आयसीसी महिला विश्वचषक विजेत्या संघांशी पंतप्रधानांनी साधलेल्या संवादाचा मजकूर
November 06th, 10:15 am
माननीय पंतप्रधान महोदय, खूप खूप धन्यवाद. आम्हाला येथे येणे हा मोठा सन्मान आणि अभिमानाचा क्षण वाटतो. फक्त या मोहिमेबद्दल एक सांगू इच्छितो, या मुलींनी कमाल केली आहे, देशाच्या मुलींनी कमाल केली आहे. दोन वर्षांपासून मेहनत करत होत्या, सर, इतकी मेहनत की काय सांगू, प्रत्येक सराव सत्रामध्ये जोमाने खेळल्या, प्रत्येक सरावात तेवढ्याच ऊर्जेने मैदानात उतरल्या. इतकी मेहनत घेतली की आज त्या मेहनतीचं फळ मिळाले आहे.पंतप्रधानांनी आयसीसी महिला विश्वचषक 2025 च्या विजेत्या संघासोबत साधला संवाद
November 06th, 10:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत 7, लोक कल्याण मार्ग येथे आयसीसी महिला विश्वचषक 2025 च्या विजेत्या संघासोबत संवाद साधला. भारतीय संघाने रविवारी 2 नोव्हेंबर 2025 रोजी अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेच्या संघावर मात केली होती. पंतप्रधानांनी काल देव दिवाळी आणि गुरुपूरब असल्याने हा दिवस विशेष असल्याचे सांगून सर्व उपस्थितांना या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.नवी दिल्ली 7 लोक कल्याण मार्ग इथे राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिक्षकांच्या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन
September 04th, 05:35 pm
आपल्याकडे शिक्षकांप्रति नैसर्गिक आदर, सन्मानाची भावना असते आणि ते समाजाची मोठी ताकद असतात. शिक्षकांना आशीर्वाद देणे, हे अयोग्य/पाप आहे. त्यामुळे मी हे पाप करू इच्छित नाही. मी आपल्याशी जरूर संवाद साधू इच्छितो. माझ्यासाठी हा एक खूपच छान अनुभव होता की तुम्हा सगळ्यांना... खरं तर तुम्हा सगळ्यांना नाही तर तुम्हांला मला भेटणे, कारण आपल्यापैकी प्रत्येकाच्या जीवनात स्वतःची एक कहाणी असेल, त्याशिवाय इथपर्यंत पोहोचू शकला नसतात. पण इतका वेळ काढणे कठीण असते. तरीही मला तुमच्या सर्वांकडून तुमच्याबद्दल थोडंफार जाणून घेण्याची संधी मिळाली, ती नक्कीच प्रेरणादायी आहे आणि त्यासाठी आपल्या सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो. हा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणे हा शेवट असू शकत नाही. आपल्या सर्वांवर सगळ्यांचे लक्ष असेल, या पुरस्कारानंतर सर्वांचे लक्ष असेल. याचा अर्थ आपल्या सर्वांची पोहोच वाढली आहे. यापुर्वी तुमचे प्रभाव क्षेत्र किंवा कार्यक्षेत्र असेल ते या पुरस्कारानंतर वृद्धिंगत होईल.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या शिक्षकांना संबोधित केले
September 04th, 05:33 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या शिक्षकांना संबोधित केले. शिक्षक वर्गाला राष्ट्र-उभारणीतील मजबूत शक्ती संबोधत पंतप्रधान मोदी यांनी शिक्षकांना भारतीय समाजात दिल्या जात असलेल्या नैसर्गिक सन्मानाचे कौतुक केले. शिक्षकांचा गौरव करणे ही केवळ एक रीत किंवा पद्धत नसून त्यांच्या आयुष्यभराच्या समर्पणाला आणि प्रभावाला दिलेली मान्यता असते यावर त्यांनी अधिक भर दिला.79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील ठळक मुद्दे
August 15th, 03:52 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील लाल किल्ल्यावरून 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशाला संबोधित केले. त्यांचे हे भाषण 103 मिनिटांचे असून लाल किल्ल्यावरील सर्वात जास्त काळ चाललेले आणि महत्त्वाचे भाषण ठरले. या भाषणात, त्यांनी 2025 पर्यंत विकसित भारतासाठी एक महत्त्वाकांक्षी आराखडा मांडला. आत्मनिर्भरता, नावीन्यपूर्णता, आणि नागरिकांचे सक्षमीकरण यावर पंतप्रधानांनी भर दिला. एकेकाळी दुसऱ्यांवर अवलंबून असलेला देश, आज जागतिक स्तरावर आत्मविश्वासाने भरलेला, तंत्रज्ञानाने प्रगत आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनला आहे, हे त्यांनी आपल्या भाषणातून अधोरेखित केले.79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेलं भाषण
August 15th, 07:00 am
स्वातंत्र्याचे हे महापर्व, 140 कोटी संकल्पाचे पर्व आहे. स्वातंत्र्याचे हे पर्व सामूहिक सिद्धींचे, गौरवाचे पर्व आहे. आणि हृदय अपेक्षांनी भरलेले आहे. देश एकतेच्या भावनेला सातत्याने बळकटी देत आहे. 140 कोटी देशवासीय आज तिरंग्याच्या रंगात रंगून गेले आहेत. हर घर तिरंगा... भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात, मग तो वाळवंटी भाग असो, किंवा हिमालयाची शिखरे असोत, सागर किनारे असोत, किंवा दाट लोकसंख्येचे भाग, प्रत्येक भागातून एकच आवाज घुमत आहे, एकच जयघोष आहे, आपल्या प्राणांपेक्षाही प्रिय मातृभूमीचे जयगान आहे …भारतात 79 वा स्वातंत्र्यदिन साजरा
August 15th, 06:45 am
79 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित करताना घटना समिती, स्वातंत्र्यसैनिक आणि संविधान निर्मात्यांना आदरांजली वाहिली. भारत नेहमीच आपल्या शेतकरी, पशुपालक आणि मच्छिमारांच्या हिताचे रक्षण करेल याचा त्यांनी पुनरुच्चार केला. 2047 पर्यंत विकसित भारत साध्य करण्याच्या उद्देशाने GST सुधारणा, प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना, राष्ट्रीय क्रीडा धोरण आणि सुदर्शन चक्र मिशन या प्रमुख उपक्रमांवर त्यांनी प्रकाश टाकला. पंचायत सदस्य आणि ड्रोन दीदी सारख्या विशेष अतिथींनी लाल किल्ल्यावरील सोहळ्याला हजेरी लावली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (123 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद
June 29th, 11:30 am
माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार! 'मन की बात’ मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि अभिनंदन! तुम्ही सर्वजण यावेळी योगाची ऊर्जा आणि आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या स्मृतींमध्ये रमून गेले असाल. यावर्षीही 21 जून रोजी देश-विदेशातील कोट्यवधी लोक आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. तुम्हाला आठवतंय, 10 वर्षांपूर्वी याची सुरुवात झाली. या 10 वर्षांमध्ये हा दिवस दरवर्षी आधीच्यापेक्षा अधिक उत्साहात, भव्य स्वरूपात होत आहे.नवी दिल्ली येथे विज्ञान भवनामध्ये आयोजित आचार्य श्री विद्यानंद महाराज यांच्या शताब्दी कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
June 28th, 11:15 am
परम श्रध्देय आचार्य प्रज्ञ सागर महाराज जी, श्रवण बेळगोळच्या मठाचे मठाधिपती स्वामी चारूकीर्ती जी, माझे सहकारी गजेंद्रसिंह शेखावत, संसदेतील माझे सहकारी नवीन जैन, भगवान महावीर अहिंसा भारती न्यासाचे अध्यक्ष प्रियंक जैन, सचिव ममता जैन, विश्वस्त पीयूष जैन आणि उपस्थित असलेले सर्व सन्माननीय, संतवर्ग, भगिनी आणि सद्गृहस्थ हो, जय जिनेंद्र!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आचार्य श्री विद्यानंदजी महाराज यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याला संबोधित केले
June 28th, 11:01 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, 28 जून 2025 रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आचार्य श्री विद्यानंदजी महाराज यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याला संबोधित केले.11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे आयोजित मुख्य कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
June 21st, 07:06 am
आंध्र प्रदेश चे राज्यपाल सय्यद अब्दुल नजीर जी, येथील लोकप्रिय मुख्यमंत्री आणि माझे परममित्र चंद्राबाबू नायडू गारू, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहयोगी के. राममोहन नायडू जी, प्रतापराव जाधव जी, चंद्रशेखरजी भूपती राजू श्रीनिवास वर्मा जी, राज्याचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण गारू, अन्य मान्यवर तसेच माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो! तुम्हा सर्वांना माझा नमस्कार!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथे 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्याला केले संबोधित
June 21st, 06:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथे आयोजित 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सोहळ्याला संबोधित केले. पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या समारंभाचे नेतृत्व केले आणि योगसाधना सत्रात भाग घेतला.जागतिक यकृत दिनानिमित्त पंतप्रधानांनी नागरिकांना सजग आहार पद्धतीचा अंगीकार करण्याचे आणि लठ्ठपणाविरुद्ध लढा देण्याचे केले आवाहन
April 19th, 01:13 pm
जागतिक यकृत दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व नागरिकांना सजग आहार पद्धती स्वीकारण्याचे आणि आरोग्यपूर्ण जीवनशैलीला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. छोट्या पण परिणामकारक बदलांचे महत्त्व अधोरेखित करताना, पंतप्रधानांनी असे नमूद केले की, तेलाचे सेवन कमी करणे यासारखी साधी कृतीही एकूण आरोग्य आणि निरामयता सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते.पंतप्रधानांच्या सिलवासा येथील विकास कामांच्या उद्घाटनावेळी दिलेल्या भाषणाचा मजकूर
March 07th, 03:00 pm
दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीवचे प्रशासक प्रफुल्लभाई पटेल, संसदेमधील माझ्या सहकारी कलाबेन डेलकर, सर्व मान्यवर, बंधू-भगिनींनो, नमस्कार!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सिल्वासा, केंद्रशासित प्रदेश दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव येथे 2580 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास कामांचे उद्घाटन आणि लोकार्पण
March 07th, 02:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सिल्वासा, केंद्रशासित प्रदेश दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव येथे 2580 कोटींहून अधिक खर्चाच्या विविध विकासकामांचे उद्घाटन केले. या कार्यक्रमापूर्वी त्यांनी सिल्वासा येथे नमो रुग्णालयाचे उद्घाटनही केले. उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधानांनी त्यांना या प्रदेशाशी जोडण्याची आणि सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशातील समर्पित कामगारांप्रति कृतज्ञता व्यक्त केली . इथल्या लोकांशी असलेले त्यांचे जिव्हाळ्याचे आणि दीर्घकालीन बंध यांचा त्यांनी उल्लेख केला आणि सांगितले की या प्रदेशाशी त्यांचे संबंध अनेक दशके जुने आहेत . 2014 मध्ये त्यांचे सरकार सत्तेवर आल्यापासून दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव प्रदेशाने केलेली प्रगती त्यांनी अधोरेखित केली . या प्रदेशांनी त्यांची क्षमता शक्तीमध्ये परिवर्तित करून आधुनिक आणि प्रगतीशील म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली.पंतप्रधानांनी ‘मन की बात’च्या ताज्या भागात वाढत्या वजनाच्या समस्येवर सामूहिक उपाययोजना करण्याचे केले आवाहन
February 24th, 09:11 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढत्या लठ्ठपणाच्या समस्येशी लढण्याची तातडीची गरज अधोरेखित केली असून, खाद्यतेलाचा वापर कमी करण्याच्या उद्देशाने काही प्रमुख व्यक्तींची नावे त्यांनी नियुक्त आहे. तसेच या चळवळीचा आणखी विस्तार करण्यासाठी आणखी 10 जणांची नावे नियुक्त करण्याचे आवाहन केले.