युरोपीय उद्योगांच्या गोलमेज बैठकीत पंतप्रधानांचे संबोधन
May 18th, 05:00 am
सर्वात आधी, मला या गोलमेज बैठकीत आमंत्रित केल्याबद्दल मी पंतप्रधान क्रिस्टरसन यांचे मनापासून आभार मानतो. ही बैठक गॉथेनबर्ग मध्ये आयोजित केली जात आहे, याचा मला आनंद आहे. हे एक असे शहर आहे जे नवोन्मेषासोबतच युरोपच्या उत्पादक वृत्तीचे एक जिवंत प्रतीक आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युरोपीय उद्योगांच्या गोलमेज बैठकीला केले संबोधित
May 17th, 12:12 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 मे 2026 रोजी गॉथेनबर्ग येथे 'युरोपियन उद्योगांच्या गोलमेज बैठकीला (ERT) संबोधित केले. व्हॉल्वो समूहाने (Volvo Group) आयोजित केलेल्या या संवाद सत्रात स्वीडनचे पंतप्रधान महामहीम उल्फ क्रिस्टरसन, युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा महामहीम उर्सुला वॉन डेर लेयेन, युरोपियन उद्योगांचे वरिष्ठ नेते आणि आघाडीच्या युरोपियन आणि भारतीय कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.पंतप्रधानांनी देशाला उद्देशून केलेले भाषण
September 21st, 06:09 pm
उद्यापासून शक्तीच्या उपासनेचा उत्सव अर्थात नवरात्र सुरू होत आहे. तुम्हा सर्वांना अनेकानेक शुभेच्छा! नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून आपला देश आत्मनिर्भर भारत मोहिमेच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे आणि मोठे पाऊल टाकत आहे. उद्या, २२ सप्टेंबर रोजी, नवरात्रीच्या पहिल्या दिवशीचा सूर्य उगवताच पुढील टप्प्यातल्या जीएसटी सुधारणा लागू होतील. एका अर्थाने उद्यापासून देशात जीएसटी बचत महोत्सवाला सुरुवात होत आहे. या जीएसटी बचत महोत्सवामुळे तुमची बचत वाढेल आणि तुम्ही तुम्हाला हव्या असलेल्या वस्तू अधिक सहजपणे खरेदी करू शकाल. आपल्या देशातील गरीब, मध्यमवर्गीय, नव-मध्यमवर्गीय, युवा, शेतकरी, महिला, दुकानदार, व्यापारी, उद्योजक या सर्वांना या बचत महोत्सवाचा मोठा फायदा होईल. याचा अर्थ असा की या उत्सवाच्या काळात प्रत्येकाला काहीतरी गोड खाण्यास मिळेल आणि देशातील प्रत्येक कुटुंबात आनंद वाढेल. पुढील टप्प्यातल्या या जीएसटी सुधारणा आणि बचत महोत्सवाबद्दल मी देशभरातील कोट्यवधी कुटुंबांना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांचे अभिनंदन करतो. या सुधारणांमुळे भारताच्या विकासगाथेला वेग लाभेल, , व्यवसाय सुलभ होईल, गुंतवणूक अधिक आकर्षक होईल आणि विकासाच्या शर्यतीत प्रत्येक राज्य समान भागीदार होईल.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला केले संबोधित
September 21st, 05:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे देशाला संबोधित केले. शक्तीच्या उपासनेचे पर्व असलेल्या नवरात्रीच्या प्रारंभानिमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देत ते म्हणाले की, नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासूनच देश आत्मनिर्भर भारत अभियानासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत आहे. 22 सप्टेंबर रोजी सूर्योदयाबरोबरच देशात नव्या पिढीच्या जीएसटी सुधारणांची अंमलबजावणी होईल. पंतप्रधानांनी अधोरेखित केले की एका प्रकारे संपूर्ण भारतात जीएसटी बचत उत्सवाला सुरुवात होत आहे. या उत्सवामुळे बचत वाढेल आणि लोकांना त्यांच्या पसंतीच्या वस्तू खरेदी करणे सुलभ होईल यावर त्यांनी भर दिला. या बचत महोत्सवाचे लाभ देशातील गरीब, मध्यमवर्गीय, नवमध्यमवर्गीय, युवक , शेतकरी, महिला, दुकानदार, व्यापारी आणि उद्योजकांपर्यंत पोहोचतील असे मोदी यांनी नमूद केले. या उत्सवाच्या काळात प्रत्येक घरामध्ये आनंद आणि गोडवा वाढेल असे त्यांनी नमूद केले. पंतप्रधानांनी देशभरातील कोट्यवधी कुटुंबांना नव्या पिढीच्या जीएसटी सुधारणा आणि जीएसटी बचत महोत्सवासाठी शुभेच्छा दिल्या. या सुधारणा भारताच्या विकासगाथेला गती देतील, व्यवसाय सुलभ करतील, गुंतवणूक अधिक आकर्षक बनवतील आणि विकासाच्या शर्यतीत प्रत्येक राज्याला समान भागीदार बनवेल असे त्यांनी अधोरेखित केले.भारत -जपान आर्थिक मंचाच्या बैठकीदरम्यान पंतप्रधानांनी केलेले भाषण
August 29th, 11:20 am
मी तुमच्यापैकी अनेकांना वैयक्तिकरित्या ओळखतो. गुजरातमधील माझ्या मुख्यमंत्री काळात तसेच दिल्लीला आल्यानंतरच्या काळात भेटलो आहे. तुमच्यापैकी अनेकांशी माझे निकटचे संबंध आहेत. आज तुम्हाला सर्वांना भेटण्याची संधी मिळाली याचा मला खूप आनंद झाला आहे.भारत-जपान आर्थिक मंचाच्या बैठकीत पंतप्रधान सहभागी
August 29th, 11:02 am
आपल्या भाषणात पंतप्रधानांनी भारत-जपान विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीच्या यशावर, विशेषत: गुंतवणूक, वस्तुनिर्माण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्यावर प्रकाश टाकला. जपानी कंपन्यांना भारतात आपला व्यवसाय आणखी वाढवण्यासाठी आमंत्रित करताना, त्यांनी नमूद केले की, भारताच्या विकासगाथेने त्यांच्यासाठी उत्कृष्ट संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. सध्याच्या अशांत जागतिक आर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, विश्वासू मित्रांमधील आर्थिक भागीदारी अधिक दृढ करणे अधिक प्रासंगिक असल्याचे ते म्हणाले. राजकीय स्थैर्य, धोरणात्मक अंदाज, सुधारणांप्रति बांधिलकी आणि व्यवसाय सुलभतेच्या प्रयत्नांमुळे भारतीय बाजारपेठेतील गुंतवणूकदारांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण केला असून, जागतिक संस्थांनी भारताच्या पतमानांकनात नुकत्याच केलेल्या सुधारणेत ते योग्यरित्या प्रतिबिंबित होत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सायप्रसच्या अध्यक्षांनी सायप्रस आणि भारतातील प्रमुख उद्योजकांशी साधला संवाद
June 16th, 02:17 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलाइड्स यांनी आज लिमासोल येथे झालेल्या गोलमेज परिषदेत सायप्रस आणि भारतातील आघाडीच्या उद्योजकांशी संवाद साधला. या बैठकीला बँकिंग, वित्तीय संस्था, उत्पादक, संरक्षण, दळणवळण, नौवहन, तंत्रज्ञान, नवोन्मेष, डिजिटल तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, माहिती तंत्रज्ञान सेवा, पर्यटन आणि वाहतूक अशा विभिन्न क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते.सायप्रस येथे भारत-सायप्रस व्यापार गोलमेज बैठकीतील पंतप्रधानांचे भाषण
June 15th, 11:10 pm
सर्वप्रथम मी राष्ट्राध्यक्षांचे आभार मानू इच्छितो कारण आज ते स्वतः विमानतळावर माझ्या स्वागतासाठी आले होते. त्यांनी व्यापार क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्तींसोबत इतकी भव्य गोलमेज बैठक आयोजित केली, त्याबद्दल देखील मी खूप आभारी आहे. त्यांनी माझ्याप्रती तसेच आपल्या भागीदारीप्रती जे सकारात्मक विचार व्यक्त केले त्याबद्दल देखील मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो.India is deeply motivated by Sardar Patel's vision and unwavering commitment to our nation: PM Modi
October 31st, 07:31 am
PM Modi today participated in the Rashtriya Ekta Diwas celebrations at the Statue of Unity in Kevadia, Gujarat. The Prime Minister underlined that this year's Ekta Diwas is more special as Sardar Patel's 150th birth anniversary year is starting from today. For the next 2 years, the country will celebrate Sardar Patel's 150th birth anniversary. This is the country's tribute to his extraordinary contribution to India.PM Modi participates in Rashtriya Ekta Diwas programme
October 31st, 07:30 am
PM Modi today participated in the Rashtriya Ekta Diwas celebrations at the Statue of Unity in Kevadia, Gujarat. The Prime Minister underlined that this year's Ekta Diwas is more special as Sardar Patel's 150th birth anniversary year is starting from today. For the next 2 years, the country will celebrate Sardar Patel's 150th birth anniversary. This is the country's tribute to his extraordinary contribution to India.वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) अंमलबजावणीला 5 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधानांनी केली प्रशंसा
July 01st, 02:36 pm
वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) अंमलबजावणीला 5 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधानांनी प्रशंसा केली आहे. ते म्हणाले की, ही एक मोठी कर सुधारणा आहे, ज्यामुळे ‘व्यवसाय सुलभता' वाढली आणि ‘एक देश, एक कर’ ही संकल्पना पूर्णत्वाला नेली.For us, MSME means- Maximum Support to Micro Small and Medium Enterprises: PM Modi
June 30th, 10:31 am
PM Modi participated in the ‘Udyami Bharat’ programme. To strengthen the MSME sector, in the last eight years, the Prime Minister said, the government has increased the budget allocation by more than 650%. “For us, MSME means - Maximum Support to Micro Small and Medium Enterprises”, the Prime Minister stressed.PM participates in ‘Udyami Bharat’ programme
June 30th, 10:30 am
PM Modi participated in the ‘Udyami Bharat’ programme. To strengthen the MSME sector, in the last eight years, the Prime Minister said, the government has increased the budget allocation by more than 650%. “For us, MSME means - Maximum Support to Micro Small and Medium Enterprises”, the Prime Minister stressed.लखनौमध्ये यूपी गुंतवणूकदार शिखरपरिषदेच्या भूमिपूजन समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
June 03rd, 10:35 am
उत्तर प्रदेशचे यशस्वी मुख्यमंत्री श्रीयुत योगी आदित्यनाथ जी, लखनौचे खासदार आणि भारत सरकारमधील आमचे वरिष्ठ सहकारी श्रीयुत राजनाथ सिंह जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे इतर सहकारीवर्ग, यूपीचे उप-मुख्यमंत्री, राज्य सरकारमधील मंत्रीगण, विधानसभा आणि विधान परिषदेचे सभापती महोदय, येथे उपस्थित उद्योग जगतातील सर्व सहकारी, अन्य मान्यवर, स्त्री-पुरुषहो!PM attends the Ground Breaking Ceremony @3.0 of the UP Investors Summit at Lucknow
June 03rd, 10:33 am
PM Modi attended Ground Breaking Ceremony @3.0 of UP Investors Summit at Lucknow. “Only our democratic India has the power to meet the parameters of a trustworthy partner that the world is looking for today. Today the world is looking at India's potential as well as appreciating India's performance”, he said.जैन आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेच्या -जीतो कनेक्ट 2022 शिखर परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
May 06th, 02:08 pm
आपला भविष्यकालीन मार्ग आणि उद्दीष्ट दोन्ही स्पष्ट आहेत. आत्मनिर्भर भारत हाच आपला मार्ग आहे आणि हाच आपला संकल्पही आहे आणि हा काही फक्त कोणत्या सरकारचा नाही तर 130 कोटी देशवासियांचा आहे. गेल्या काही वर्षात आम्ही यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली. वातावरण सकारात्मक राखण्यासाठी सातत्याने परिश्रम केले आहेत. देशात निर्माण होत असलेल्या योग्य वातावरणाचा उपयोग करून संकल्प सिद्धीस नेण्याची जबाबदारी आता आपल्यासारख्या माझ्या साथीदारांवर आहे JITO सदस्यांवर आहे. आपण जिथे कुठे जाल, ज्याला भेटाल त्याच्याशी आपल्या दिवसातील अर्धा वेळ येणाऱ्या दिवसांबद्दल चर्चा कराल अशा स्वभावाचे आपण आहात. गेलेल्या परिस्थितीचा विचार करत त्यावर वेळ काढणारे लोक आपण नाही. भविष्याकडे लक्ष देणाऱ्या लोकांपैकी आपण आहात आणि मी आपल्यासारख्यांमध्येच मोठा झालो आहे, त्यामुळे आपला स्वभाव काय आहे हे मला माहिती आहे.जीतो कनेक्ट 2022 च्या उद्घाटन सत्राला पंतप्रधानांनी केले संबोधित
May 06th, 10:17 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जैन आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेच्या 'जीतो कनेक्ट 2022' च्या उद्घाटन सत्राला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले.‘खाजगीकरण आणि मालमत्ता रोखीकरण’ या विषयावर आयोजित वेबिनारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
February 24th, 05:48 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डीआयपीएएममध्ये अर्थसंकल्पातील तरतुदींच्या प्रभावी अंमलबजावणी संदर्भातील वेबिनारला आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित केले.डीआयपीएएममध्ये अर्थसंकल्पातील तरतुदींच्या प्रभावी अंमलबजावणी संदर्भातील वेबिनारला पंतप्रधानांनी केले संबोधित
February 24th, 05:42 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डीआयपीएएममध्ये अर्थसंकल्पातील तरतुदींच्या प्रभावी अंमलबजावणी संदर्भातील वेबिनारला आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित केले.देशाच्या ७४ व्या स्वातंत्र्यदिनी दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केलेले संबोधन
August 15th, 02:49 pm
स्वातंत्र्यदिनाच्या या पवित्र प्रसंगी सर्व देशवासियांचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. आज आपण स्वतंत्र भारतात श्वास घेत आहोत, त्यामागे भारतमातेच्या लाखो मुलामुलींचे त्याग, बलिदान, आणि भारतमातेला स्वतंत्र बनवण्याप्रती त्यांचा संकल्प, अशा सर्व आपल्या स्वातंत्र्य सैनिकांचे, स्वातंत्र्यवीरांचे, नरवीरांना, शहीदांना वंदन करण्याचे हे पर्व आहे. आपले सैन्यातील शूर जवान, निमलष्करी जवान, पोलीस, सुरक्षा दलाशी संबंधित प्रत्येकजण, भारतमातेच्या रक्षणात सामान्य माणसांच्या सुरक्षेसाठी काम करत असतात, आज त्या सर्वांना हृदयपूर्वक, आदरपूर्वक स्मरण करण्याचा, त्यांच्या महान त्याग तपस्येला वंदन करण्याचे पर्व आहे.