहिम मिन ओंग ह्लाइंग यांच्याशी संवाद साधला
March 29th, 01:41 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूकंप आपत्तीच्या पार्श्वभूमीवर म्यानमारचे सिनियर जनरल महामहिम मिन ओंग ह्लाइंग यांच्याशी आज संवाद साधला. या कसोटीच्या काळात म्यानमारबरोबर भारत एक जवळचा मित्र व शेजारधर्माच्या भावनेने उभा असून मदतीसाठी वचनबद्ध असल्याचे पंतप्रधानांनी ठामपणे सांगितले. या आपत्तीच्या निवारणासाठी भारताने 'ऑपरेशन ब्रह्म' सुरु केले असून त्यातून म्यानमारमधील भूकंपाने प्रभावित क्षेत्रांमध्ये त्वरित मदत पोचवण्याचे काम सुरु झाले आहे.