RJD forced Congress to surrender its CM claim at gunpoint: PM Modi in Bhagalpur, Bihar

November 06th, 12:01 pm

In the Bhagalpur rally, PM Modi criticised RJD and Congress for never understanding the value of self-reliance or Swadeshi. He reminded the people that the Congress can never erase the stain of the Bhagalpur riots. Outlining NDA’s roadmap for progress, PM Modi said the government is working to make Bihar a hub for textiles, tourism and technology.

No IIT, no IIM, no National Law University — a whole generation’s future was devoured by RJD’s leadership: PM Modi in Araria, Bihar

November 06th, 11:59 am

PM Modi addressed a large public gathering in Araria, Bihar, where people turned up in huge numbers to express their support for the NDA. Speaking with conviction, PM Modi said that the people of Bihar have already made up their minds – ‘Phir Ekbar, NDA Sarkar!’

PM Modi stirs up massive rallies with his addresses in Araria & Bhagalpur, Bihar

November 06th, 11:35 am

PM Modi addressed large public gatherings in Araria & Bhagalpur, Bihar, where people turned up in huge numbers to express their support for the NDA. Speaking with conviction, PM Modi said that the people of Bihar have already made up their minds – ‘Phir Ekbar, NDA Sarkar!’

उत्तर प्रदेशात ग्रेटर नॉयडा येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण

September 25th, 10:22 am

यूपी इंटरनॅशनल ट्रेड शोमध्ये सहभागी झालेले सर्व व्यापारी, गुंतवणूकदार, उद्योजक आणि तरुण मित्रांचे मी मनःपूर्वक स्वागत करतो. येथे 2200 पेक्षा अधिक प्रदर्शक आपल्या उत्पादनांचे आणि सेवांचे प्रदर्शन करत आहेत, याचा मला आनंद वाटत आहे. यंदाच्या ट्रेड शोचा भागीदार देश रशिया आहे. म्हणजेच, या ट्रेड शोच्या माध्यमातून आपण काळाच्या कसोटीवर पारखलेली एक भागीदारी आणखी बळकट करत आहोत. मुख्यमंत्री योगीजींना, सरकारमधील इतर सर्व सहकाऱ्यांना आणि हितधारकांना या कार्यक्रमासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील उत्तर प्रदेश आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शनाला केले संबोधित

September 25th, 10:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील उत्तर प्रदेश आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शन 2025 याचे आज उद्घाटन केले आणि उपस्थितांना संबोधित केले. या प्रसंगी बोलताना पंतप्रधानांनी उत्तर प्रदेश आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शनात सहभागी झालेल्या सर्व व्यापारी, गुंतवणूकदार, उद्योजक आणि तरुण प्रतिनिधींचे स्वागत केले.या कार्यक्रमात 2,200 हून अधिक प्रदर्शक त्यांची उत्पादने आणि सेवा प्रदर्शित करत आहेत याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. रशिया हा या व्यापार प्रदर्शनातील भागीदार देश आहे, जो काळाच्या कसोटीवर उतरलेल्या भागीदारीच्या सबलीकरणावर भर देतो, असे मोदींनी यावेळी अधोरेखित केले.या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, शासकीय अधिकारी आणि इतर भागधारकांचे अभिनंदन केले. हा दिवस पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीदिनी आला आहे,ज्यांनी राष्ट्राला अंत्योदय - म्हणजे तळागाळातील शेवटच्या व्यक्तीचा उत्कर्ष साधण्यासाठी मार्गदर्शन केले, असे पंतप्रधानांनी नमूद केले.अंत्योदय म्हणजे विकास हा गरिबातल्या गरीबापर्यंत पोहोचणे, सर्व प्रकारच्या भेदभावाचे उच्चाटन करणे, यावर पंतप्रधानांनी भर दिला आणि भारत आता जगाला सर्व समावेशक विकासाचे हेच प्रारुप असल्याचे दाखवून देत आहे,असे ते पुढे म्हणाले.

गुजरात नगर विकास उपक्रमाला 20 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त गांधीनगर मध्ये आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण

May 27th, 11:30 am

मी दोन दिवस गुजरातमध्ये आहे. काल वडोदरा, दाहोद, भुज, अहमदाबाद आणि आज सकाळी गांधीनगरला, मी जिथे जिथे गेलो तिथे असे वाटले की, देशभक्ती म्हणजे गर्जना करणारा सिंदूरिया सागर, सिंदूरिया सागराची गर्जना आणि फडकणारा तिरंगा ध्वज, लोकांच्या हृदयात मातृभूमीबद्दलचे अपार प्रेम, हे एक दृश्य होते, आणि हे फक्त गुजरातमध्येच नाही तर भारताच्या कानाकोपऱ्यात आहे. ते प्रत्येक भारतीयाच्या हृदयात आहे. शरीर कितीही निरोगी असले तरी, जर काटा टोचला तर संपूर्ण शरीर अस्वस्थ राहते. आता आपण तो काटा काढून टाकण्याचा निर्धार केला आहे.

गुजरातच्या शहरी विकासाच्या 20 वर्षांच्या यशानिमित्त आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित

May 27th, 11:09 am

गुजरातच्या शहरी विकासाच्या 20 वर्षांच्या यशानिमित्त आज गुजरातमधील गांधीनगर येथे आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. या प्रसंगी त्यांनी शहरी विकास वर्ष 2005 ची 20 वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून शहरी विकास वर्ष 2025 ला सुरुवात केली. उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले की, गेल्या दोन दिवसांपासून वडोदरा, दाहोद, भुज, अहमदाबाद आणि गांधीनगरच्या त्यांच्या भेटीदरम्यान, ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा जयघोष आणि फडकणारे तिरंगी ध्वज या माध्यमातून देशभक्तीचा उत्साह त्यांना अनुभवायला मिळाला आहे. ही दृश्य संस्मरणीय असून, ही भावना केवळ गुजरातमध्येच नाही तर भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आणि प्रत्येक भारतीयाच्या हृदयात होती, असे ते म्हणाले.भारताने दहशतवादाचा काटा काढून टाकण्याचा निर्णय घेतला आणि दृढनिश्चयाने तो पूर्ण केला , असे पंतप्रधान म्हणाले.

उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे विविध प्रकल्पांचा शिलान्यास आणि नवीन प्रकल्पांचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

April 11th, 11:00 am

व्यासपीठावर उपस्थित असलेल्या उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, ब्रजेश पाठक, उपस्थित असलेले मंत्री, इतर लोकप्रतिनिधी, बनास दुग्धालयाचे अध्यक्ष शंकरभाई चौधरी आणि येथे इतक्या मोठ्या संख्येने आशीर्वाद देण्यासाठी आलेले माझे सर्व कुटुंबिय,

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशात वाराणसी इथे 3,880 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन

April 11th, 10:49 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उत्तर प्रदेशात वाराणसी इथे 3,880 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधितही केले. काशीसोबत आपले गहीरे नाते असल्याचे ते म्हणाले. इथले लोक आपल्या कुटुंबातील सदस्यांसारखेच आहेत आणि त्यांनी आपल्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल आपण त्यांचा अत्यंत आभारी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. लोकांनी दिलेल्या याच प्रेम आणि पाठबळामुळे आपण धन्य झालो असल्याचेही त्यांनी नमूद केले. काशी आपली आहे आणि आपण काशीचे आहोत, असेही ते म्हणाले. उद्या हनुमान जन्मोत्सवाचा शुभ प्रसंग आहे, याचा उल्लेख करत काशीमध्ये संकट मोचन महाराजांच्या दर्शनाला जाण्याची संधी मिळणे, हे आपले भाग्य आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. हनुमान जन्मोत्सवापूर्वी, काशीतील नागरिक विकासाचा उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र जमले आहेत, असेही त्यांनी नमूद केले.