Our united voice for peace and dialogue should resonate across the world: PM Modi in Rajya Sabha on West Asia conflict
March 24th, 02:05 pm
PM Modi addressed the Rajya Sabha, presenting the Government's position on the situation arising from the ongoing conflict in West Asia. He affirmed that India opposes all attacks on civilians and on civil, energy and transport infrastructure. Invoking the spirit of cooperative federalism, he called upon all State Governments to ensure that India's robust growth trajectory is maintained regardless of the scale of the crisis.पश्चिम आशियामध्ये सध्या सुरु असलेल्या संघर्षासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत निवेदन केले
March 24th, 02:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेला संबोधित करून पश्चिम आशियामध्ये सध्या सुरु असलेल्या संघर्षामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत सरकारच्या भुमिकेची माहिती दिली. तीन आठवड्यांहून अधिक काळ सुरु असलेल्या या युद्धामुळे गंभीर जागतिक उर्जा संकट निर्माण झाले असून भारतासाठी देखील अत्यंत चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे असे नमूद करत पंतप्रधान मोदी यांनी हा संघर्ष भारताच्या व्यापारी मार्गांमध्ये व्यत्यय निर्माण करत असून पेट्रोल, डीझेल,वायू आणि खतांसारख्या अत्यावश्यक बाबींच्या नेहमीच्या पुरवठ्यावर त्याचा मोठा प्रभाव पडत आहे याकडे लक्ष वेधले. आखाती देशांमध्ये स्थायिक झालेल्या आणि तेथे काम करणाऱ्या सुमारे एक कोटी भारतीयांची सुरक्षितता आणि उपजीविका हा मोठ्या चिंतेचा विषय आहे असे निरीक्षण नोंदवत पंतप्रधानांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकलेल्या जहाजांवर मोठ्या संख्येने असलेल्या भारतीय कर्मचारीवर्गाच्या प्रश्नाकडे देखील सर्वांचे लक्ष वेधले. “अशा बिकट परिस्थितीत, भारतीय संसदेच्या या सन्माननीय वरिष्ठ सभागृहातून शांतता आणि संवादाचा एकमुखी आवाज संपूर्ण जगात पोहोचणे अत्यावश्यक आहे,” असे पंतप्रधान म्हणाले.पंतप्रधानांचे एनएक्सटी शिखर परिषदेतील भाषण
March 12th, 10:47 pm
आजचा हा 12 मार्चचा दिवस ऐतिहासिक आहे. 12 मार्च 1930 रोजी महात्मा गांधींनी साबरमती इथून दांडी यात्रा सुरू केली होती. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातला हा एक निर्णायक टप्पा होता. या यात्रेमुळे देशभरातील लोक एका ध्येयाने एकत्र आले, भारताला स्वतंत्र करण्याचे ध्येय! आज या ऐतिहासिक यात्रेला जवळपास 100 वर्ष होत आली असताना आपण पुन्हा एक नवी यात्रा सुरू केली आहे; ती म्हणजे विकसित भारत यात्रा! विकसित भारत हे आपल्या सर्वांचेच ध्येय आहे. हे ध्येय साध्य करण्यामध्ये अशा परिषदांमधून झालेल्या विचारमंथनातील निष्कर्ष खूप उपयोगी ठरतात. मला एनएक्सटी शिखर परिषदेसाठी आमंत्रित केल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. इथे देशभरातले तसेच जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेले बरेच मित्र उपस्थित आहेत. त्यातल्या काही जणांशी माझी जुनी ओळख आहे. मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एन एक्स टी शिखर परिषदेला केले संबोधित
March 12th, 08:30 pm
पंतप्रधानांनी आज आयटीव्ही नेटवर्कच्या एनएक्सटी शिखर परिषदेला संबोधित केले. यावेळी त्यांनी दांडी यात्रेच्या ऐतिहासिक वर्धापनदिनाचे स्मरण केले आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्याची तुलना आजच्या विकसित भारत घडवण्याच्या प्रयत्नांशी केली. 1930 च्या दांडी यात्रेने देशाला स्वातंत्र्याकडे एकजूट केले त्याचप्रमाणे सध्याचे विकसित भारत अभियान हे 140 कोटी भारतीयांचा सामूहिक संकल्प आहे, यावर मोदी यांनी भर दिला. आज, त्या ऐतिहासिक यात्रेनंतर जवळजवळ 100 वर्षांनी आपण भारतीय पुन्हा एकदा 'विकसित भारत' साठी एका नवीन प्रवासाला निघालो आहोत, असे पंतप्रधान म्हणाले.India is now moving beyond energy security towards the mission of energy independence: PM Modi at the India Energy Week 2026
January 27th, 10:15 am
In his address at the inauguration of India Energy Week 2026, PM Modi remarked that today India is a land of immense opportunities for the energy sector. He said that the recently signed India-European Union agreement will bring immense opportunities for India and European nations. As India’s energy sector offer investment opportunities worth $500 billion, the PM called upon the global community with the message: Make in India, Innovate in India, Scale with India, Invest in India.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत ऊर्जा सप्ताह 2026 च्या उद्घाटन समारंभाला दूरदृश्य प्रणालीद्वारे केले संबोधित
January 27th, 10:08 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारत ऊर्जा सप्ताह 2026 च्या उद्घाटन समारंभाला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केले. ऊर्जा सप्ताहाच्या या नव्या आवृत्तीमध्ये सुमारे 125 देशांचे प्रतिनिधी गोव्यात उपस्थित असल्याचे त्यांनी सांगितले. ऊर्जा-सुरक्षित आणि शाश्वत भविष्यावर चर्चा करण्यासाठी ते भारतात आले असल्याचे अधोरेखित करत त्यांनी सर्व सहभागींचे स्वागत केले.पंतप्रधानांचा 18 जुलै रोजी बिहार आणि पश्चिम बंगाल राज्यांचा दौरा
July 17th, 11:04 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 जुलै रोजी बिहार आणि पश्चिम बंगाल राज्यांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. बिहारमधील मोतीहारी इथे सकाळी सुमारे 11.30 वाजता राज्यातल्या 7,200 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे भूमीपूजन, उद्घाटन आणि लोकार्पण त्यांच्या हस्ते केले जाणार आहे. या कार्यक्रमात त्यांचे भाषणही होणार आहे.पंतप्रधानांनी अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष जेव्हिअर मिली यांची घेतली भेट
July 06th, 01:48 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष महामहीम जेव्हिअर मिली यांची भेट घेतली. पंतप्रधान कासा रोझादामध्ये पोहोचले, तेव्हा राष्ट्राध्यक्ष मिली यांनी त्यांचे मन:पूर्वक स्वागत केले. काल बुएनोस आयर्समध्ये आगमनानंतर पंतप्रधानांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. ही भेट विशेष महत्त्वाची आहे, कारण 57 वर्षांनंतर अर्जेंटिनाला झालेली भारतीय पंतप्रधानांची ही पहिली द्विपक्षीय भेट आहे. भारत-अर्जेंटिना संबंधांचे हे एक महत्त्वाचे वर्ष आहे, कारण दोन्ही देश राजनैतिक संबंध स्थापनेच्या 75 वर्षांची पूर्तता साजरी करत आहेत. पंतप्रधानांनी राष्ट्राध्यक्ष मिली यांचे आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे त्यांनी केलेल्या आतिथ्याबद्दल आभार मानले.पंतप्रधानांनी अर्जेंटिनाच्या अध्यक्षांची घेतली भेट
November 20th, 08:09 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे जी 20 शिखर परिषदेच्या निमित्ताने 19 नोव्हेंबर रोजी अर्जेंटिनाचे अध्यक्ष जेवियर मिलेई,यांची भेट घेतली.पंतप्रधान 16 फेब्रुवारीला ‘विकसित भारत विकसित राजस्थान’ या कार्यक्रमाला करणार संबोधित
February 15th, 03:07 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ‘विकसित भारत विकसित राजस्थान’ या कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान 17,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन , लोकार्पण आणि पायाभरणी करणार आहेत. हे प्रकल्प रस्ते, रेल्वे, सौरऊर्जा, वीज पारेषण,पेयजल तसेच पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू यासह अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांमधील आहेत.‘भारत ऊर्जा सप्ताह 2024, गोवा’ उद्घाटन कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
February 06th, 12:00 pm
गोव्याचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई जी, गोव्याचे युवा मुख्यमंत्री प्रमोद सावंत जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, हरदीप सिंह पुरी जी, रामेश्वर तेली जी, वेगवेगळ्या देशांतून आलेले प्रतिनिधी, भगिनी आणि सद्गृहस्थ हो !पंतप्रधानांच्या हस्ते भारतीय ऊर्जा सप्ताह 2024 चे उद्घाटन
February 06th, 11:18 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गोव्यात भारत ऊर्जा सप्ताह 2024 चे उद्घाटन केले. भारतीय ऊर्जा सप्ताह 2024 हे भारतातील सर्वात मोठे आणि सर्वसमावेशक ऊर्जा प्रदर्शन आणि परिषद आहे. भारताच्या ऊर्जा संक्रमण उद्दिष्टांना चालना देण्यासाठी संपूर्ण ऊर्जा मूल्य साखळीला ही परिषद एका मंचावर आणते. पंतप्रधानांनी, जागतिक तेल आणि वायू मुख्य कार्यकारी अधिकारी आणि तज्ञांसोबत गोलमेज बैठकही घेतली.कृष्णा गोदावरी खोऱ्यातील सखोल पाण्यातून तेल उत्खननाला सुरुवात झाल्याबद्दल पंतप्रधानांकडून प्रशंसा
January 08th, 10:06 am
कृष्णा गोदावरी खोऱ्यातील (केजी-डीडब्ल्यूएन-98/2 ब्लॉक बंगालच्या उपसागर किनाऱ्याच्या भागात) सखोल पाण्यातून तेल उत्खननाला सुरुवात झाल्याबद्दल पंतप्रधानांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे.जागतिक इंधन आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातील तज्ञ आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी पंतप्रधानांनी साधला संवाद
October 20th, 09:17 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून इंधन आणि नैसर्गीक वायू क्षेत्रातील जागतिक स्तरावरील मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच तज्ञांशी संवाद साधला.