फ्रान्समधील इव्हियन येथे आयोजित G7 शिखर परिषदेत "सर्वांसाठी संतुलित, सामायिक आणि शाश्वत आर्थिक विकासाला चालना देणे" या विषयावरील सत्राला पंतप्रधानांनी केले संबोधित

June 18th, 05:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फ्रान्समधील इव्हियन येथे G7 (जी-7) शिखर परिषदेत सर्वांसाठी संतुलित, सामायिक आणि शाश्वत आर्थिक विकासाला चालना देणे या विषयावरील सत्राला संबोधित केले.

India’s growth story is a story of inclusion, scale and democratic empowerment for all humanity: PM Modi at G7 Summit Outreach Session

June 17th, 06:07 pm

During the G7 Summit outreach session in Evian, France, PM Modi highlighted India's progress over the past 12 years under the principle of “Sabka Saath, Sabka Vikas, Sabka Vishwas, Sabka Prayas”. He proposed combining the capital of the G7, India’s talent and the ownership of Global South countries to create the International Mobilisation Partnership for Accelerating Connectivity and Trade (IMPACT), with the objective of building corridors that connect trade, technology, energy and opportunity.

जी 20 पर्यटन मंत्र्यांच्या बैठकीदरम्यान पंतप्रधानांचा व्हिडिओ संदेश

June 21st, 03:00 pm

अतुल्य भारतात मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो ! पर्यटन मंत्री म्हणून, जागतिक स्तरावर दोन ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त किमतीचे क्षेत्र हाताळताना, तुम्हाला स्वतः पर्यटक बनण्याची संधी मिळणे दुर्मिळ आहे. पण, तुम्ही गोव्यात आहात - भारतातील एक प्रमुख पर्यटन आकर्षण. म्हणूनच, मी तुम्हाला तुमच्या गंभीर चर्चेतून थोडा वेळ काढून गोव्याचे नैसर्गिक सौंदर्य आणि आध्यात्मिक बाजू पाहण्याची विनंती करतो !

जी 20 पर्यटन मंत्र्यांच्या बैठकीला पंतप्रधानांनी केले संबोधित

June 21st, 02:29 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गोव्यात आयोजित जी 20 पर्यटन मंत्र्यांच्या बैठकीला चित्रफितीच्या माध्यमातून संदेशाद्वारे संबोधित केले.

वाराणसी इथल्या रुद्राक्ष संमेलन सभागृहात ‘वैश्विक क्षयरोग शिखर परिषदेत’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

March 24th, 10:20 am

उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री श्रीमान योगी आदित्यनाथ जी, केंद्रीय आरोग्य मंत्री श्री मनसुख मांडविया जी, उपमुख्‍यमंत्री श्री बृजेश पाठक जी, विविध देशांचे आरोग्य मंत्री, जागतिक आरोग्य संघटनेचे प्रादेशिक संचालक, उपस्थित सर्व मान्यवर तसेच ‘स्टॉप टीबी पार्टनरशिप’ सह विविध संस्थांचे प्रतिनिधी, बंधू आणि भगिनींनो..

उत्तर प्रदेशात वाराणसी येथे वन वर्ल्ड टीबी समिटमध्ये पंतप्रधानांचे संबोधन

March 24th, 10:15 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी येथे रुद्राक्ष कन्वेन्शन सेंटरमध्ये वन वर्ल्ड टीबी समिट या शिखर परिषदेला संबोधित केले. यावेळी पंतप्रधानांनी क्षयरोग प्रतिबंधक अल्पकालीन उपचार आणि क्षयासाठी कुटुंब केंद्रित मॉडेलला देशभरात राबवणाऱ्या अधिकृत क्षयमुक्त पंचायत सह विविध उपक्रमांचा देखील त्यांनी प्रारंभ केला आणि भारताच्या वार्षिक क्षयरोग अहवाल 2023 चे प्रकाशन केले. पंतप्रधानांनी राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र आणि उच्च प्रतिबंधित प्रयोगशाळेची पायाभरणी केली आणि वाराणसीमधील महानगरी सार्वजनिक आरोग्य देखरेख केंद्राचे उद्घाटन केले. क्षयरोग संपवण्यासाठी केलेल्या प्रगतीबद्दल निवडक राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि जिल्ह्यांना पंतप्रधानांनी पुरस्कार देऊन सन्मानित केले. राज्य/ केंद्रशासित प्रदेशांच्या पातळीवर कर्नाटक आणि जम्मू काश्मीर या पुरस्कारांचे मानकरी ठरले आणि जिल्हा पातळीवर निलगिरी, पुलवामा आणि अनंतनाग जिल्ह्यांना पुरस्कार प्राप्त झाला.

नवी दिल्ली येथे आयोजित जागतिक भरडधान्य (श्री अन्न) परिषदेच्या उद्घाटनाप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

March 18th, 02:43 pm

आजच्या या परिषदेत उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील माझे सहकारी नरेंद्र तोमरजी, मनसुख मांडवीयाजी, पियुष गोयलजी, कैलास चौधरीजी! विदेशातून आलेले काही मंत्रीगण, गयाना, मालदीव, मॉरिशस श्रीलंका, सुदान, सूरिनाम आणि गाम्बियाचे सर्व माननीय मंत्रीगण, जगातील वेगवेगळ्या भागातून शेती पोषण आणि आरोग्याच्या क्षेत्रात काम करणारे वैज्ञानिक आणि तज्ञ, वेगवेगळे आणि FPO’s आणि Starts-Ups मधील युवा मित्र देशातील कानाकोपऱ्यातून इथे जोडले गेलेले लाखो शेतकरी, इतर मान्यवर आणि आपणं सर्वजण.

पंतप्रधानांनी केले जागतिक भरडधान्य (श्री अन्न) परिषदेचे उद्घाटन

March 18th, 11:15 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जागतिक भरडधान्य श्री अन्न परिषदेचे उद्घाटन केले. नवी दिल्लीत पुसा येथे सुब्रमण्यम हॉल, एन ए एस सी कॉम्प्लेक्स, आय ए आर आय कॅम्पस येथे ही परिषद आयोजित करण्यात आली आहे.

जी– 20 देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीप्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन

March 02nd, 09:38 am

जी–20 देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. भारताने आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळासाठी ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ ही संकल्पना निवडली आहे. उद्देश आणि कृती या दोन्हींसाठी आपल्यातल्या एकवाक्यतेची गरज ही संकल्पना अधोरेखित करते. सामायिक आणि ठोस उद्दिष्टे साध्य करण्यासाठी एकत्र येण्याची ही भावना आजच्या बैठकीत प्रतीत होईल अशी आशा मी करतो.

जी-20 च्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित

March 02nd, 09:37 am

जी-20 समूह सदस्यांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केले.

भारताच्या अध्यक्षतेखालील G20 देशातील अर्थमंत्री आणि सेंट्रल बँक गव्हर्नर यांच्या पहिल्या बैठकीदरम्यान पंतप्रधानांच्या व्हिडिओ संदेशाचा मजकूर

February 24th, 09:25 am

मी जी 20 अर्थमंत्र्यांचे आणि सेंट्रल बँकेच्या गव्हर्नरांचे भारतात स्वागत करतो. तुमची बैठक ही भारताच्या जी 20 अध्यक्षतेखालील मंत्री-स्तरीय संवादाची पहिलीच बैठक आहे. फलदायी बैठकीसाठी तुम्हाला माझ्या शुभेच्छा देत असताना तुमच्यासमोर असलेल्या आव्हानांची मला जाणीव आहे. जग गंभीर आर्थिक अडचणींना तोंड देत असताना तुम्ही जागतिक वित्त आणि अर्थव्यवस्थेच्या नेतृत्वाचे प्रतिनिधित्व करता. कोविड साथीच्या रोगाने जागतिक अर्थव्यवस्थेला या शतकात न भूतो न भविष्यती असा धक्का दिला आहे. अनेक देश, विशेषत: विकसनशील अर्थव्यवस्था, अजूनही त्याच्या परिणामांचा सामना करत आहेत. आपण जगाच्या विविध भागांमध्ये वाढत्या भौगोलिक - राजकीय तणावाचे साक्षीदार आहोत. जागतिक पुरवठा साखळीत अनेक व्यत्यय येत आहेत. दरवाढीमुळे अनेक समुदाय त्रस्त आहेत. आणि, अन्न आणि ऊर्जा सुरक्षा ही जगभरातील प्रमुख चिंता बनली आहे. अनेक देशांची आर्थिक व्यवहार्यता देखील अनिश्चित कर्ज पातळीमुळे धोक्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांवरील विश्वास देखील उडाला आहे. ते स्वतःमध्ये सुधारणा करण्यात खुपच धीमे आहेत, काही अंशी हे देखील याचे कारण आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत स्थिरता, आत्मविश्वास आणि वृद्धी परत आणणे हे आता जगातील आघाडीच्या अर्थव्यवस्था आणि चलन प्रणालींचे संरक्षक असलेल्या तुमच्यावर अवलंबून आहे. हे काही सोपे काम नाही.

भारताच्या जी-20 अध्यक्षतेखालील अर्थमंत्री आणि सेंट्रल बँकेच्या गव्हर्नरांच्या पहिल्या बैठकीला पंतप्रधानांनी केले संबोधित.

February 24th, 09:15 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ संदेशाद्वारे भारताच्या जी 20 अध्यक्षपदाखालील देशातील अर्थमंत्री आणि सेंट्रल बँक गव्हर्नर यांच्या पहिल्या बैठकीला संबोधित केले.

नवी दिल्ली येथे इकॉनॉमिक टाइम्स ग्लोबल बिझनेस समिट 2023 मध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण

February 17th, 08:59 pm

टाइम्स समूहाचे समीर जैन जी, विनीत जैन जी, ग्लोबल बिझनेस समिट साठी आलेले सर्व मान्यवर, उद्योग क्षेत्रातील मित्र, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणतज्ज्ञ, माध्यम क्षेत्रातील लोक, इतर मान्यवर, स्त्री आणि पुरुषगण,

पंतप्रधानांनी दिल्ली येथे इकॉनॉमिक टाइम्स ग्लोबल बिझनेस समिटला केले संबोधित

February 17th, 08:02 pm

उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधानांनी नमूद केले की तीन वर्षांपूर्वी इकॉनॉमिक टाइम्स ग्लोबल बिझनेस समिटमध्ये जेव्हा ते शेवटचे सहभागी झाले होते, त्यानंतरच्या काळात अनेक बदल झाले आहेत. त्यांनी आठवण करून दिली की शेवटच्या शिखर परिषदेनंतर अवघ्या तीन दिवसांतच जागतिक आरोग्य संघटनेने कोविड हा रोग महामारी असल्याचे घोषित केले होते आणि त्यामुळे जागतिक स्तरावर आणि भारतात जलद गतीने मोठे बदल झाले.

व्हॉईस ऑफ ग्लोबल साउथ समिट 2023 च्या उद्घाटन सत्रातील पंतप्रधानांचे संबोधन

January 12th, 10:53 am

जगातील दक्षिणेकडील देशांचे नेते, नमस्कार! या शिखर परिषदेत तुमचे स्वागत करताना मला आनंद होत आहे. जगाच्या विविध भागातून आमच्या सोबत जोडले गेल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. नवीन वर्षाच्या पहाटेच्या रुपात आपण भेटत आहोत, ती नवीन आशा आणि नवीन ऊर्जा घेऊन येत आहे. 2023 हे वर्ष तुम्हाला आणि तुमच्या देशांना आनंदाचे तसेच परिपूर्णतेचे जावो अशा शुभेच्छा मी 1.3 अब्ज भारतीयांच्या वतीने देतो.

जी-20 शिखर परिषदेत, भारताच्या नेतृत्वासंदर्भातले बोधचिन्ह, संकल्पना आणि संकेतस्थळाचे उद्‌घाटन करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

November 08th, 07:31 pm

जी-20 हा अशा देशांचा समूह आहे, ज्याचे आर्थिक सामर्थ्य जगातील एकूण सकल उत्पादनापैकी 85 टक्के सकल उत्पादनाचे प्रतिनिधित्व करतो. जी-20 अशा 20 देशांचा समूह आहे, ज्यात जगातील 75 टक्के व्यापाराचे प्रतिनिधित्व केले जाते. जी-20 अशा 20 देशांचा समूह आहे, ज्यात जगातील दोन तृतीयांश लोकवस्ती आहे. आणि आता यावर्षी भारत या जी-20 समूहाचे नेतृत्व करणार आहे, त्याचे अध्यक्षपद भूषवणार आहे.

पंतप्रधानांनी भारताच्या जी -20 अध्यक्षपदाचे बोधचिन्ह, संकल्पना आणि संकेतस्थळाचे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केले अनावरण

November 08th, 04:29 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे भारताच्या जी -20 अध्यक्षपदाच्या बोधचिन्ह, संकल्पना आणि संकेतस्थळाचे अनावरण केले.