पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ओमान दौऱ्यादरम्यान जारी करण्यात आलेले भारत-ओमान संयुक्त निवेदन
December 18th, 05:28 pm
ओमानचे सुलतान महामहीम सुलतान हैथम बिन तारिक यांच्या निमंत्रणावरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17-18 डिसेंबर 2025 या काळात ओमानला भेट दिली. विमानतळावर संरक्षण विषयक उपपंतप्रधान महामहीम सय्यद शिहाब बिन तारिक यांनी पंतप्रधानांचे औपचारिक स्वागत केले. 18 डिसेंबर 2025 ला बराका पॅलेस इथे महामहीम सुलतान हैथम बिन तारिक यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले.